Ancient हिस्ट्री ऑफ़ इंडिया (प्राचीन भारताचा इतिहास)
प्रागैतिहासिक कालखंड
अश्मयुग
तीन कालखंडात विभागणी केलेली आहे
1) पुराणाश्म युग [इ.स.पू ९००० पर्यंत चा कालखंड]
2) मध्याश्म युग [इ.स.पू ९००० ते इ.स.पू ४००० पर्यंत चा कालखंड]
3) नवाश्म युग [इ.स.पू ४००० ते इ.स.पू १५०० पर्यंत चा कालखंड]
1) पुराणाश्म युग [इ.स.पू ९००० पर्यंत]
प्रागैतिहासिक कालखंड
अश्म युग
1. पुराणाश्म युग (Palaeolithic Age) : इ. स. पूर्व 9000 पर्यंतचा कार्यकाळ.
भटक्या अवस्थेतील जीवन जगत असताना जंगलातील सुरक्षित अशा डोंगरमाथ्यावर किंवा पायथ्यालगत पाण्याच्या प्रवाहाजवळ (नदीकाठी) तत्कालीन मानव वस्ती करून राहत असे. याबरोबर निसर्गत: निर्मित गुहांमध्ये मानव रहात असल्याचे नमुने उपलब्ध आहेत. उदा. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील भीमबेटका. भीमबेटका येथील गुहेत वास्तव्यादरम्यान भिंतीवर मानवाने तीक्ष्ण हत्याराने चित्रे कोरली आहेत.त्यातपक्षी, प्राणी, मानवी दैनंदिन जीवन, शिकारीचे प्रसंग इत्यादींचा समावेश असत. या काळातील मानव मुख्यत: शिकार करत, त्यासाठी दगडी हत्यारांचा वापर होत असे म्हणून या काळाला पाषाण युग म्हटले जाते. दरम्यान शेतीचे ज्ञान नव्हते.
पुराणाश्म युगाची आणखीन तीन कालखंडात विभागणी केलेली आहे.
१) पूर्व पुराणाश्म युग, २) मध्यपुराणाश्म, ३) उत्तरपुराणाश्म
- पूर्व पुराणाश्म युग : क्वार्टझाइट दगडाचा वापर, सोहन खोरे किंवा पेबुल-चॉपर चॉपिंग संस्कृती म्हणतात. (पंजाब-सोहननदी खोऱ्यात), ऑस्ट्रेलोपीथिक्स व होमो इरेक्ट्स मानव उत्पत्ती (मानव प्राथमिक अवस्थेत).
- मध्यपुराणाश्म : नर्मदा व तुंगभद्रा नदी – नेवासे, महाराष्ट्रात अवशेष सापडलेले ठिकाण, सापडलेल्या वस्तू : तासण्या, टोकदार हत्यारे (जैस्पर, चर्ट, प्लिंट इ. दगडाचा वापर)
- उत्तरपुराणाश्म : होमोसेपियन्स प्रगत मानव, भीमबेटका येथे निळ्या रंगाचे पाषाणखंड,
हत्यारे : त्रिकोणी, चतुष्कोनी, अर्धचंद्राकृती
दागिने : हस्तिदंत, हाडांचे मणी, शंखाचे मणी, शिंपले
हवामान : ऊबदार
उत्खनन झालेले ठिकाण : आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र
2) मध्याश्म युग Mesolithic Age [इ.स.पू ९००० ते इ.स.पू ४००० पर्यंतचा काळ]
पुराणाश्म युग व नवाश्म युग यांच्यामधील कालखंड म्हणजे मध्याश्म युग होय.
या युगात शिकार करणे, मासेमारी करणे, कंदमुळे गोळा करणे हे मुख्य व्यवसाय केले जात, हळूहळू प्राणी पाळण्यास सुरुवात झाली. शिकारीसाठी दगडाची तीक्ष्ण हत्यारे वापरली जाऊ लागली.
