नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या लेखात आपण 2013-2019 या दरम्यान झालेल्या MPSC Prelims Exam मधील MPSC Science Question Paper Analysis पाहणार आहोत.
येणाऱ्या MPSC Rajyaseva Prelims Exam च्या दृष्टिकोनातून येथे MPSC Science Question Paper Analysis बद्दल दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आम्हाला आशा आहे.
MPSC Rajyaseva Prelims Exam 2013-2019 या वर्षात झालेल्या सर्व राज्यसेवेच्या पपेरमधील खाली प्रत्येक Topics चे विश्लेषण उपलब्ध करून देत आहोत. कोणत्या Topics वर भर दिला पाहिजे हे यातुन लक्षात येणार त्याचबरोबर भविष्यात येणाऱ्या MPSC Rajyaseva Prelims Exam ला कोणत्या Topics वर प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज तुम्हाला नक्कीच येईल. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे.
MPSC Science Question Paper Analysis
- MPSC Rajyaseva विज्ञान (SCIENCE) paper analysis
- अभ्यासक्रम:- सामान्य विज्ञान (General Science)
- मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण:
घटकनिहाय आलेले प्रश्न :-
2013
उत्क्रांती, किडनी, शरीरातील संप्रेरके, कोलेस्टरॉल, सी14- कार्बन, अल्कलॉइड्स (रोटीनोन, निकोटीन), बास्ट फायबर, अंत रेणुबल, धातूंची घनता, एंझाईम्सचा को-फॅक्टर, गन पावडर, आम्ल अम्लारी, कोल वायू, शुद्ध पदार्थ, डीडीटी, मॉर्फीन, चिप्स पॅकेटमधील नायट्रोजन, Effusion, केशीकत्व, पृष्ठताण, किरणोस्तर्ग, लेझर-एमआरआय-सोनार.
2014
मेद उती, विषाणू, हृदयाचे कप्पे, युरियाचे वहन, ऑक्सिश्वसन, हायड्रोक्लोरिक आम्ल, किडनीमधील सामू नियंत्रण, डीएनए, एमआरएनए, अस्थीसंस्था.
नायट्रोजन स्थिरीकरण, अन्नप्रक्रिया, नैसर्गीक व कृत्रिम रंग, वनस्पतीमधील विकर, द्विनामपद्धती, फुलांमधील पुमंग-जायांग.
सिमेंटची निर्मिती, बेकिंग सोडा व वाशिंग सोडा, नैसर्गिक आम्ल, कार्बनची अपरूपे, सुक्रोज, मिश्रण, ऑक्सिजनची समस्थानिके, घर्षण बल, रामन इफेक्ट, ध्वनीलहरी, रेडीओ लहरी.
2015
प्राण्यांचे वर्गीकरण (संधिपाद), ऑक्सिश्वसन, लॅक्टीक आम्ल, पचन संस्था, आम्ल-क्षार संतुलन, हीमॅच्युरीया (उत्सर्जन संस्था), लोण्याचे तापमान.
निर्जल अभिक्रिया, अलबर्ट आईनस्टाईन, पॉलिफेनॉल ऑक्सिडेज विकर, स्थूल पोषकद्रव्ये, औषधी वनस्पती, ग्लुकोज, नायट्रोजन, पॉलिएथिलीन,गतीज उर्जा, क्षेत्रभिंग व नेत्रभिंग, लिडार तंत्रज्ञान, अल्फा कण, अतिनील किरणे.
2016
बंडल ऑफ हिज (रक्ताभिसरण संस्था), किडनी, अॅड्रेनल ग्रंथी, अॅन्टीरीअर पिट्युटरी ग्रंथी, स्टेरॉइडस्, ग्लुकोज, इसबगोल, नैसर्गिक रबर, अणु अंक.
रासायनिक अभिक्रिया, आम्ल-अम्लारी, शर्करा, अभ्रक, मुक्त पतन, प्रकाश, ध्वनी, ध्वनी प्रदूषण, विद्युतचुंबकीय लहरी, MRI-CT Scan-XRay,अतिनील व अवरक्त किरणे, हायड्रोजन बॉम्ब, अग्निशामक यंत्र.
