राज्यव्यवस्था अभ्यासक्रम (Polity Syllabus):-
महाराष्ट्र आणि भारत – राज्यव्यवस्था आणि प्रशासन – संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नागरी प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्कांच्या समस्या इ.
Maharashtra and India – Polity and Governance-Constitution, Political System, Panchayati Raj, Urban Governance, Public Policy, Rights Issue etc.
MPSC राज्यव्यवस्था (Polity) पेपर विश्लेषण
मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण:-
घटकनिहाय प्रश्न:-
2013
घटनानिर्मिती प्रक्रिया,मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मुख्यमंत्री, मूळ अधिकारिता(न्यायालय)
राष्ट्रपती, पंचायत राज,आणीबाणी, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, लोकपाल व लोकायुक्त व इतर.
2014
राज्य निर्मितीची प्रक्रिया, नागरिकत्व, मुलभूत हक्क, विधानसभा, संसद घटनादुरुस्ती, गोलखनाथ खटला, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग व इतर.
2015
ब्रिटिश राज्यघटना, मूलभूत कर्तव्य, न्यायालयीन पुनर्विलोकन, राज्यघटनेची मूलभूत चौकट. महासचिव, राज्य प्रशासकीय लवाद.
2016
घटना निर्मिती प्रक्रिया, मार्गदर्शक तत्त्व, राष्ट्रपतींचा नकाराधिकार,संसदेची संयुक्त बैठक, वटहुकूम, पंतप्रधान, राज्यपाल, केंद्र राज्य संबंध, घटनादुरुस्ती, पदनाम श्रेणी,केंद्रीय लोकसेवा आयोग, राजकीय पक्ष.
2017
घटनानिमिर्तीची पार्श्वभूमी (भारत सरकार कायदे), न्यायालयीन पुनर्विलोकन, संसद, राज्यपाल, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली, केंद्र-राज्य संबंध, ७३ वि घटनादुरुस्ती, ग्रामपंचायत, आणीबाणी, घटनादुरुस्ती, विभागीय परिषदा, राष्ट्रीय मानवाधिकार, आंतरराष्ट्रीय न्यायालय.
2018
घटनानिर्मितीची प्रक्रिया, प्रजासत्ताक राज्य, राज्यघटनेची परिशिष्ट, राज्यनिर्मिती, मूलभूत अधिकार, मार्गदशक तत्व, उपराष्ट्रपती, लोकसभा, शून्य प्रहार, संसद न्यायालयीन खटले, हिंदी भाषेचा प्रचार, विभागीय परिषदा, दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग.
2019
भारतीय स्वातंत्रयाचा कायदा-१९४७, संविधान सभा, संघराज्याक्षेत्र, राज्यनिर्मिती, मुलभूत हक्क, न्यायालयीन पुनर्विलोकन, उपराष्ट्रपती, अविश्वास ठराव, राज्यपाल, राज्यविधिमंडळ विधेयक, विधानपरिषद, ४४वी घटनादुरुस्ती, राज्यपाल, निवडणूक आयोग, लोकन्यायालय.
संदर्भ पुस्तके:-
M Laxmikant
रंजन कोळंब
१२ वी स्टेट बोर्ड
11th NCERT (Constitution at work)
राज्यव्यवस्था या घटकाची तयारी कशी करायची याबाबत खाली सविस्तर माहिती दिलेली आहे.
- राज्यघटना व राजकीय व्यवस्था
राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया, घटना समिती, तिचे सदस्य, उपसमित्या व त्यांचे विषय व सदस्य माहीत असायला हवेत. घटनेवरील वेगवेगळ्या विचारसरणीचा व कायदे तसेच राज्यघटनांचा प्रभाव याचा आढावा घ्यायला हवा.
घटनेच्या सरनाम्यातील धीनरपेक्ष, लोकशाही आणि समाजवादी तत्वज्ञान, हेतू समजावून घ्यावे.
