MPSC ASO Departmental Exam 2022 Recruitment | सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा जाहिरात २०२2

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ने दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी MPSC ASO Departmental Exam 2021 Recruitment । सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा जाहिरात २०२१ प्रसिद्ध केलेली आहे.

सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा साठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख दिनांक : ०३ जानेवारी, 2022 रोजी दुपारचे ०२:०० वाजता पासून ते दिनांक : २४ जानेवारी २०२२ च्या रात्री ११:५९ Min. पर्यंत शेवटची तारीख असेल.

MPSC ASO Departmental Exam 2021-2022 Recruitment

MPSC ASO Departmental Exam 2021-2022 Recruitment | सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा जाहिरात २०२१-2022

पदाचे नावASO / सहाय्यक कक्ष अधिकारी (Departmental)
एकूण जागा किती?(1) मंत्रालयीन विभाग – 83 जागा
(2) महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय – 10 जागा
अर्ज पद्धतOnline
परीक्षा पद्धतOffline
पगार किती असेल?38,600-1,22,800
अर्ज कधी करायचादिनांक : ०३ जानेवारी, 2022
ते
दिनांक : २४ जानेवारी २०२२
पर्यंत कधीही करू शकता.
परीक्षा शुल्कअमागास : ७१९ Rs.
मागास : ४४९ Rs.
परीक्षा कधी होईलDate : 06 March 2022

Deparmental ASO पात्रता | अर्ज कोण करू शकतो ?

सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा अर्ज कोण करू शकतो ?

मंत्रालयातील प्रशासकीय विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील लिपिक, लिपिक-टंकलेखक या पदांवर जे कर्मचारी कार्यरत आहेत त्या कर्मचाऱ्यांना सहायक कक्ष अधिकारी या पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी फक्त मुंबई येथे हि स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येत असते.

१ जानेवारी २०२२ पर्यंत लिपिक, लिपिक-टंकलेखक या पदांवर जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांची किमान नियमित सलग सात वर्ष सेवा झालेली असावी.

नियमित सलग सात वर्ष सेवा म्हणजे :
१) अनुकंपा तत्वावर नेमणूक झालेले : सात वर्ष नियुक्तीच्या दिनांकापासून
२) पदोन्नती कर्मचारी : पदोन्नतीच्या तारखेपासून सात वर्ष

परीक्षेकरीता अर्ज करण्याची पद्धत | अर्ज कसा करायचा ?

अर्ज सादर करण्याचे टप्पे :-

  • आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापुर्वी नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते (Profile) तयार करणे.

  • खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत (Update) करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
  • परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.

विहित कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणे :-

  • उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना लिपिक-टंकलेखक/टंकलेखक पदावरील अनुभवासंदर्भात सोबतच्या विवरणपत्र – २ मधील विहित नमुन्यात सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे.

सर्वसाधारण:-

  • अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

Download Departmental ASO Syllabus and Exam Pattern

Leave a Comment