2017
प्राण्यांचे वर्गीकरण, नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ, एक जनुक – एक पाचकरस परिकल्पना, वृषण (प्रजनन संस्था), जीवशास्त्राची शाखा, लायकेन,ईथिलीन (वनस्पती), आयसोटोन, अमोनिया वायूची निर्मिती, जीवनसत्व ब12-, कलीले.
मोजमाप, फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम, व्हॅन डर वाल्स,ध्वनी तरंग (उदाहरण), रोधांची किंमत (उदाहरण), पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र (उदाहरण), भिंगाचे नाभीय अंतर (उदाहरण), सूर्य व पृथ्वी मधील अंतर (उदाहरण)
2018
उत्क्रांती, द्विनाम पद्धत, पिटूटरी ग्रंथी, ग्रेगर मंडेल (जनुकशास्त्र), अस्थीसंस्था.
वनस्पतींवरील रोग, जगदीशचंद्र बोस, डोबेरिनर त्रिके, गंजण्याची अभिक्रिया, काष्ठजन्य अल्कोहोल, शर्करेचे ऑक्सिडेशन, चरबी व तेल, क्लोरीन, नैसर्गिक वायू,
फ्रेसनल्स बायप्रिझम, जिओस्टेशनरी ऑरबिट, भिंगाचे नाभीय अंतर (उदाहरण), रोध काढा (उदाहरण), पंक्तीमधील अंतर (उदाहरण), इंजिनची कार्यक्षमता (उदाहरण)
2019
स्वयंजीवी जीवाणू, Rh रक्तगट, श्वसन रंगद्रव्य, नॅफ्रोन, GM पिके, नाकतोडा, अनित्य तंतू आणि स्नायु संकुचन सिद्धांत.
सी4- वनस्पती, कल्सिनेशन (धातू व अधातू), ध्रुविय संयुगे, लुईस आम्ल, कोलायडल सोल्स (संयुगे आणि मिश्रणे), हरित रसायनशास्त्र, अप्रत्यास्थ धडक, Opticle Fibre,किरणोत्सर्ग, शून्य गुरुत्वाकर्षण, डिजिटल सिग्नल, भ्रमण कक्षेतील उर्जा (उदाहरण)
संदर्भ पुस्तके
- 5 वी ते 10 वी स्टेट बोर्ड, NCERT
- Lucent – General Science
- सामान्य विज्ञान – सचिन भस्के/अनिल कोलते
- विज्ञान व तंत्रज्ञान – रंजन कोळंबे (optional)
Important Topics In Science
आता आपण MPSC Prelims Exam मध्ये Science या विषयात कुठले घटक अभ्यासायचे आहेत (Important Topics In Science) यावर एक नजर टाकूयात. खाली दिलेले Science या विषयातील Topics तुम्ही वाचणे गरजेचे आहे.
Biology (जीवशास्त्र)
प्राणीशास्त्र
(1) मानवी शरीर (Human Body)
(2) प्राणी वर्गीकरण (Animal Classification)
(1) मानवी शरीर (Human Body)
मानवी शरीराचे घटक
(1) रक्ताभिसरण संस्था (Blood Circulatory System)
(2) पचन संस्था (Digestive System)
(3) श्वसन संस्था (Respiratory System)
(4) उत्सर्जन संस्था (Excretory System)
(5) मानवी समन्वय (Human Co-ordination)
(6) सजीवाचे प्रजनन (Reproduction of organism)
(7) मानवीपोषण (Human Nutrition)
(8) मानवी आरोग्य (Human Disease)
(9) पेशी (Cell)
(10) उत्ती (Tissue)
(2) प्राणी वर्गीकरण (Animal Classification)
- असमपृष्ठरज्जूप्राणी
- समपृष्ठरज्जू प्राणी
असमपृष्ठरज्जूप्राणी
“Non-Chordates”
- संघ आदिजीवी
- संघ पेरीफेरा
- संघसिलेंटारटा
- संघ प्लॅटीहल्मीथीस
