हडप्पा संस्कृती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हडप्पा संस्कृती in marathi

हडप्पा संस्कृती काय आहे?

Indus Valley civilization/harappan civilization

१९२१ साली या संस्कृतीमधील हडप्पा या शहराचा शोध लागल्याने हडप्पा हे नाव पडले.

हडप्पा कालीन अनेक शहरे सिंधू नदीच्या काठी सापडल्याने सिंधू संस्कृती हे नाव पडले.

हि संस्कृती तत्कालीन भारतातील पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात, जम्मू-काश्मीर इ. प्रदेशात विस्तारित संस्कृतीत होती.

हे संपूर्ण नागरीकरण सिंधू व तिच्या उपनद्या घागरा, सरस्वती या नद्यांच्या काठी वसलेले होते.

हडप्पा संस्कृतीचा साधारत; काळ इ.स पूर्ण ३५० ते इ.स.पूर्व १८०० होता.

मात्र या हडप्पा संस्कृतीचा उगम कसा झाला, स्थापना कोणी केली, याविषयी अजूनही माहिती उपलब्ध नाही.

हडप्पा कालीन महत्वाची ठिकाणे व त्यांचे संस्थापक:

जम्मू-काश्मीर: मंद (उत्तर सीमा)
पंजाब (पाकिस्तान); हडप्पा (दयाराम सहानी)
हरियाणा:- बनवाली (RS विष्ठ), राखिगढि, मिथातई. रोपर (VD शर्मा), सोधी
उत्तर प्रदेश:- आलमगीर (यज्ञदत्त शर्मा), पूर्व सीमा
राजस्थान:- कालीबंगण (A घोष)
सिंध (पाकीस्तान):- मोहेनजोदारो (राखालदास बनर्जी), चान्हदरो (गोपाल मुजुमदार), कोटदिजी (धुर्ये)
बलुचिस्तान:- सूटकाजेंदर (RL स्टाईन)
गुजरात:- धौलविरा (RS विष्ट, नागेश्वर), लोथल (रंगनाथराव), रोजडी, रंगपूर (माधवस्वरूप, वत्स, भागातत्राव)

हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये:-

१) नियोजनबद्ध नगरे:-

शहराची ग्रीड पद्धतीने रचना
सिडंटल आणि सामान्य भागात शहराची रचना केली होती.
सिडेंटल म्हणजे उच्च कुलीन व शासनकर्ते राहत असावेत.
सर्व ठिकाणी घर बांधण्यासाठी सारख्याच आकाराच्या भाजलेल्या विटांचा वापर केलेला आढळतो.
शहरात पूर्ण झाकलेली गटारांची व्यवस्था होती, सफाईसाठी मनहोल ठेवले होते.
काही शहरात सार्वजनिक ठिकाणांचा समावेश होता. उदा., मोहेनजोदारो येथील धान्य कोठारे आणि सार्वजनिक स्नान कुंड (कदाचित धार्मिक विधीपूर्वी स्नान करण्यासाठी याचा वापर होत असावा)
सुरक्षेसाठी शहराभोवती तटरक्षक भिंती होत्या.

२) शेती:-

गहू, बार्ली, कापूस, तांदूळ, राई इ. पिकांचे उत्पादन घेतले जात.
जमिनी नांगरल्या जात, शेतीला सिंचनासाठी नद्यांवर बंधारे बांधले होते.
अन्नधान्य साठवण्यासाठी गोदामे होती.
पाळीव प्राणी पाळले जात. उदा: बैल, म्हैस, शेली, डुक्कर, उंट, गाढव
हत्ती, हरीण इ. प्राण्यांविषयी माहिती होती, मात्र घोडा त्यांना माहित नसावा.

३) तंत्रज्ञान व कला:-

हत्यारांसाठी मुख्यता ब्राँझ आणि दगडांचा वापर होत असे.
विविध नाणी, व्यापारी जहाजे बनवली जात. सोनार विविध आभूषणे बनवत. त्यासाठी सिएटाईट आणि लॅपिस लॅझुली
दगडांचा तसेच सोने आणि तांब्याचा वापर होत.
मोहेंजोदडो येथे नर्तिकेची मूर्ती सापडली आहे.
कुंभार कामासाठी चाकाचा वापर होत.

४) व्यापार:-

संपूर्ण प्रदेशात सारखीच वजन व मापे होती.
मापांसाठी दशमान पद्धतीचा वापर होत. हि मापे बनवण्यासाठी वेगवेगळ्या दगडांचा वापर होत असे.
जहाजांचा वापर व्यापारासाठी होत, तसेच बैलगाडीही वापरत.
लॅपिस लॅझुली या मौल्यवान दगडाचा व्यापार दूरस्थ भागाबरोबर चालत.

५) राजकीय व्यवस्था:-

या व्यवस्थेबद्दल ठोस पुरावे मिळत नाहीत, मात्र मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या नागरीकरण आणि मोहेंजोदारो येथील
सार्वजनिक कुंड व सापडलेल्या पुरोहित सदृश्य मूर्तीच्या आधारे असे येथे शासन व्यवस्था अस्तित्वात होती असा अंदाज
लावता येईल.

६) धर्म:-

नैसर्गिक शक्ती आणि स्त्री यांची देवता म्हणून पिज केली जात,
तत्कालीन नाणी आणि मुद्रांवर पशुपती शिवाची चित्रे कोरली जात.
पिंपळाचे झाड आणि एक शिंगी गेंडा इ. प्राण्यांची मुद्राचित्र सापडली आहेत.
धर्माबद्दल काहीही सांगता येत नाही कारण; लिखित पुरावा उपलब्ध नाही, मंदिरे आढळत नाहीत.

७) लिपी:-

हडप्पा कालीन लोक चित्र लिपी वापरत असत. मात्र आजपर्यंत त्याचा अर्थ समजलेला नाही.

८) समाज:-

शखांचा अभाव असल्याने समाज शांतताप्रिय होता.
स्त्रीयांना समाजात मनाचे स्थान होते.
समाजात जातीभेद नव्हता.
मात्र गुलामगिरी प्रथा अस्तित्वात होती.
मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती.

९) सभ्यतेचा अंत:-

या सभ्यतेच्या उगम प्रमाणे अस्ताविषयी हि कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
अंदाजे इ.स.पूर्व १८०० मध्ये सभ्यतेचा अंत झाला असावा:
काही करणे दिली आहेत
१. दुष्काळ आणि भूकंप
२. सिंधू नदीने पत्र बदलले असावे
४. परदेशी आर्यांचा हल्ला.
५. परिस्थितीकिय असमतोल.

मात्र यापैकी कोणतेही एक कारण इतिहासकारांनामान्य नाही परंतु अर्याच्या आक्रमणाचा परिणाम पुढे दिसतो.

Other MPSC Material Links :

Leave a Comment