नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण How To Prepare UPSC In Marathi Medium | यूपीएससीची तयारी मराठी माध्यमातून कशी करता येईल त्यानंतर त्यासाठी कुठले संदर्भग्रंथ वापरले पाहिजेत?
वैकल्पिक विषयांची निवड कुठल्या पद्धतीने करावी आणि कुठल्या गोष्टी वैकल्पिक विषय निवडताना लक्षात ठेवाव्यात त्याचबरोबर एनसीआरटी वाचावे कि State Board वाचावे कि दोघांची आवश्यकता तितक्याच प्रमाणात आहे का?
यूपीएससी मध्ये महाराष्ट्रातील पास होणाऱ्या मुलांचे प्रमाण आणि त्यातल्या त्यात मराठी माध्यमातून पास होणाऱ्या मुलांचे प्रमाण इत्यादी सर्व गोष्टींवर आपण Focus टाकणार आहोत.
How To Prepare UPSC In Marathi Medium
बरेच अधिकारी तुम्ही आज बघता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन मराठी अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या नावाची
एक वेगळीच उंची त्यांनी गाठलेली आहे जसे तुकाराम मुंडे साहेब झाले आयपीएस विश्वास नागरे पाटील सर झाले त्यानंतर असे अनेक अधिकारी आहेत ज्यांनी बाहेर राज्यात जाऊन आपल्या महाराष्ट्राची मान उंचावलेली आहे.
अशा विद्यार्थ्यांची अशा अधिकार्यांची आज भारताला गरज आहे आणि फक्त इंग्रजी या विषयाची भीती या कारणांमुळे जर तुम्ही या क्षेत्रात येत नसाल तर कदाचित पुढच्या अधिकाऱ्याला खाली ठेवतोय त्यामुळे हे अधिकारी वर यावेत हे आमची प्रामाणिक इच्छा आहे म्हणून हि upscmaterial.in Website तुच्यासाठी मोफत मदतीचा हात देत आहे.
तर सगळ्यात पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो की आमचं बेसिक एज्युकेशन मुळात दहावी असेल बारावी ते Graduation असेल तर मराठी माध्यमातून झालेले आहे आणि त्याच वेळेस मनात भीती असते की मराठी माध्यमातून एज्युकेशन झाल्यामुळे आपण कशा पद्धतीने सामोरे जाणार किंवा इंग्लिश ला आपण कशा पद्धतीने Tackle करणार ही भीती असल्यामुळे भरपूर विद्यार्थी या क्षेत्राकडे वळत नाही.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडे प्लस पॉईंट हा आहे की त्यांची मेहनत करण्याची ताकद आणि त्यांची एकूण विचार करण्याची क्षमता ही खूप जास्त असल्यामुळे त्यांना यूपीएससी सारख्या क्षेत्रांमध्ये खूप जास्त स्कोप आहे.
त्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त यूपीएससी क्षेत्राकडे वळावे आणि त्यातून एक चांगली पोझिशन चांगली पोस्ट घेऊन समाजाचा विकास करणं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे.
तर चला आता How To Prepare UPSC In Marathi Medium | UPSC ची तयारी मराठी माध्यमातून कशी करावी ? किंवा कशी करता येईल या विषयी Step By Step माहिती घेऊयात. तर त्याआधी भरपूर नवीन विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो कि,
Can we give upsc in marathi ?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे. होय, तुम्ही मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेत UPSC ची परीक्षा देऊ शकता. फक्त Prelims परीक्षा हिंदी व इंग्रजीमध्येच घेतल्या जातात. परंतु, Mains साठी आपण २२ भाषांपैकी कोणतीही एक भाषा निवडू शकता ज्यात इंग्रजी, हिंदी तसेच मराठीचा समावेश आहे.
UPSC & The Hindu News Paper
सगळ्यात पहिली गोष्ट UPSC & The Hindu News Paper असे समीकरण सांगितले जाते आणि बऱ्याच मुलांना पहिला प्रश्न किंवा पहिली भीती असते कि द हिंदू खरंच वाचला गेला पाहिजे का?