- संघ निमेटोडा
- संघ अनालिडा
- संघ अँथ्रोफोडा
- संघ मोलुस्का
- संघ इकायनोडर्माटा
- संघ हेमिकाडाटा
समपृष्ठरज्जू प्राणी
“Chordates”
- युरोकोर्डाटा
- व्हर्टीब्रेटा
- Cephalochordata
भौतिकशास्त्र (Physics)
1. विद्युत धारा (Electric Current)
व्याख्या, विद्युपरिपथ, विद्युत विभवांतर (P.D.), विद्युत रोध, ओहमचा नियम, रोधकता, रोधांची एकसर व समांतर जोडणी, विद्युतधारेचा औष्णीक परिणाम, ज्युलचा नियम, विद्युत शक्ती, AC व DC विद्युतधारा, विद्युत पितळतार, लघुपरिपथ, अतिभार
2.ध्वनी (Sound)
ध्वनीची निर्मिती व प्रसारण, अवतरंग, अणुतरंग, ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये, ध्वनीचे तारत्व, ध्वनीची तिव्रता, ध्वनीचा वेग- ध्वनीचा वेगावर परिणाम करणारे घटक, ध्वनीचे प्रकार- श्राव्य ध्वनी, श्रव्यातील ध्वनी, अवश्राव्य ध्वनी, ध्वनीचे परावर्तन, ध्वनीचा परावर्तनाचा नियम, प्रतिध्वनी, डॉपलर परिणाम, अनुवाद, निनाद, मानवी कान, RADAR.
3. प्रकाश (Light)
ऐतिहासिक पार्श्वभूमी, न्युटनचा सिद्धांत, हायगेनचा सिद्धांत, प्रकाशाची चाल, प्रकाशाचे गुणधर्म- परावर्तन, अपवर्तन, अपवर्तनांक, मृगजळ, ताऱ्याचे लुकलुकणे, प्रकाशाचे अपस्करण, इंद्रधनुष्य, प्रकाशाचे विकिरण, दृष्टीसातत्य, आरसा, अंतर्वक्र आरसा, बहिर्वक आरसा, प्रकाशाचे अपस्करण, भिंग, बहिर्वक्र भिंग, अंतर्वक्र भिंग, मानवामधील भिंग, भिंगाचे कार्य, दृष्टीदोष- लघुदृष्टीदोष, दूरदृष्टीदोष, वृद्धदृष्टीता, रंगांधळेपणा.
4. चुंबकत्व (Magnetism)
चुंबकाचे गुणधर्म- अकर्षण, प्रतिकर्षण, ध्रुवाचे विलनीकरण, चुंबकीय लांबी, चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय बलरेषा, चुंबकशिलता, विद्युत चुंबक, चुंबकाचे प्रकार, प्रतिचुंबकत्व, अनुचुंबकत्व, लोहचुंबकत्व, प्लेमींगचा उजव्या हाताचा नियम व डाव्या हाताचा नियम, विद्युत चुंबकीय प्रवर्तन.
5.ऊर्जा, कार्य आणिशक्ती (Energy,Work, Power)
ऊर्जा, गतीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, केंद्रकीय ऊर्जा, ऊर्जा अक्षयतेचा नियम, कार्य व कार्याचे प्रकार, शक्ती.
रसायनशास्त्र (Chemistry)
1. अणु व त्याची रचना (Atomic Structure)
ऐतहासिक पार्श्वभूमी-जॉन डाल्टन, जे.जे.थॉमसन, रुदरफोर्ड सिद्धांत, अणुकेंद्रक, प्रोटॉन, न्युट्रॉन, अणुच्या कक्षा-इलेक्ट्रॉन, पॉझीट्रॉन, अणुअंक, अणुवस्तुमानांक, निल्सबोहरचा सिद्धांत, आयन निर्मिती, संयुजा, ऑफबाऊजचा सिद्धांत, समस्थानिके, समभार, आयसोटोन, आयसोइलेक्ट्रॉन
2. किरणोत्सारीता (Radioactivity)
किरण, B- किरण, y- किरण, किरणोत्सर्जीत मुलद्रव्याचे प्रकार, नैसर्गिक किरणोत्सारी मुलद्रव्ये, कृत्रीम किरणोत्सारीत मुलद्रव्ये, किरणोत्सारीचा हास, अर्धायुकाळ, केंद्रकिय विखंडन, केंद्रकीय समिलन.
