How to Prepare History for MPSC Combined Exam: MPSC Combined Exam ची तयारी करणारे बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांना नेहमी एक प्रश्न भेडसावत असतो तो म्हणजे MPSC Combined Prelims Exam साठी इतिहासाची तयारी कशी करावी?
या Article मध्ये आपण पाहणार आहोत कि, MPSC Combined Exam ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात अवघड वाटणाऱ्या इतिहासाची Combined Prelims साठी EXAM ORIENTED तयारी कशी करावी?
How to Prepare History for MPSC Combined Exam
- Syllabus नुसार अभ्यास :
आयोगाने Combined Prelims साठी दिलेला Syllabus – ” आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास “
अशा प्रकारे आयोगाने इतिहासाचा एका ओळीत उथळ व अपूर्ण SYLLABUS दिलेला आहे. परंतु MPSC Combined PREVIOUS YEARS Question Papers बघितल्यास असे लक्षात येते की सखोल अभ्यास केल्याशिवाय इतिहासाला SCORE करता येत नाही.
COMBINED पुर्व साठी इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
- SYLLABUS मध्ये विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास असा उल्लेख केल्यामुळे परिक्षार्थीला जास्तीत जास्त FOCUS हा महाराष्ट्राचा इतिहासावर करावा लागतो.
- पुर्व मध्ये इतिहासावर 15 प्रश्न विचारले जातात. त्यापैकि 10 ते 11 प्रश्न हे फक्त महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारले जातात.
MPSC Combined Booklist:-
- सर्वात चुकीच्या पद्धतीने वाचला जाणारा विषय.
- विद्यार्थी इतिहास या विषयाची BOOKLIST सतत बदलत राहतात, त्यामुळे FINALLY OUTPUT शून्य येते व SCORE कमी येतो.
- त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी कोणतेही एक व भारताच्या इतिहासासाठी कोणतेही एक असे दोन पुस्तक वाचले तरी 70-80% SYLLABUS COVER होईल.
- महाराष्ट्राच्या इतिहासासाठी कठारे किंवा गाठाळ यापैकी एक ( दोन्हीही पुस्तक वाचण्याची गरज नाही )
- तसेच भारताच्या इतिहासासाठी ग्रोव्हर किंवा कोळंबे किंवा समाधान महाजन यापैकी एकच पुस्तक निवडा व त्यांचे वारंवार REVISION करा.
इतिहास विषयीच्या MYTHS :
इतिहासाला SCORE येत नाही इतिहास SKIP करायचा असतो तो पुस्तकातून COVER होत नाही, या सर्व MYTHS आणि भ्रामक कल्पना आहेत. EXAM ORIENTED APPROACH एकाच पुस्तकाची वारंवार REVISION, PREVIOUS PAPER चा चांगला अभ्यास केल्यास व शेवटी इतिहासाची गोडी निर्माण केल्यास इतिहासाला खूप चांगला SCORE येऊ शकतो.
इतिहासाचा SYLLABUS आपण दोन भागांमध्ये DIVIDE करू
- भारताचा इतिहास
- महाराष्ट्राचा इतिहास
- COMBINED पूर्व साठी भारताचा सविस्तर अभ्यास क्रम :
COMBINED पुर्व SYLLABUS मध्ये भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा असा उल्लेख आहे त्यामुळे भारताच्या इतिहासाची ‘ भारताचा इतिहास ‘ या घटकाची IN DETAIL अभ्यास करण्याची गरज नाही. परंतु महत्वाच्या बाबींसाठी माहिती असणे आवश्यक असते.
- BOOKLIST →
समाधान महाजन सरांचे पुस्तक भारताचा सर्व SYLLABUS व्यवस्थित COVER करते. परंतु तुम्ही जे भारताच्या इतिहासासाठी कुठलेही एक पुस्तक केले तरी ते SUFFICIENT आहे.
भारताच्या इतिहासाचा अभ्यास कसा कराल?
- भारताच्या इतिहासाचा सविस्तर अभ्यासक्रम →
भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना साधारण दोन भाग करता येऊ शकतात.
1) 1857 पूर्वीचा इतिहास
2) 1857 नंतरचा इतिहास
IMP:
- COMBINED पूर्व मध्ये श्क्यतो 1857 पूर्वीचा भागावर प्रश्न विचारले जात नाहीत त्यामुळे तो भाग SKIP केला तरी चालेल.
- 1857 नंतरचा इतिहास या भागांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.
- 1857 ते 1947 पर्यंतच्या इतिहास व्यवस्थित करावा.
- या भागांमधील खालील उपघटकांची तयारी व्यवस्थित करावी
1) GOVERNOR GENERALS व कायदे (1773-1947)
2) 1857 चा उठाव.
