S.T Category च्या विद्यार्थ्यांसाठी MPSC प्रशिक्षण आणि Tablet मोफत..जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार विद्यार्थी मित्र/मैत्रिणींनो जर तुम्ही आदिवासी प्रवर्गातून येत असाल आणि जर तुम्ही MPSC Exam साठी तयारी करत असाल किंवा तयारी सुरु करण्याचा विचारात असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या TRTI या संस्थेकडून Online स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी Online पद्धतीने Form मागविण्यात येत आहेत.

अनुसूचित जमातीतील पदवीधर उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अँड्रॉइड मोबाईल टॅब्लेटद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा व दुय्यम सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण (दुसरी बॅच) प्रशिक्षण लाभाकरिता अर्ज मागविण्याबाबत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), ही एक नोंदणीकृत महाराष्ट्र शासनाची अंतर्गत संस्था आहे.

TRTI योजना : माहिती

योजनेचे नावMPSC राज्यसेवा व दुय्यम सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण
(Free Online Prelims+Mains Courses)
योजना राबवणारेTRTI, Maharashtra Govt.
योजनेचे लाभFree Tablet + MPSC Courses
योजनेचे लाभार्थीफक्त आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थी

योजनेचा लाभ काय असेल

सदर संस्थेमार्फत अनुसूचित जमातीतील युवक व युवतींसाठी सेवापूर्व प्रशिक्षण धोरणांतर्गत विविध स्पर्धा प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. या संस्थेमार्फत अनुसूचित जमातीतील एकूण ४०० उमेदवारांना ऑनलाईन अँड्रॉइड मोबाईल टॅब्लेटद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, मुलाखत तयारी तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षा आणि मुख्य परीक्षा स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता (दुसरी बॅच) स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

योजनेची माहिती कोठे मिळेल

अनुसूचित जमातीतील पात्रताधारक उमेदवार यांनी अर्जाचा नमुना, प्रशिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर तपशील, उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला व तत्सम माहितीकरिता या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ https://trti.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

योजनेचा लाभ कसा घेता येईल

या योजनेचा लाभ घेण्याकरिता सदर संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेल्या गुगल फॉर्मच्या लिंक वरूनच अर्ज करावेत. उमेदवारांनी इतर कोणत्याही ई मेल आय.डी.वर अर्ज पाठवू नयेत, अशा पाठविलेल्या कोणत्याही अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अनुसूचित जमातीतील उमेदवारांची अर्हतेनुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचेकडे राहतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : २०-२-२०२२ (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल.

हे देखील बघा :

2 thoughts on “S.T Category च्या विद्यार्थ्यांसाठी MPSC प्रशिक्षण आणि Tablet मोफत..जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Leave a Comment