3. अम्ल, अम्लारी आणि क्षार (Acid, Base & Salt)
दर्शक (Indicator) व प्रकार, मापन पद्धत, काही नैसर्गिक अम्ले, अम्ल व त्याचे प्रकार, अम्लारी व त्याचे प्रकार, अम्ल व अम्लारी संबंधी सिद्धांत, अम्लारीची अम्लधर्मित व अम्लाची अम्लारीधर्मिता, अम्ल व अम्लारीची धातूबरोबर अभिक्रिया, अम्ल व अम्लारीचे उपयोग, क्षार व
क्षाराचे उपयोग.
4. धातूव अधातू (Metal&Nonmetal)
धातूचे व अधातुचे भौतीक गुणधर्म- धातुचे रासायनिक गुणधर्म, धातुचे आढळ, धातुचे निष्कर्षण, धातुचे क्षरण व क्षरण रोखण्याचे उपाय- समिश्रीकरण.
5. कार्बन संयुगे (Carbon Compound)
कार्बन संयुगाचे महत्त्व, कार्बनी संयुगातील बंध, हायड्रोकार्बन, अल्कोन, अल्कीन, अल्काईन, सेंद्रीय संयुगातील क्रियात्मक गट, कार्बन संयुगाची नामकरण पद्धती, फ्रेऑन, ॲसिटाल्डीहाइट, ॲसिटीक अॅसिड, कार्बन अपरुपे, हिरा, ग्राफाइट, फ्लुरीन्स, सहसंयुज बंध, आयनिक बंध, कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड.
6. द्रव्याचे गुणधर्म (Property of matter)
घनता, भौतीक वर्गीकरण, स्थायु, द्रव, वायु, आयनायु, बोस आइनस्टाइन अवस्थांतरन, द्रवीभवन, बाष्पीभवन, संघनन, संप्लवन, द्रवनांक, गोठणबिंदु, पाण्याचे असंगत अचरण. रासायनिक वर्गीकरण- संयुग, मिश्रण-समांगी मिश्रण, विषमांगी मिश्रण
7. मुलद्रव्याचे वर्गीकरण (Classification of element)
डोबेरायनरचे त्रिके, न्युलँडसचे अस्टके, मेंडीलीव्ह अवर्तसारणी, आधुनिक अवर्तसारणी
8. रासायनिक अभिक्रिया (Chemical Reaction)
भौतिक बदल, रासायनिक बदल, रासायनिक अभिक्रियेचे प्रकार- संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, ऑक्सीडीकरण अभिक्रिया, क्षपण अभिक्रिया, रेडॉक्स अभिक्रिया, अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक.
वरील दिलेले सर्व घटक MPSC Exam Question Paper Analysis of Science या विषयासाठी पुरेसे आहेत, वरील घटकांवर तुम्हाला आम्ही लवकरात लवकर Notes Provide करण्याचा प्रयत्न करू तरी तुम्ही रोज Website ला Visit करत रहा कारण आम्ही Notes Update केल्यावर तुम्हाला लगेच कळेल, त्यासाठी तुम्हाला MPSC Notes या Main Menu ला भेट देत रहावं लागणार
किव्हा आपल्या Website च्या वरती उजव्या कोपऱ्यात (Desktop Version Website साठी ) Search box मध्ये MPSC Notes असं Search करा आणि (Mobile Version Website साठी) खाली Scroll करत जा तुम्हाला Search Box दिसेल तिथे तुम्ही Search करू शकता.
तोपर्यंत तुम्हाला State board ची Books वाचून घ्या व त्याचे Short Notes तयार करून त्याला Revise करत रहा,(सोबत आयोगाचे (Rajyaseva) Previous Year Question Papers, ( Combined Grobe ‘B’ Exam Question Papers )बघत चला) या संदर्भात तुमचे काही प्रश्न असल्यास तुम्ही Comment Box मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता, धन्यवाद..
Thanks for providing such a piece of valuable information..nice work keep it up…thanks again, sir
Thanks for your kind words Ma’am, you can check out our other mpsc material on this website enjoy your study. and please share with your friends.
Very much needed nd authentic information… thanks..
????????
Thanks, Sir, please share on a social media platform