MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2 (CSAT) 2022 in Marathi

राज्यसेवा पूर्व CSAT प्रश्नपत्रिका विश्लेषण

नमस्कार मित्रांनो, नुकताच आपला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला. पेपर ची काठिण्य पातळी सोपे  ते माध्यम स्वरूपाची होती. पेपर चे स्वरूप पाहता ७०-८० अटेंम्प्ट्स हा चांगला प्रयत्न होता असे दिसते.

प्रश्नपत्रिका हे नेहमीच्या स्वरूपाचीच होते जसे कि ५० प्रश्न आकलन, २५ प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित, ५ प्रश्न निर्णय क्षमता. चला तर मग आपण पाहूया कि कोणत्या प्रकारचे उतारे पेपर मध्ये विचारले गेले आणि ते सोडविण्याची पद्धत काय असायला हवी होती तसेच आपण ढोबळमानाने त्या प्रश्नांची उत्तरे देखील पाहून घेऊया.

मागच्या वर्षीच्या तुलनेत पेपर चा दर्जा साधा ते माध्यम अशा स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसतो. आपण आता उतारे आणि त्याची काठिण्य पातळी पाहू. यावरून आपल्याला अंदाज येईन कि कोणता उतारा सोपा होता आणि कोणता डोक्याला थोडा ताण देणारा होता. आपण यासाठी CSAT पेपर चा C सेट सोडवणार आहोत. त्यामुळे तुम्ही देखील c सेट सोबत तुलना करून पाहू शकता.

उताऱ्याचा प्रकारप्रश्नांची संख्याकाठिण्य पातळी
द्विभाषिक उतारे ( ८ उतारे)४० प्रश्नसोपे ते माध्यम
फक्त मराठी  (१ उतारा)५ प्रश्नसोपा
फक्त इंग्रजी ( १ उतारा)५ प्रश्नमध्यम
  • द्विभाषिक उताऱ्यांचे विषय आणि विश्लेषण पाहू.

पुरातत्त्वशास्त्र ( Archaeology ) –

या उताऱ्यावरती ५ प्रश्न विचारलेले होते. यामध्ये एक जोड्या लावा या प्रकारातला प्रश्न होता. बाकीचे प्रश्न हे बहुविधानात्मक होते. बहुविधानात्मक प्रश्नांमध्ये काही कीवर्ड्स त्यांनी दिले होते त्याप्रमाणे फक्त कीवर्ड वर फोकस केले तर उताऱ्यामध्ये थेट उत्तर मिळू शकते. यावरील प्रश्नांची उत्तरे आपण ढोबळमानाने पाहू.

१) पहिल्या प्रश्नामध्ये एकविसाव्या शतकातील पुरातत्व खूप वेगळे असण्याचे कारण विचारले आहे. यासाठी उताऱ्यातील सर्वात शेवटचा पॅराग्राफ वाचून उत्तर मिळू शकत होते. यामुळे पर्याय क्रमांक उत्तर आहे.

२) विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुरातत्व क्षेत्रातील विचारप्रवाह विचारला आहे. याचे उत्तर पहिल्या पॅराग्राफ मध्ये मिळत आहे. पहिल्या पॅरा मध्ये शेवटच्या दोन ओळी मध्ये उत्तर सापडते. यामुळे पर्याय क्रमांक उत्तर आहे.

३) हा प्रश्न बहुपर्यायी असल्यामुळे थोडा मध्यम स्वरूपाचा हा उतारा होऊ शकतो. प्रश्नात दिलेली  तिन्ही वाक्ये  दुसऱ्या पॅरा मध्ये दिसून येतात. याद्वारे आपण थेट उत्तराकडे जाऊ शकतो. परंतु पर्यायांमध्ये थोडे बुचकळ्यात पडण्याचा कयास दिसतो. तिन्ही योग्य आहेत त्यामुळे ३,४ पर्याय बाद होतो. राहिलेय दोन पर्यायामधील एका मध्ये परिणाम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. C हा कशाचा परिणाम नाही होऊ शकत असा तर्क लावल्यास उत्तर पर्याय क्रमांक येत आहे.

