MPSC Update: आज दिनांक २९/०८/२०२४ रोजी आयोगाने mpsc departmental psi exam 2023 result जा.क्र.०५२/२०२३ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Adv.No.52/2023 Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Preliminary Examination 2023-Announcement regarding Result
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १० डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा – २०२३ मधून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक २९ ऑगस्ट, २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत पदाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- प्रस्तुत पूर्व परीक्षेचा निकाल मा. महाराष्ट्र प्रशासन न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मुळ अर्ज क्रमांक १२३२/२०२३ व त्याअंतर्गत दाखल संकीर्ण अर्ज क्रमांक ४७२ / २०२४ वरील निर्णयाच्या अधीन जाहीर करण्यात आला आहे.
- अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
- मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील.
- मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.