घटनेतील सगळ्या कलमांचा अभ्यास आवश्यक नाही. मूलभूत हक, राज्याची नीतिनिर्देशक तत्वे, मूलभूत कर्तव्ये याबाबतची कलमे बारकाईने अभ्यासाचीत. प्रशासकीय, आर्थिक, न्यायिक व इतर बाबतीत केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे त्याबाबतची कलमे नीट समजून घ्यायला हवीत. याबाबत घटनेच्या सातव्या अनुसूचीचा संदर्भ घ्यावा. विशेषतः चालू घडामोडींच्या संदर्भात या बाबी महत्त्वाच्या आहेत.
घटनात्मक पदे, आयोग अभ्यासताना संबंधित कलम, कार्य, अधिकार, नेमणुकीची पद्धत, पदावरून काढण्याची पद्धत, सध्या त्या पदावरील व्यक्तीचे नाव हे मुद्दे पाहावेत. यामध्ये पुढील बाबी अभ्यासाव्यात – निवडणूक आयोग, केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, मानवी हका आयोग. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग, नदी पाणी वाटप लवाद, भारताचा महाअधिवक्ता, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग)
प्रशासकीय सुधारणा आयोगांच्या ठळक शिफारशींचा आढावाही उपयुक्त ठरू शकेल.
घटनादुरुस्ती व न्यायिक पुनर्विलोकन हे दोन मुद्देही महत्त्वाचे आहेत. घटनादुरुस्ती प्रक्रिया आणि महत्वाच्या मुद्दयांबाबतच्या घटनादुरुस्त्या माहीत करून घ्याव्यात.
उच्च व सर्वोच्च न्यायालयांविषयीची महत्त्वाची कलमे, न्यायाधीशांच्या नेमणुका, पदावरून दूर करणे, अधिकार, कार्यपद्धती इत्यादी बाबींचा आढावा घ्यावा.
सर्वोच्च न्यायालयाचे घटनेचा अर्धविशद करणारे तसेच मूलभूत हयांबाबतचे महत्त्वाचे निर्णय माहीत असणे आवश्यक आहे.
निवडणूक प्रक्रियेमध्ये आयोगांची रचना, सदस्यत्वासाठीचे निकष, कायें, अधिकार, आयोगाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय व नियम, पक्षांतर बंदीबाबतच्या घटनादुरुस्त्या, निवडणूक सुधारणा व त्याबाबतच्या समित्यांच्या ठळक शिफारसी, मतदारांचे वय, ओळखपत्रे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर, निवडणूक खर्चाच्या मर्यादा, उमेदवारांच्या अर्हता, अपात्रता, आदर्श आचारसंहिता त्याबाबतचे निर्णय अशा चाची महत्त्वाच्या आहेत. विशेषता लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या वर्षामध्ये याबाबत जास्त बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.
राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठीचे निकष, यामध्ये झालेले बदल, पक्षांचे वित्तीय व्यवहार इत्यादी मुत्यांचा विचार करावा. राष्ट्रीय पक्षांची स्थापना, संस्थापक, अजेंडा, त्यांच्या वाटचालीतील ठळक टप्पे, महत्त्वाच्या घटना व मुद्दे या आधारावर ६ राष्ट्रीय पक्षांचा अभ्यास करावा.
राज्य निवडणूक आयोगाबाबतही या मुद्यांच्या आधारे अभ्यास करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य शासनाचे महत्त्वाचे निर्णय समजून घ्यावेत.
- राजकीय व्यवस्था व स्थानिक स्वराज्य संस्था
केंद्र व राज्य शासनाचे कार्यकारी मंडळ यांचातुलनात्मक कोष्टकामध्ये अभ्यास शक्य आहे. कार्यकारी प्रमुख, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, संसदीय समित्या यांबाबतच्या दोन्ही स्तरांवरील तरतुदी, त्यांची कलमे आणि याबाबतचे साम्यभेद अशी टिप्पणे काहल्यास लक्षात राहणे सोपे होते. कायदा निर्मितीची प्रक्रिया, विधेयके, त्यांचे प्रकार या बाबीही महत्त्वाच्या आहेत.