४)   एक जोड्या लावा या प्रकारातला प्रश्न होता जो निरीक्षणाच्या जोरावर सोडवू शकत होतो. एकाचे जरी उत्तर मिळाले असते तरी आपण सोडवू शकलो असतो. यातील लुईस बिनफर्ड हा पर्याय जरी जुळवलं असता तरी थेट उत्तर मिळाले असते कारण b ची जोडी iv असे दाखवणारा एकाच पर्याय होता जो होता पर्याय क्रमांक .

५)  संदर्भाप्रणीत पुरातत्वशास्त्राच्या मते काय बरोबर आहे हे विचारले आहे. उताऱ्यातील शेवटून दुसरा पॅरा. पर्याय a आणि b उताऱ्यामध्ये दिले आहे. बाकी दोन उताऱ्यात स्पष्टपणे दिले नाहीत. उत्तर आहे पर्याय क्रमांक

२०३० मध्ये ४०% पाणी तुटवडा –

या उताऱ्यावर ५ प्रश्न विचारले गेले होते. हा उतारा निरीक्षणात्मक प्रकारचा होता. यामध्ये आपली पहिली स्ट्रॅटेजि ही पहिले प्रश्न वाचून मग उतारा वाचण्याची असायला हवी होती.

प्रश्न वाचताना त्यातून एखादा की वर्ड पकडून त्याभोवती उतारा वाचावा म्हणजे प्रश्न सोडवताना जास्ती वेळ खर्च होत नाही. उतारा वाचताना ते की वर्ड आपण मार्क केले तर नक्कीच फायदा होऊ शकतो.

६)  दुष्काळ सदृश प्रदेशात केंद्रित ताण  पडण्यास कारणीभूत  घटक कोणते असा प्रश्न विचारला आहे. याचे उत्तर शेवटच्या पॅराग्राफ मध्ये पहिल्या लाईन मध्ये आहे. उत्तर पर्याय क्रमांक वाढते शहरीकरण असायला हवे.

७) जागतिक जलदिन कोणता असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला उतारा ना वाचता तुमच्या पूर्व ज्ञानावर देता येऊ  शकतो. याचे उत्तर पहिल्या पॅराग्राफ मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या ओळींमध्ये दिले आहे. पर्याय क्रमांक १) २२ मार्च  याचे उत्तर आहे.

८) सुरक्षित पाण्याचा स्रोत उपलब्ध नसलेले घटक विचारले आहेत. पहिल्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला सरळ सरळ उत्तर शेवटच्या लाईन मध्ये मिळत आहे. त्यामुळे याचे उत्तर वरील पैकी सर्व, पर्याय क्रमांक ४) आहे.

९) २०३० प्रर्यंत कोणते घटक ४% पाणी तुटवडा व्हायला कारणीभूत आहेत असा प्रश्न विचारला आहे. पर्यायांवर नजर टाकल्यावर लगेच लक्षात येते कि जलवाहतुकीची प्रगती असा उल्लेख कुठेही उताऱ्यात आलेला नाही. त्यामुळे चारही पर्यायांपैकी ज्या पर्यायामध्ये c हे उत्तर असलेला पर्याय आहे ते आपोआपच रद्द होतील मग राहिलेला एक पर्याय उत्तर आहे. अशा प्रकारे एलिमिनेशन पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक ४) फक्त a ,b आणि d आहे.