- भारतातील ठिकाणे :
– महाराष्ट्र – पुणे, धुळे
– मध्यप्रदेश – भीमबेटका, होशंगाबाद, विंध्य सातपुडा
– राजस्थान – तिलवाडा
– कर्नाटक – संकनकल्लू
– गुजरात – साबरमती
- प्रमुख वैशिष्ट्ये – सूक्ष्मास्त्रे
– बगोर – सर्वात मोठे ठिकाण
– भीमबेटका – मध्याश्म युगीन कलेसाठी प्रसिद्ध
– मुख्य व्यवसाय १) शिकार करणे, २) कंदमुळे गोळा करणे, ३) मासेमारी करणे
– महत्वाचा शोध – अग्नीचा शोध
– मृद भांडे बनवण्याची कला
– या संस्कृतीचे अवशेष – यूरोप व आफ्रिका
– नवाश्म युग हि संज्ञा – सर जॉन लूबॉक (Pre-Historic Time) संज्ञा या पुस्तकात मांडली
सर्वात महत्वाची घटना म्हणजे शेतीचा शोध (स्थिर जीवनाला सुरुवात)
घरे – दगड, मातीचे (चौकोनी)
पाळीव प्राणी
चाकाचा शोध
भटकंती संपून मानवाने स्थायी जीवन पद्धतीची सुरुवात केली.दरम्यान राहण्यासाठी दगड, मातीची चौकोनी आकाराची घरे बनवत. दरम्यान मातीच्या भांड्यांचा वापर सुरु झाला. पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली. स्थायी जीवनामुळे शेतीची सुरुवात झाली. ज्यात रागी, कुलिथ, गहू, तांदूळ यांचे उत्पादन घेतले जात.
भारत बाहेरील ठिकाणे
मेहेरगढ (बलुचीस्थान)
भारतातील ठिकाणे
1) काश्मीर – बुर्जूहोम, Gufkral
2) बिहार – चिरांद
3) उत्तर प्रदेश – मिर्जापूर
4) कर्नाटक – मस्की, ब्रम्हगिरी, हल्लूर
5) आंध्रप्रदेश – उत्तनूर
6) तामिळनाडू – पय्यमपल्ली
बुर्जूहोम – मृतांना दंडाकृती खड्यात पुरात
चिरांद – घरांचे अवशेष
Gufkral (काश्मीर) – प्राण्यांच्या हाडांपासून हत्यारे
बुर्जूहोम – करड्या रंगाची मातीची भांडी
मेहेरगढ – गहू, कापूस, मातीच्या विटांची घरे
4) ताम्रपाषाण संस्कृती महत्वाचे मुद्दे
ताम्रपाषाण युग (Chalcolithic Age):
नवाश्मयुगाच्या शेवटी तांबे या धातूच्या वापरास सुरुवात झाली. दरम्यान तांबे व दगड या दोन्हींचा उपयोग होत असल्याने या युगास ताम्रपाषाण युग असे म्हटले जाते. पाळीव प्राण्यांत गाय, म्हैस, शेळीयांचा समावेश होता मात्र घोडा या बद्दल जास्त माहिती नसावी. अहर, कायथा, प्रभास, रंगपूर, सावळदाहि ताम्रपाषाण संस्कृतीशी संबधित ठिकाणे आहे.
मसूर, तांदूळ, बाजरा,गहू,कापूस इत्यादी पिकांची शेती केली जात. कापड बनवण्याची कला अवगत होती, स्त्रीला देवी म्हणून पूजा केली जात. मृत व्यक्तींना पुण्याची पद्धत होती. प्रागैतिहासिक मानवाला लेखन कला अवगत नव्हते.
