MPSC News Update 24/01/२०२२ : २६ फेब्रुवारी २०२२ ला होणाऱ्या MPSC Combine Group ‘B’ Prelims २०२१ करीता दिनांक १७ डिसेंबर २०२१ या तारखेला नव्याने पात्र ठरलेल्या व याआधी अर्ज सादर करु न शकलेल्या (कमाल वय मर्यादा ओलांडल्यामुळे) उमेदवारांना दिनांक २७ डिसेंबर, २०२१ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.
आयोगाने दिलेली हि सुविधा फक्त PSI (पोलीस उपनिरीक्षक) या पदासाठी असेल, PSI या पदासाठी अर्ज करण्यासाठी नव्याने पात्र ठरलेल्या व याआधी अर्ज सादर करु न शकलेल्या (कमाल वय मर्यादा ओलांडल्यामुळे) उमेदवारांनी जर अजूनपर्यंत अर्ज केलेला नसेल तर आता या मिळालेल्या संधीचं सोनं करा, हा Chance हरवू नका.
Note : २७ डिसेंबर, २०२१ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकात हि सुविधा PSI या पदासाठी नव्हती त्यामुळे आज दिनांक हि सुविधा फक्त PSI या पदासाठी दिलेली आहे. या संदर्भातील सर्व महत्वाची माहिती खाली पाहा.
MPSC PSI UPDATE 2022
- सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक संवर्गाकरीता अर्ज केलेल्या परंतु वयाधिक ठरल्याने पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी 18.00 वाजल्यापासून दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत
हे सुद्धा पाहा :