१०) कोणती राज्य भूमिगत पाण्यावर प्रचंड ताण आल्याने त्रस्त झालेली आहे असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे देखील थेट उत्तर आपल्याला उताऱ्यामध्ये मिळत आहे. दुसऱ्या पॅराग्राफ मधील दुसरी ओळ या प्रश्नाचे उत्तर दाखवते. पर्याय क्रमांक) दक्षिण आणि पूर्व महाराष्ट्र- राजस्थान

लोकसंख्या वृद्धी

हा उतारादेखील निरीक्षणात्मक होता. हा उतारा सोपा या कॅटेगरी मध्ये जाणारा होता. हा उतारा सोडवतात प्रश्नांपासून सुरुवात केली असती तर वेळेची बचत झाली असती. काही की वर्ड्स लक्षात ठेवून उतारा वाचताना जेथे जेथे आपल्याला उताऱ्यात प्रश्नातील  की वर्ड सापडतील तिथे लगेच तो प्रश्न सोडवून घ्यावा.

११) माल्थस नुसार लोकसंख्या वृद्धीवर जर बंधन घातले नाही तर लोकसंख्या कशी वाढेल. याचे उत्तर उताऱ्यात दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये तिसऱ्या ओळीत   सरळ दिले आहे. पर्याय क्रमांक २) फक्त b  बरोबर हे उत्तर येईल.

१२) उताऱ्यावरून अर्थबोध काय होतो हे सांगायचे आहे. पर्याय वाचल्यावर आपल्याला तास लगेच बोध होत नाही पण उतारा वाचल्यावर क्षणार्धात आपल्या लक्षात येते कि उतारा नक्कीच नातेसंबंधांविषयी दिलेला नाही आणि प्राचीन इतिहासाविषयी देखील काहीही सांगत नाही. त्यामुळे उत्तर  (a) आणि (c ) दिलेले पर्याय तिथेच बाद होतात . पर्याय क्रमांक ) b आणि d बरोबर हे उत्तर आहे.

१३) लोकसंख्या धोरण कोणत्या बाबीस प्रोत्साहन देते असा प्रश्न आहे. उतारा वाचल्यावर लक्षात येते कि महिलांचे अध्यात्म आणि बेकायदेशीर गर्भपात या गोष्टींचा इथे काहीही संबंध नाही. कुटुंबाच्या मोठ्या आकाराला प्रतिबंध करण्याचे प्रोत्साहन उताऱ्यामध्ये आहे त्यामुळे पर्याय ३ विरोधाभास निर्माण करीत आहे. उताऱ्याच्या  शेवटी तीन ओळी उत्तरापर्यंत जाण्यास मदत करतात. त्यातील कुटुंबाचा लहान आकार हे पर्यायामध्ये असल्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक ) आहे.

१४) लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी काय उपायोजना कराव्या लागतील याविषयी प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर देखील उताऱ्याचा शेवटी दिले आहे. पर्याय  (a ) उताऱ्यातील वाक्यासोबत विरोधाभास निर्माण करत आहे. त्यामुळे पर्याय (a) उत्तर असू शकत नाही. पुरुषांचे रोजगार याचा उल्लेख नाही. जन्मदरात वाढ करून लोकसंख्या नियंत्रणात राहणे शक्य नाही आणि उताऱ्यातदेखील त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे मुलींच्या विलंबित विवाहास प्रोत्साहन  पर्याय क्रमांक ) फक्त c बरोबर आहे.

१५) लोकसंख्या जनगणनेमधून काय ज्ञात होते. याचे उत्तर चौथ्या पॅराग्राफ मध्ये दिलेले आहे. यानुसार पर्याय क्रमांक) वरीलपैकी सर्व बरोबर असे उत्तर अपेक्षित आहे.

भारतातील संघीय व्यवस्था

 या उताऱ्यामध्ये एक दोन प्रश्न अवघड होते. बाकी प्रश्न सोप्या कॅटेगरी मध्ये जात होते. राज्यशास्त्राशी जवळीक साधणारा हा उतारा होता.

१६) केंद्र आणि राज्य यांच्यातील वित्तीय संबंध याविषयी विचारला आहे. याचे उत्तर मराठीमधून अधिकारांचे वाटप असे दिले आहे. परंतु जर तुम्ही इंग्रजी पॅराग्राफ देखील वाचला असेल तर distribution of powers असे दिले आहे त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक ) हे उत्तर असू शकते.