3) 1857 चे नंतरचे महत्वाचे उठाव. शेतकरी, आदिवासी इ.
4) महत्वाच्या राष्ट्रीय संघटना ( वंगभंग प्रकाशीका सभा ते क्रॉग्रेस)
5) इंडियन नॅशनल क्रॉग्रेस व महत्त्वाची अधिवेशने.
6) मवाळ व जहाल गटांची वाढ व त्यांचे राजकारण.
7) महत्त्वाच्या राष्ट्रीय चळवळी :
- स्वदेशी चळवळ
- असहकार चळवळ
- सविनय कायदेभंग चळवळ
- चले जाव चळवळ इ.
8) भारतातल्या सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी :
उदा. ब्राम्हों समाज, आर्य समाज
9) क्रांतिकारी व साम्यवादी चकवळ
COMBINED पूर्व चा महाराष्ट्राचा सविस्तर अभ्यासक्रम :
सर्वाधिक प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासावर येतात. त्यांची संख्या 10 ते 11 एवढी असते. त्यामुळे COMBINED पुर्व मध्ये जास्तीत जास्त FOCUS हा महाराष्ट्रावर करावा.
त्यातल्या त्यात सर्वाधिक भर — व्यक्तिविशेष ‘ या घटकावर करावा . इतिहासाचा अभ्यास म्हणजे व्यक्तीचा अभ्यास असल्यामुळे महत्त्वाच्या व्यक्तींची कार्ये , भूमिका, समजून घेतल्यास 10 पैकी 4-5 प्रश्न COVER होऊ शकतात.
महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास कसा कराल?
- महाराष्ट्राच्या इतिहासाचा सविस्तर SYLLABUS : –
1) शिक्षण , वृत्तपत्रे व पारंभीक प्रशासन : –
- या घटकावर हमखास प्रश्न
- महत्वाची वृत्तपत्रे त्यांचे संपादक व त्यांची भूमिका लक्षात घेणे.
- वुडसच्या खलित्यापासून स्वातंत्र्यपर्यंत शिक्षणाची पार्श्वभूमी लक्षात
- घेणे.
- महत्वाचे कायदे – महाराष्ट्रातील व्यक्तींची भूमिका ई.
2)राष्ट्रवादाचा उदय :
1857 पूर्वीचे महाराष्ट्रातील महत्वाचे उठाव →
- उमाजी नाईक
- रामोशी
- फडके इतर महत्वाचे व्यक्तीचे उठाव
- कोळ्यांचे चे उठाव
- भिल्लांचे उठाव
3) 1857 चा उठाव व महाराष्ट्र
4) महाराष्ट्रातील संघटना →
महत्वाच्या प्रारंभीक संघटनांचा अभ्यास करणे गरजेचे उदा. →
- बॉम्बे असोशीयन.
- पुना सार्वजनिक सभा.
- INC
- भारत सेवक सभा. – इ.
5) महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ →
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराष्ट्राचे योगदान या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात.
- INDIAN NATIONAL CONGRESS व महाराष्ट्र.
- मवाळ व जहाल कालखंड.
- स्वदेशी चळवळ.
- असहकार चळवळ.
- साविनय कायदेभंग.
- चले जाव. इ.
6) महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी →
- अभिनव भारत
- चाफेकर
- चळवळ इ.
7) महाराष्ट्रातील समाजसुधारणा →
- सामाजिक चळवळ – महात्मा फुले व शाहू महाराज
- दलित चळवळ – आंबेडकर , वि. रा. शिंदे
- ब्राम्हनेतर – शाहू महाराज, जेधे , जवळकर , भास्करराव जाधव ई.
- शैक्षणिक चळवळी – भाऊराव पाटील ई.
- शेतकरी व कामगार चळवळी. इ.
8) समाजसुधारक व इतर महत्वाच्या व्यक्तींची भूमिका →
- सर्वाधिक प्रश्न या घटकावर विचारले जातात. ( 4-5 प्रश्न )
- महत्वाच्या समाजसुधारकांसोबत महाराष्ट्रातील शैक्षणिक सामाजिक इ. क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तीचे कार्य व योगदान यांवरती प्रश्न विचारले जातात.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे समाजसुधारक
महत्वाचे समाजसुधारक :-
- महात्मा फुले
- शाहू महाराज
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- महर्षि कर्वे
- वि.रा शिंदे
- न्यायमूर्ती रानडे
- लोकमान्य टिळक
- गोपाळ आगरकर – इ.
9) संयुक्त महाराष्ट्र व मराठवाडा मुक्तिसंग्राम →
आयोग एखादा प्रश्न विचारू शकते. त्यामुळे फक्त महत्वाच्या व FACTUAL गोष्टींचा अभ्यास करावा.