UPSC करतांना द हिंदूच वाचला पाहिजे असं काही नाही तो फक्त एक चांगल्या वर्तमानपत्रांपैकी एक आहे. तुम्ही दुसरा न्युज पेपर रेफर करू शकतात असं आवश्यक नाही कि तुम्ही तोच पेपर केला पाहिजे. तुम्ही The Hindu, IndianExpress किंवा Times Of India तुम्हाला जो आवडतो तो करा आणि त्यासोबत लोकसत्ता सारखा एक मराठी वर्तमानपत्र रेफर करा.
News Paper चांगल्या पद्धतीने वाचल्यामुळे तुमची विचार करण्याची कक्षा रुंदावते आणि तुम्ही Analytically विचार करू शकता जी मुळात UPSC ला पाहिजे. UPSC ला पाठांतर नाही तर Analysis पाहिजे.
एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन कसा आहे, आणि तो दृष्टिकोन मॉनिटर करण्यासाठी तुम्हाला तुमचे स्वतःचे अनालिसिस करणं किंवा ज्या घटना घडतात ज्याला आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो म्हणजे ज्या ओळी दिसत आहे त्याच्या मध्ये त्याच्या आत काय दडलंय ते शोधून काढतात त्याचीच रिक्वायरमेंट तुम्हाला येथे यूपीएससीमध्ये आहे.
State Board Books & NCERT Books
तुम्ही अगोदर तुमची स्टेट बोर्ड आणि NCERT ची पुस्तके पाचवी ते बारावीपर्यंतच्या Books चे वाचन व्यवस्थित केलेले असेल तर असे म्हणता येईल की तुमचा 40% पेक्षा जास्त अभ्यास झालेलं आहे.
लिंक : NCERT आणि State Board ची Books नेमकी वाचायची कशी ?
हा अभ्यास झाला आहे की नाही हे तुम्ही कसे चेक करणार? तर तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिस क्वेश्चन किंवा ज्याला आपण Mock Test असं म्हणतो ते जर तुम्ही Solve केलेत तर तुम्हाला याची खात्री येईल की तुमचा खरंच किती अभ्यास झालेला आहे.
NCERT ची Books वाचतांना त्यांची जी Basic Requirement आहे ती Fulfill करायची असते परंतु येथे प्रश्न असा येतो कि हि books एकतर English किंवा Hindi मध्ये Available आहे आणि येथे आपल्या मुलांची दोन्ही भाषेत बोंबाबोंब आहे हि books वाचतांनाच तुम्हाला कळेल कि तुम्ही UPSC करू शकणार कि नाही.
MPSC V/s UPSC
MPSC राज्य स्तरावर group a, b, आणि c च्या post साठी अधिकाऱ्यांची भरती करण्याचे काम करत असते त्याचप्रमाणे यूपीएससी केंद्रीय स्तरावर group a, b, आणि c च्या post साठी अधिकाऱ्यांची भरती करण्याचे काम करत असते.
परंतु MPSC आयोग अनिश्चित आहे म्हणजेच एक्झाम कधी होईल आणि रिजल्ट कधी लागेल, निघणाऱ्या जागा इत्यादी हे निश्चित नसते त्यामानाने UPSC खूप प्रेडिक्टेबल आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यु पी एस सी टाइम टेबल एक वर्ष आधी तुम्हाला देत असतो जागा देखील निश्चित आणि भरपूर हे आधीच एक वर्ष आधीच माहिती देत असतो.
Exam पासून ते Result पर्यंतची process तारखे सहित आधीच ठरलेली असते. त्यामुळे तुम्ही तुमचे टारगेट सेट करू शकतात MPSC एक्झामची तुमच्याकडे Visibility नसते की एक्झाम कधी होईल आणि Result कधी लागेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि परत तुम्ही किती वेळ वाट बघू शकतात बरोबर आहे.
