आजपर्यंत राज्यभरातील गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील सर्व सरळसेवेतील पदे हे जिल्हा /प्रादेशिक /राज्यस्तरीय निवडसमित्यांच्या माध्यमातून भरण्यात येत होत्या.आणि फक्त मंत्रालयातील गट ‘क’ संवर्गातील लिपिक वर्गीय पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात होती, याच परीक्षेला आपण MPSC Combine Group ‘C’ या नावानेही आळखतो.
परंतु सरळ सेवेतील होणारी पदभरती हि अधिक पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी या परीक्षा देखील MPSC च्या माध्यमातूनच घेतली जावी अशी मागणी वेळोवेळी विद्यार्थ्यांकडून केली जात होती, आता या मागणीला यश आलेले आहे.
आता या पुढे होणाऱ्या सर्व सरळ सेवेतील पदांची भरती हि MPSC आयोगामार्फत होईल असा शासनाने जीआर काढलेला आहे.
- हा संपूर्ण जीआर Pdf मध्ये येथून Download करा.