-
तांबे वापरण्यास सुरुवात + दगड
-
मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत
-
स्त्री-देवतांची पूजा
-
युरोपात या युगाला ब्रॉंज युग म्हणत
-
लाल काळ्या रंगाच्या भांड्यांचा वापर
-
गेरू रंगाची भांडी (जोधपूर)
-
मातीच्या भांड्यावर – पक्षी, चित्त, मोर, बैल यांची प्रतिमा (Important point)
-
घरे – मातीच्या विटांची व छपरांची
- गहू व तांदूळ प्रमुख पीक
- पशुपालन बरोबर कृषी
- तांब्याच्या वस्तू
- इनामगाव येथे उत्खननात सापडलेल्या वस्तू – मौल्यवान दगड स्टेटाईट व स्फटिक (मणी बनवणे)
- मृतांना उत्तर दक्षिण स्थितीत दफन करायचे
- मृतांसोबत दैनंदिन वस्तू दफन केल्या जाई
- पुनर्जन्मावर विश्वास होता
- तांब्यासोबत कास्य धातूच्या वस्तू
गणेश्वर संस्कृती
- हि एक ताम्र पाषाण कालीन संस्कृती होती (राजस्थान)
- राजस्थान खेत्री (तांब्याची खाण)
- ताम्रपाषाण संस्कृतीशी साधर्म
- गेरू, काळ्या रंगाची भांडी
ताम्र पाषाण काळातील प्रादेशिक संस्कृत्या
१) कायथा संस्कृती (नर्मदा व तापी नदी खोरे), तांबडी मृदू भांडी, मण्याच्या माळा
२) सावळदा (महाराष्ट्र)
३) अहर, बनास (राजस्थान)
४) रंगपूर (गुजरात)
५) जोर्वे (महाराष्ट्र)
६) चिरांद (उत्तर प्रदेश)
७) माळवा (मध्यप्रदेश)
महत्वाची ठिकाणे
१) महाराष्ट्र
- जोर्वे – मुख्य ठिकाण – प्रवरा नदी
- मिळालेले साहित्य – कुऱ्हाडी, छिन्न्या इ.
२) दायमाबाद
- नगर जिल्हा
- शहरीकरण, सर्वात मोठे ठिकाण
- काळ्या रंगाची मृदभांडी
३) नेवासा – गोदावरी खोरे
४) इनामगाव – पुणे
५) चांदोली – पुणे
शेती, पाळीव प्राणी
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे
- नाण्यांचे अभ्यास करणारे शास्त्र – ‘न्युमिस्मॅटिक’ मुद्राशास्त्र होय
- कोरीव लेखाच्या अभ्यासाला ‘एपिग्राफी’ पुरालेखाशास्त्र म्हणतात
कालमापन पद्धत ( C-१४ )
- ह्या पद्धतीचा वापर पुरातत्वीय साधनांचा कालमापनासाठी होतो
- शोध – विलार्ड लिबी ( १९४९ मध्ये लावला )
- १९६० मध्ये रसायन शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले
- या पद्धतीनुसार कार्बन किरणोत्सर्जनाशी मृत प्राण्याचा किंवा सजीवांच्या किणित्सर्जनाची तुलना केली असता सजीवांचा मृत्यू केव्हा झाला हे सांगता येते. प्रत्येक जीवित प्राणी कार्बन मधून C-१४ घेत असतो.
- प्रत्येक जीवात कार्बन C-१४ चे प्रमाण सारखेच असते ( सामान प्रमाणात असते )
- मृत्यूनंतर प्रत्येक जीव एकाच प्रमाणात C-१४ बाहेर टाकत असतो.
- मृत्यूनंतर अर्धा C-१४ हा ५५६८ वर्षांनी नाहीसा होतो यालाच half life of c14 असे संबोधले जाते.
दक्षिण भारतात मात्र, अशमयुगानंतर लगेच लोह युग सुरु होतो
भारतीय नाणे
१) वजन व आकार अनिश्चित
२) ग्रीकांची नाणी आकर्षक
३) ग्रीकांच्या नाण्यांचे वजन निश्चित स्वरूपाचे होते
४) भारतीय नाणी अहतमुद्रा पद्धतीची म्हणजे त्या नाण्यावर केवळ चिन्ह होते मात्र कोणतेही लेख नव्हते.
५) या नाण्यांसाठी चांदीचा वापर होत असे
६) या नेण्यास कार्षाकण असे म्हणत.
Very good 👍👍