MPSC साठी Polity चा अभ्यास कसा करावा | How to Study Polity for MPSC

MPSC COMBINE पुर्व परीक्षेसाठी जर तुम्ही INDIAN POLITY (भारतीय राज्यव्यवस्था) या विषयाचा MPSC Combine Prelims Syllabus वाचलेला असेल तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल कि, Polity संदर्भात आयोगाने दिलेला Syllabus हा एका ओळीत दिलेला आहे. म्हणजेच काय तर अभ्यास करतांना तर भरपूर Topics वाचायचे असतात आणि Syllabus बघितला तर त्यामानाने खूपच कमी आहे तर अशावेळी नेमका अभ्यास करायचा कसा.

परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचं झाल तर आपल्याला कोणकोणते Sub Topics करावे लागतील आणि कोणत्या Topics वर जास्त भर द्यावा लागेल म्हणजेच polity important topics for mpsc. याच मुद्द्यांना गृहीत धरून तुम्हाला योग्य दिशा देण्यासाठी हा लेख पूर्णपणे समर्पित आहे.

वरील दोन पॅराग्राफ मध्ये असलेल्या मुद्द्यांना अनुसरून तुमच्या अभ्यासात मदत होईल अशी विस्तृत Strategy खाली दिलेली आहे.

COMBINE पुर्व परीक्षेसाठी INDIAN POLITY (भारतीय राज्यव्यवस्था) या विषयाचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे :

 • नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).

आयोगाने SYLLABUS मध्ये नागरिकशास्त्र असा उथळ उल्लेख केला आहे.

परंतु PREVIOUS YEAR QUESTIONS चा अभ्यास व आयोगाचा APPROACH बघितल्यावर वरील आयोगाने दिलेला SYLLABUS तोकडा पडतो. त्यामुळे खालील दिलेला उपघटक अभ्यास करतांना COVER केल्यास POLITY चा SYLLABUS चांगला पद्धतीने COVER होतो. { 80% – 90% प्रश्न यामधुनच येतील. }

Polity Important Topics for MPSC

आपण , POLITY चा SYLLABUS 10 स्तंभामध्ये / भागांमध्ये विभागणी केली आहे. त्याप्रमाणे अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना MAXIMUM फायदा होईल.

संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

HISTORICAL BACKGROUND शक्यतो COMBINE ला या घटकावर प्रश्न येत नाही.

 • ऐतिहासिक पार्श्वभूमी
 • संविधानाची निर्मिती

CORE / BASIC संविधान

सर्वात महत्वाचा घटक 3 ते 4 प्रश्न येतात.
कलमे तोंडपाठ करणे आवश्यक. M. LAXMIKANT | कोळंबे मधून COVER करावा.

 • संविधानाची वैशिष्ट्ये
 • घटनेचा सरनामा
 • संघ आणि त्याचे क्षेत्र
 • नागरिकत्व
 • मूलभूत हक्क व कर्तव्ये
 • राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे
 • घटनादुरुस्ती
 • राज्यघटनेची मुलभूत सरचना

शासन पद्धती

COMBINE साठी तितकासा महत्वाचा घटक नाही.

 • यातील केंद्र-राज्य संबंध
 • अंतरराज्य संबंध आणि आणिबाणी हे घटक चांगले करावेत.
 • संसदीय प्रणाली व संघराज्य प्रणाली या घटकांचा CONCEPTUAL अभ्यास करावा.

केंद्रशासन व राज्यशासन

MPSC COMBINE साठी केंद्रशासन या घटकापेक्षा राज्यशासन या घटकावरती जास्त भर द्यावा यांचा COMPARATIVE / तुलनात्मक अभ्यास केल्यास BEST राहील.

केंद्रशासन राज्यशासन

 • राष्ट्रपती
 • उपराष्ट्रपती
 • पंतप्रधान
 • केंद्रीय मंत्रिमंडळ

राज्य विधानमंडळ

 • राज्यपाल
 • मुख्यमंत्री
 • जम्मू काश्मीर साठी वेगळ्या तरतुदी.
 • राज्य मंत्रिमंडळ
संसद आणि राज्य विधानमंडळ

न्यायालयीन व्यवस्था

या TOPIC चा वेगळा अभ्यास करणे गरजेचे. COMBINED पूर्व मध्ये या घटकावर हमखास प्रश्न विचारला जातो. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये गोंधळ उइतो. विद्यार्थ्यांनी COMPARATIVE अभ्यास करावा.

 • SUPREME COURT
 • HIGH COURT
 • SUBORDINATE COURT
 • JUDICIAL REVIEW
 • JUDICIAL ACTIVISM
 • PIL

स्थानिक शासन

आयोगाने SYLLABUS मध्ये “ ग्रामव्यवस्थापन ( प्रशासन ) ” असा उल्लेख केला आहे. त्यामुळे

 • पंचायत राज
 • ग्रामपंचायत
 • पंचायत समिति
 • जिल्हा परिषद यावर विशेष भर द्यावा.

संघराज्य प्रदेश व विशेष क्षेत्रे

 • M. LAXMIKANTH मधून हा घटक चांगला COVER होतो.
 • संघराज्य प्रदेश ‘ यावर विशेष भर दयावा.

संविधानिक व बिगर संविधानिक संस्था

 • महत्वाचा व चर्चेत असलेल्या संस्थांचा अभ्यास करावा.
 • जसे की १०२ ची घटनादुरुस्तीने BACKWARD CLASS COMMISSION ला घटनात्मक दिल्यामुळे आयोगाने प्रश्न विचारला होता.
 • तसेच NITI आयोग, माहिती आयोग ई. सध्या चर्चेत असल्यामुळे यावर विशेष भर दयावा.

इतर घटनात्मक बाबी

 • सहकारी संस्था
 • कार्यालयीन भाषा
 • TRIBUNALS
 • SPECIAL PROVISIONS FOR CERTAIN
 • CLASSES
 • ANTI-DEFECTION LAW

IMPORTANT TOPICS

या खाली दिलेल्या घटकांवरती आयोग हमखास 2 – 3 प्रश्न विचारते. परंतु विद्यार्थी या घटकांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे या घटकांचा विशेष अभ्यास करणे आवश्यक आहे.

 • केंद्र, राज्य व समवती सूची
 • ORDER OF PREDENCE ( अग्रक्रम तालिका )
 • महत्त्वाची कलमे
 • परिशिष्टे ( SHEDULE )
 • घटनेची स्त्रोत
 • घटनेचा भाग ( PARTS )
 • महत्त्वाच्या घटनादुरुस्ती महत्त्वाचे खटले ( CASES )

आयुषाच्या महामार्गावरून प्रवास करताना तुमची नजर ध्येयावर असु दया. नेमक मुद्दयाच काय ते पहा अनावश्यक, किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करा.

Leave a Comment