भारताला महत्त्वाच्या संघटनांचे सदस्यत्व, आंतरराष्ट्रीय संस्थांमधील भारतीयांची नियुक्ती, संयुक्त युद्धाभ्यास, आंतरराष्ट्रीय करार/ठराव यांबाबत भारताची भूमिका या बाबींवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. शेजारी देशांशी झालेले महत्त्वाचे करार किंवा विवाद यांचा आढावाही आवश्यक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत ७३वी व ७४वी घटनादुरुस्ती यांमधील महत्त्वाच्या तरतुदी समजावून घ्याव्यात. विशेषतः घटकराज्यांना दिलेले अधिकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना, कार्ये, जबाबदाऱ्या, अधिकार, उत्पन्नाची साधने, राज्य निवडणूक आयोग व राज्य वित्त आयोग या बाबी समजून घ्याव्यात. याबाबत स्थापन करण्यात आलेल्या महत्वाच्या समित्या आणि त्यांच्या हळक शिफारसी यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
नागरी स्थानिक शासनातील महानगरपालिका, नगर परिषद व कटक मंडळे यांचे स्वरूप, रचना, कार्ये, अधिकार व जबाबदाऱ्या या अनुषंगाने अभ्यास करावा. नागरी स्थानिक शासन प्रकारासाठीचे निकष समजून घ्यायला हवेत.
- सार्वजनिक धोरणे
शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सामाजिक बांचा विकास, आर्थिक विकास, दारिन्य निर्मूलन, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, संशोधन, ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन याबाबतची केंद्र व राज्य शासनाची धोरणे व योजना यांचा उद्देश, कालावधी, लाभाथीं, लाभाचे स्वरूप अशा ठळक मुद्यांच्या आधारे आढावा घ्यावा, केंद्र व राज्य शासनाच्या तीव्रपणे प्रसिद्धी करण्यात येणाऱ्या योजनांचा अपेक्षित यादीमध्ये समावेश करावा.
- हक्कविषयक मुद्दे
संयुक्त राष्ट्र संघटनेचा मानवी हकांचा जाहीरनामा, राज्यघटनेतील मानवी हकविषयक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे हक्क विषयक निवाडे यांचा आढावा घ्यावा.
महिला, बालके, अपंग व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गातील लोकांच्या हकांबाबतच्या राज्यघटनेतील तसेच विविध कायद्यांद्वारे चिहित तरतुदी मुख्य परीक्षेच्या पेपर दोन आणि तीनमध्ये अभ्यासायच्या आहेतच. त्यांचा पूर्वपरीक्षेतील या घटकाच्या तयारीमध्ये नकोच फायदा होतो.
- चालू घडामोडी
केंद्र व राज्य शासनाचे चर्चेतील कायदे / विधेयके, सर्वोच्च न्यायालयाचे चर्चेतील निकाल, निवडणुका, संरक्षणविषयक तरतुदी, राजकीय आंदोलने अशा बाबी चालू घडामोडींमध्ये समाविष्ट होतात. या घडामोडौंच्या अनुषंगाने राज्यघटनेतील तरतुदी, संबंधित कायद्यातील तरतुदी अशा बाबींचा आढावा घेणे आवश्यक ठरते.
