महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ने दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी MPSC ASO Departmental Exam 2021 Recruitment । सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा जाहिरात २०२१ प्रसिद्ध केलेली आहे.
सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा साठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख दिनांक : ०३ जानेवारी, 2022 रोजी दुपारचे ०२:०० वाजता पासून ते दिनांक : २४ जानेवारी २०२२ च्या रात्री ११:५९ Min. पर्यंत शेवटची तारीख असेल.
MPSC ASO Departmental Exam 2021-2022 Recruitment
MPSC ASO Departmental Exam 2021-2022 Recruitment | सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा जाहिरात २०२१-2022
पदाचे नाव | ASO / सहाय्यक कक्ष अधिकारी (Departmental) |
एकूण जागा किती? | (1) मंत्रालयीन विभाग – 83 जागा (2) महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय – 10 जागा |
अर्ज पद्धत | Online |
परीक्षा पद्धत | Offline |
पगार किती असेल? | 38,600-1,22,800 |
अर्ज कधी करायचा | दिनांक : ०३ जानेवारी, 2022 ते दिनांक : २४ जानेवारी २०२२ पर्यंत कधीही करू शकता. |
परीक्षा शुल्क | अमागास : ७१९ Rs. मागास : ४४९ Rs. |
परीक्षा कधी होईल | Date : 06 March 2022 |
Deparmental ASO पात्रता | अर्ज कोण करू शकतो ?
सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा अर्ज कोण करू शकतो ?
मंत्रालयातील प्रशासकीय विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील लिपिक, लिपिक-टंकलेखक या पदांवर जे कर्मचारी कार्यरत आहेत त्या कर्मचाऱ्यांना सहायक कक्ष अधिकारी या पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी फक्त मुंबई येथे हि स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येत असते.
१ जानेवारी २०२२ पर्यंत लिपिक, लिपिक-टंकलेखक या पदांवर जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांची किमान नियमित सलग सात वर्ष सेवा झालेली असावी.
नियमित सलग सात वर्ष सेवा म्हणजे :
१) अनुकंपा तत्वावर नेमणूक झालेले : सात वर्ष नियुक्तीच्या दिनांकापासून
२) पदोन्नती कर्मचारी : पदोन्नतीच्या तारखेपासून सात वर्ष
परीक्षेकरीता अर्ज करण्याची पद्धत | अर्ज कसा करायचा ?
अर्ज सादर करण्याचे टप्पे :-
- आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापुर्वी नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते (Profile) तयार करणे.
- खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत (Update) करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
विहित कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणे :-
- उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना लिपिक-टंकलेखक/टंकलेखक पदावरील अनुभवासंदर्भात सोबतच्या विवरणपत्र – २ मधील विहित नमुन्यात सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे.
सर्वसाधारण:-
- अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
- अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- https://mpsconline.gov.in
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.