१७) संघीय वित्तीय व्यवस्था स्वीकारलेले देश कोणते असा प्रश्न आहे. याचे उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे. यूएसए , कॅनडा, भारत फक्त. पहिल्या पॅराग्राफ मध्ये लास्ट दोन ओळींमध्ये हे उत्तर सापडत आहे.

१८) जोड्या लावा च्या फॉरमॅट मध्ये हा प्रश्न दिलेला आहे. यामध्ये फक्त यूएसए आणि कॅनडा प्रमाणे भारताने स्वीकारले आहे असे वाक्य आहे. D ची जोडी हि (ii) या पर्याय सोबत  जोडली गेली पाहिजे. असे पर्याय क्रमांक १) आणि २) मध्ये दिसत आहे.उताऱ्यातील पहिल्या पॅराग्राफ मधील चौथ्या ओळींमध्ये नमूद केल्याप्रमाणे  C ची जोडी (i) सोबत जुळतेय. त्यामुळे याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ) आहे.

१९) उताऱ्यातून कोणत्या गोष्टी शिफारस केल्या आहेत याविषयी विचारले आहे. हा प्रश्न थोडा गोंधळात टाकणारा होता. बऱ्यापैकी दिसताना वरीलपैकी सर्व असे उत्तर वाटते. परंतु पर्याय (d) मध्ये सामान वाटप हा शब्दप्रयोग असल्यामुळे थोडा गोंधळ होतो. सामान वाटप हा शब्द कुठेही उताऱ्यात नाही त्यामुळे पर्याय क्रमांक ) बरोबर आहे.

२०) योग्य विधान ओळखायचे आहे. a ) पहिले चुकीचे आहे करण दुसऱ्या पॅराग्राफ च्या पहिल्या ओळीत स्पष्टपणे दिलेले आहे. b ) राज्यांबाबत कोणतेही अशाप्रकारचे विधान उताऱ्यात नाही त्यामुळे हे चुकीचे आहे. d) यामध्ये स्थानिक सरकारमधील लिहिले आहे परंतु असा शब्दप्रयोग उताऱ्यात नाही. त्यामुळे बरोबर उत्तर  (c) आहे. C  हे उत्तर पर्याय क्रमांक ) मध्ये दिलेला आहे. 

प्रकाशीय वर्णपट

हा उतारा विज्ञानाशी निगडित आहे. थोड्याशा अवघड कॅटेगरी मध्ये जाणार हा उतारा आहे. विज्ञान शाखेतील मुलांना हा उतारा सोपा जाऊ शकतो परंतु इतर शाखेतील मुलांना हा उतारा सोडवण्यासाठी सरावाची गरज पडू शकते. वेळ ना घालवता विज्ञानाचे उतारे सोडवता येतात कारण हे सहसा आपल्या सामान्य अध्ययनाच्या  अभ्यासावर अवलंबून असतात.

२१) अवरक्त प्रकाश किरण ची वारंवारिता जी जांभळ्या रंगाच्या प्रकाशापेक्षा कशी आहे हे विचारले आहे. हा प्रश्न आपल्या सामान्य अध्ययनाच्या ज्ञानावर सुटू शकतो तसेच उताऱ्यामध्ये पॅराग्राफ दुसरा मधील शेवट्च्या दोन ओळींमध्ये नमूद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ) बरोबर आहे.

२२) प्रकाशाचा वेग विचारला आहे. तिसऱ्या पॅराग्राफ मधील तिसरी ओळ उत्तराचा पर्याय दर्शवतो. उत्तर संक्षिप्त रूपात पर्यायात दिलेले आहे. पर्याय क्रमांक १) हे योग्य उत्तर आहे

२३) प्रकाश तरंगांचे स्वरूप कसे असते असा प्रश्न आहे. उताऱ्याचे पहिली ओळ उत्तरपर्यत पोहोचवते. याचे उत्तर पर्याय क्रमांक ) आहे.

