चालू घडामोडी चा अभ्यास कसा करावा | How to Study current affairs for MPSC In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चालू घडामोडी चा अभ्यास कसा करावा :

चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा बरं? असे काय करावे जेणेकरून चालू घडामोडी मध्ये मला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील? असा प्रश्न बहुतेक सर्वाना पडतो. कारण चालू घडामोडी इतका स्टॅटिक सबजेक्ट कोणताच नाही. भरपूर पुस्तके पण वाचलेले येईलच याची काही शाश्वती नाही.

बरं अख्ख्या वर्षाचे करंट करायचे आणि आयत्या वेळी आठ्वलेच नाही तर वेगळीच पंचाईत होते. तर तमाम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात भीती आणि कंटाळा असलेला विषय आहे करंट अफेअर्स. तर आजच्या लेखात आपण चालू घडामोडी चा अभ्यास कसा करावा याबद्दल माहिती घेणार आहोत.

चालू घडामोडी चा अभ्यास कसा करावा : स्वरूप

MPSC मध्ये चालू घडामोडी हा सामान्य अध्ययन च्या अभ्यासाचा आत्मा असतो कारण सामान्य अध्ययन मध्ये विचारलेला प्रत्येक प्रश्नाला चालू घडामोडीची पार्श्वभूमी असते. परीक्षेच्या तीनही टप्प्यामध्ये म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा मुलाखत मध्ये चालू घडामोडीचे प्रश्न अंतर्भूत असतात.

चालू घडामोडीचा अभ्यास करताना मागील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास करावा कारण काहींचा भ्रम असतो कि चालू घडामोडी म्हणजे फक्त तारखा, स्थळे, नावे तर तसे काही नसून महत्वाच्या घटनांची विश्लेषणात्मक माहिती विद्यार्थ्याला असावी, तथ्यांची नीट माहिती असावी अशी अपेक्षा असते.

आजूबाजूच्या जगात काय घडते आहे याचा आपण वाचलेल्या गोष्टींशी संबंध जोडून अर्थ लावण्यासाठी चालू घडामोडी चा अभ्यास महत्वाचा आहे.

नेमके काय वाचावे ?

चालू घडामोडीचा अभ्यास करताना आपण काय वाचतो हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. खालील मुद्दे प्रकर्षाने वाचावेत.

  1. राजकीय घडामोडी : राजकीय संस्था तसेच राजकीय घडामोडी ज्याचा अभ्यास आपण राज्यशात्र या सामान्य अध्ययन या विषयामध्ये केला आहे.
  2. जागतिक घाडामोडी : भारताचे परकीय देशांसोबत असलेले संबंध, व्यवहार, जगात घडलेल्या महत्वाच्या गोष्टी इ
  3. न्यायालयीन बाबी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे निर्णय, खटले, संविधानिक बदल, हक्क आणि इतर न्यायालयीन प्रक्रिया इ.
  4. सरकारी घडामोडी शासन निर्णय, योजना, संस्था, अहवाल इ
  5. पर्यावरण : पर्यावरण संबधी घटना उदा. रामसार करार, प्रदूषण अहवाल, नामशेष प्रजाती वगैरे बद्दल बातम्या
  6. आर्थिक आर्थिक घडामोडी जसे की, अर्थसंकल्प, कर रचना, किमती, निर्देशांक,
  7. विज्ञान : संशोधन, प्रगती, तांत्रिक घडामोडी.
  8. सामाजिक : समाजावर परिणाम करणाऱ्या घटना, समाजाला प्रभावित करणाऱ्या घटना, उपक्रम इ.
  9. संरक्षण : शेजारील देशांसोबत झालेले युद्धाभ्यास, संरक्षण साहित्याची निर्मिती, विविध अंतराळ मोहीम इ.
  10. व्यक्तिविशेष: वर्षभरात निधन झालेल्या व्यक्ती, नवीन नियुक्त्या, राजीनामा, विशेष कौशल्य गाजवलेल्या व्यक्ती माहिती, त्यांनी लिहिलेले पुस्तके, त्यांचे चित्रपट इ.
  11. पुरस्कार : ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, ऑस्कर, पद्म पुरस्कार, भारतरत्न, विविध आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती इ.

वृत्तपत्रे वाचताना वरील गोष्टींकडे लक्ष द्यावे.

चालू घडामोडींची तयारी : चालू घडामोडी ची तयारी रोज एक तास करावी. तुम्ही वर्तमानपत्रातून, मासिकातून, किंवा युट्युब वर विडिओ स्वरूपात करू शकता. वृत्तपत्रांमध्ये असंख्य बातम्या असतात त्यातून आपल्या अभयसक्रमासाठी ज्या उपयोगी आहेत त्याच वाचाव्यात अर्थात त्यासाठी आपल्याला अभयसक्रम आणि मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे.

नाहीतर हा विषय असा आहे ज्यात तुम्ही गेलात तर नीट जात नाहीतर भरकटत राहता. त्यामुळे आधी या विषयाचा आवाका समजून घेऊन मगच वर्तमानपत्रातून वाचण्यास सुरवात करावी. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस हि वृत्तपत्रे वाचू शकता जमल्यास त्याच्या नोट्स देखील काढाव्यात.

बाजारात असंख्य प्रकारची मासिके उपलब्ध आहेत ज्यामध्ये रेडिमेड स्वरूपात चालू घडामोडी उपलब्ध होतात. उदा. अभिनव प्रकाशन, पृथ्वी परिक्रमा, सिम्पलीफाईड इ. यूट्यूब वर राज्यसभा टीव्ही या चॅनेल वर बिग पिक्चर या नावाने चर्चा चालते ती चालू घडामोडीवरच असते.

तसेच तुम्हाला ऑडिओ स्वरूपात AIR न्युज, स्पॉटलाईट, संसामायिकी इ उपलब्ध असतात. ऑनलाईन स्रोत म्हणाल तर pib ची वेबसाईट, विविध मंत्रालयाच्या वेबसाईट उपलब्ध होऊ शकतात.

हे सुद्धा बघा :

Leave a Comment