विध्यार्थी मित्रांना आम्ही हे सांगू इच्छितो की जर तुम्हाला खरच कमी वेळेमध्ये तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर पहिला आणि प्रामाणिक सजेशन हे राहील की तुम्ही अभ्यास करतांना पोस्ट लक्षात ठेवून अभ्यास करू नका सगळ्यात पहिला अभ्यास करून घ्या त्यानंतर Exam ला फेस करण्याची तयारी करा.
नाहीतर आपला Pattern काय असतो एप्रिलमध्ये राज्यसेवा होते त्यानंतर जुलैमध्ये कम्बाईन एक्झाम होते मग टॅक्स असिस्टंट आणि आपला अभ्यास सुरूच असतो आणि आपण सगळ्याच Exam देत जातो आणि कुठल्याही पद्धतीने पूर्ण होत नाही.
प्रामाणिक सजेशन हे आहे की तुम्ही सुरुवात करताना तुमचे State Board आणि NCERT ची Books आणि जी काही Authentic Reference Books आहेत ज्या मध्ये UPSC चा संदर्भ घेतलेला आहे सिल्याबस नुसार डिझाईन केली गेलेली अशी पुस्तक आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमची तयारी करून ठेवतात आणि तुम्ही मग कुठलीही Exam Face करा तुम्हाला त्यात यश भेटणं शक्य होईल.
Understanding Competition
MPSC वाईट नाही मित्रांनो परंतु येथे तुम्ही Competition बद्दल समजून घ्या अभ्यास करताना वरची लेबल का ठेवली पाहिजे कारण जर बघा सर्वात जास्त Competition कुठे आहे ह्या खालच्या क्षेत्रात आहे बरोबर आहे आणि आपण कुठे तयारी करतो नेमकं याच क्षेत्रात तयारी करतो.
म्हणजे फॉर एक्झाम्पल PSI, STI, ASO असेल तुमची सगळ्यात जास्त Competition हि ह्याच क्षेत्रात असल्यामुळे इथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आणि त्या तुलनेने निघणाऱ्या पोस्ट/जागा या खूपच कमी आहे. जेवढे जास्त विद्यार्थी तेवढ्या कमी जागा हा त्यांचा Ratio आहे.
त्यानंतर राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे त्या तुलनेने जेवढे विद्यार्थी पोलीस भरती, PSI, STI, ASO या Posts साठी अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यामानाने जागा खूपच कमी आहेत. आणि त्यातल्या त्यात मग UPSC करणाऱ्यांची संख्या तर आणखीनच कमी आहे.
म्हणजेच काय तर UPSC मध्ये कमी Competition जास्त जागा हे असताना सुद्धा येथे विद्यार्थी संख्या कमी आहे त्याचं कारण काय तर तुमच्या मनातील भीती.
Importance Of Understanding Syllabus
ही जर भीती काढायची असेल तर आपल्याला युपीएससी चा Syllabus आहे तो पूर्णपणे माहीत असणं आवश्यक आहे. Exam चा Syllabus तुमच्या सोबत किंवा Tip Of The Tongue म्हणजेच तोंडपाठ असला पाहिजे तुमच्या मनात हा Syllabus लक्षात असला पाहिजे.
जर तुम्ही प्रामाणिक या Syllabus नुसार UPSC ची तयारी करत असाल तर पूर्णपणे या खालच्या पोस्ट काढताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
जर आपण मागच्या काही Exams चा अनुभव जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की लास्ट इयर ला एमपीएससी मधून पास होणाऱ्या मुलांची संख्या जास्त होती, आणि हे विद्यार्थी बेसिकली यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी होते सगळेच विद्यार्थी आहेत का असे मी म्हणणार नाही परंतु त्यातील Maximum विद्यार्थी हे UPSC ची तयारी करणारे होते.
किंवा मागच्या वर्षी PSI, STI, ASO चा Result लागलेला होता त्यात तुम्हाला जाणवेल कि जास्तीत जास्त विद्यार्थी हे राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करणारे होते. याचाच अर्थ असा होतो कि जर तुम्ही तुमचं Preparation जर वरच्या Level वर केलं तर तुम्ही Group ‘B’ आणि Group ‘C’ Level च्या Exams Easily Secure करू शकता.