MPSC PSI Departmental Exam 2022 जाहिरात आलेली आहे | MPSC PSI Departmental Exam Notification 2022 Out

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC PSI Departmental Exam Notification 2022 “Declaired” : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात/परिपत्रक जी आज दिनांक ११/०२/२०२२ रोजी आयोगाने जाहीर केलेले आहे. या जाहिरात संबंधी पूर्ण तपशीलवार माहिती आणि या परीक्षेसाठी कोण पात्र असेल या संदर्भतील संपूर्ण माहिती याच ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे.

येथे या जाहिराती संबंधी सर्व माहिती सोबतच MPSC PSI Departmental Exam Syllabus and Exam Pattern विषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (ग्रेड बी) पदासाठी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 बाबत जाहीर केलेल्या अधिसूचना बद्दल चला माहिती पाहुयात.

MPSC PSI Departmental Exam बद्दल मा. उच्च न्यायालयाने दिलेला निकाल :

Note: मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्रमाांक 2797/2015 प्रकरणी दिनांक 04 ऑगस्ट, 2017 रोजी दिलेल्या निकालाच्या आधारे सदर पदे प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार न भरता गुणवत्तेनुसार भरण्यात येतील असा निकाल दिला होता.

MPSC PSI Departmental Exam : Total Posts

आयोगाने यावेळेस PSI Departmental ची पदसांख्या :- 250 पदांची घोषणा केलेली आहे. आयोगाने या सोबतच नमूद केलेली पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

  • एकूण पदसंख्या : २५०

पात्रता, Education Qualification

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई व पोलीस नाईक या पदावर नियमित नियुक्तीवर असलेले कर्मचारी पात्र असतील.

इतर सर्व गुंतागुंतीच्या (क्लिष्ट) अहर्ता, Education Qualification जाणून घेण्यासाठी Departmental PSI Syllabus 2022 in Marathi PDF and Exam Pattern येथे बघा.

वयोमर्यादा

  • अमागास उमेदवार- कमाल वयोमर्यादा-३५ वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार- कमाल वयोमर्यादा-४० वर्षे
  • दिनांक ०१ जानेवारी २०२२ रोजी वयाची गणना केली जाईल.
  • पोलीस उप निरीक्षक, (सेवाप्रवेश) (तिसरी सुधारणा) नियम, २००८ नुसार एखाद्या वर्षी परीक्षा न झाल्यामुळे कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेच्या सलग तीन संधी मिळाल्या नसतील अशा उमेदवारांना कमाल वयोमर्यादेनंतर सलग होणा-या परीक्षेस बसण्याच्या उर्वरित संधी देण्यात येतील. तथापि, कोणत्याही परिस्थितीत या सलग संधी तीन पेक्षा जास्त असणार नाहीत.
  • कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेच्या सलग तीन संधी मिळूनही उमेदवाराने एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केलेला नसेल तर संबंधित उमेदवाराने सदर परीक्षेची संधी घेतली असे मानण्यात येईल.
  • सेवाप्रवेश नियमातील कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षेच्या कमाल संधी बाबत कोणतीही मर्यादा लागू नाही.
  • विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.

MPSC PSI Departmental Exam : अर्ज करण्याची पद्धत

  • Online पद्धत

परीक्षा शुल्क

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 344 रुपये
  • अमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 544 रुपये एवढे परीक्षा शुल्क असेल.

Prelims परीक्षा केंद्र

MPSC PSI Departmental Exam : Salary

वेतन :- S-14 : 38600-122800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

Important Date

  • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:-6 मार्च 2022
  • शनिवार, दिनांक 16 एप्रिल, 2022 ला Exam होईल

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा- 2021 मुंबई सह महाराष्ट्रातील 7 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.

MPSC Departmental PSI Exam Syllabus & Exam Pattern

MPSC Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Exam च्या Syllabus आणि Exam Pattern विषयी संपूर्ण माहिती खाली दिलेल्या Link वर Click करून जाणून घ्या.

Online अर्ज कसा कराल

नवीन पद्धतीनुसार Online अर्ज करण्याची पद्धत त्याचबरोबर Profile Update कशी कराल याविषयी या दिलेल्या Link वर Click करून माहिती जाणून घ्या.

Download Official NotificationDownload
Apply OnlineVisit Here

MPSC Departmental PSI Exam PDF Notes

2 thoughts on “MPSC PSI Departmental Exam 2022 जाहिरात आलेली आहे | MPSC PSI Departmental Exam Notification 2022 Out”

Leave a Comment