खाली दिलेली राज्यव्यवस्था Topics List हि खूप Important आहे
1 घटनानिर्मिती
- घटनेची वैशिष्ट्ये
- उद्दिष्टांचा ठराव
2 प्रस्तावना
- खटले
3 संघराज्ये राज्यसक्षेत्रे
- कलाम ३ (प्रक्रिया)
- घटनेची संघराज्यीय व एकात्म वैशिष्ट्ये
- राज्यस्थापनेचा क्रम
4 नागरीकत्व
- नोंदणी
- स्वीकृती
- नागरिकांत काढून घेणे
5 मुलभूत हक्क
- कलाम १३ ते ३२
6 मार्गदर्शक तत्वे
7 मूलभूत कर्तव्य
- कर्तव्यांचा क्रम
- वर्मा समिती
8 घटनादुरुस्ती
- अलीकडील पाच घटनादुरुस्त्या
- घटनादुरुस्ती क्रमांक
- घटनादुरुस्ती उद्देश्य
9 राष्ट्रपती
- महाभियोग
- क्षमादानाचा अधिकार
10 प्रधानमंत्री मंत्रिमंडळ
- कलाम ७८
- १६,५२,९१ वि घटनादुरुस्ती
11 महान्यायवादी
12 संसद
- लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रक्रिया (पुनर्रचना आयोग)
- जागा रिक्त होणे
- लोकसभा सभापती, लोकसभा विसर्जनाचा परिणाम
- संसदीय कामकाजाची साधने
- संयुक्त संसदीय समिती ( JPC )
- SC & ST राजकीय आरक्षण – L.S & R.S
13 न्यायव्यवस्था
- SC, HC प्रारंभिक अधिकारक्षेत्र
- सरन्यायाधीश नियुक्ती
- ग्रामन्यायालये, लोकअदालती
- लोकपाल, लोकायुक्त, कौटुंबिक न्यायालय
- NALSA
- आंतरराष्ट्रीय न्यायालय
14 राज्यपाल
- राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या अधिकारांची तुलना
- उदा. क्षमादान
15 ३७१ कलाम
- वैधानिक विकास महामंडळ
16 मुख्यमंत्री मंत्रिमंडळ
- केंद्राबरोबर तुलना कलाम ७८ आणि कलाम १६७ तुलना
17 महाधिवक्ता
- महान्यायवादी बरोबर तुलना
18 राज्यविधिमंडळ ( combine साठी महत्वाचा टॉपिक)
- विधानमंडळाची रचना
- विधानपरिषद कलाम १६९,१७१
- विधानसभा अध्यक्ष ३३ वि घटनादुरुस्ती
19 केंद्र राज्य संबंध
- कलम ३६५, २५६
- आयोग
- इतर सर्व कलमे
20 आंतरराज्यीय संबंध
- कलाम २६२ लवाद स्थापन वर्ष, कायमस्वरूपी लवाद
- कलाम २६३
- आंतरराज्यीय परिषद, विभागीय परिषद, कलाम ३३१( SC )
21 आणीबाणी
- S.R बोम्मई खटला
- आणीबाणी असताना- मूलभूत हक्कासोबत तुलना करा
22 केंद्रशासित प्रदेश
- सर्व कलमे पाहायची आहे
- दिल्ल्ली बद्दल माहिती ( निवडणूक )
- J&K आणि लद्दाख, दिसू दमण आणि DNH
23 भाषा
- कलाम ३४८, अभिजात भाषा, ८ वे परिशिष्ट
- तूल्लू भाषा विशेष
24 परिशिष्टये
- तिसरे-शपथ, आठवे-भाषा (एकूण २२ परिशिष्टये)
25 सूची
- केंद्रसुची, राज्यसूची, सामावर्तीसूची (Combine साठी महत्वपूर्ण टॉपिक)
26 आयोग
- नीती आयोग
- मागासवर्गीय आयोग कलाम ३४१, कलाम ३३८ B
- मानवाधिकार आयोग
- MPSC , UPSC
- केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग
27 L.S आणि V.S मध्ये — SC ST यांच्या जागांची मुदतवाढ देणाऱ्या घटनादुरुस्त्या
तर अश्या प्रकारे वरील सर्व Subject चे सांगितलेले Topics खूप imp आहेत त्यामुळे काळजीपूर्वक वाचत चला, वरील दिल्या गेलेल्या प्रत्येक Sub Topic वर लवकरात लवकर Notes Provide करून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन, आणि हो Notes update करे पर्यंत उशीर होऊ शकतो दरम्यानच्या काळात तुम्हाला self study सुरु ठेवायचा आहे. त्यात तुम्हाला प्रत्येक विषयानुसार State Board ची पुस्तके Download करून त्याचे short Notes काढून घ्यायचे आहे, आणि त्याला रोज Revise करत राहायचे आहे.
मी केलेला एक छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की Comment करून सांगा आणि मित्रांसोबत नक्की Share करा ह्या मुळे मला motivation मिळते धन्यवाद…