२४) प्रकाशाचे एकक कोणते. तर नॅनो- मायक्रोमीटर हे उत्तर योग्य आहे. उताऱ्यामध्ये शेवटचे वाक्य उत्तर दर्शवते. पर्याय क्रमांक) हे उत्तर आहे.

२५) प्रकाशाच्या वर्णपटामध्ये कोणत्या प्रकाशाचा समावेश असतो. हा प्रश्न जरा माध्यम स्वरूपाचा वाटतो पण लॉजिक लावल्यास अतिनील प्रकाश आणि अवरक्त प्रकाश हे अदृश्य प्रकाशाचीच उदाहरणे आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक ) वरीलपैकी सर्व हे उत्तर आहे.

जीवनसत्वे

हा उतारा सोप्या कॅटगरी मध्ये मोडणारा होता. उतारा विज्ञानावर आधारित होता.

२६) लहान मुलांमधील जीवनसत्व D  चे प्रमाण किती. तर याचे उत्तर उताऱ्यामध्ये शेवटच्या ओळीत मिळते. उत्तर आहे पर्याय क्रमांक)

२७) वनस्पतींमध्ये रेटिनॉल ऐवजी काय असते तर याचे उत्तर उताऱ्यामध्ये पॅराग्राफ तिसर्यामध्ये शेवटी दिले आहे. पर्याय क्रमांक ३) याचे उत्तर आहे.

२८) यामध्ये पर्याय गोंधळात टाकणारे आहेत. पर्याय c  आणि d हे अयोग्य आहेत हे उतारा वाचल्यावर लक्षात येते. a  आणि b पर्याय हे बरोबर आहेत. बरोबर पर्याय मध्ये a ,b असा पर्याय कुठेही नाही त्यामुळे पर्याय क्रमांत ) बरोबर आहे. 

२९) जीवनसत्वाचे वर्गीकरण उताऱ्यामध्ये दुसरा पॅराग्राफ दुसऱ्या ओळींमध्ये दिले आहे. पर्याय क्रमांक २) हे उत्तर आहे.

३०) जीवनसत्व D  बाबत काय खोटे आहे ते पाहायचे आहे. पर्याय क्रमांक २) चुकीचा आहे. पॅराग्राफ दोन मध्ये D चा अतिरेक घातक ठरू शकतो असे आहे. 

मोल

हा विज्ञानावर आधारित थोडा अवघड कॅटेगरी मध्ये मोडणारा  उतारा आहे. गणितीय प्रक्रिया कराव्या लागणार उतारा सोडवण्यासाठी थोडा वेळ खर्चिक घालावा लागतो. सहसा हा उतारा सोडवणे अपेक्षित नसते तरीसुद्धा ज्यांना यामध्ये कंफर्ट झोन मिळतो ते सोडवू शकतात.

३१) इथे प्रश्न सोडवण्यासाठी पद्धत माहिती असणे गरजेचे आहे त्याशिवाय प्रश्न सुटत नाही. उत्तर पर्याय क्रमांक २) आहे

३२) हा प्रश्न खूप अवघड प्रकारात जाणारा होता. यासाठी खूप माहिती असणे गरजेचे होते. पर्याय क्रमांक ) याचे उत्तर आहे.

३३) संकल्पना स्पष्ट असणाऱ्यांना हा प्रश्न सोपा केला आहे. उत्तर पर्याय क्रमांक २)

३४) प्रश्नामध्ये दाब आणि तापमान दुप्पट केले आहे. उताऱ्यामध्ये पहिल्या पॅराग्राफ च्या शेवटच्या काही ओळींमध्ये माहिती दिली आहे.  त्यानुसार किमती घेऊन गणितीय प्रक्रिया करून उत्तर काढणे अपेक्षित आहे.   याचे उत्तर पर्याय क्रमांक ) आहे.

३५) याचे उत्तर दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये सापडते. त्यामुळे पर्याय क्रमांक ) उत्तर आहे.

समाजवाद आणि संघराज्यवाद

हा उतारा राज्यशास्त्राशी संबंधित होता.

३६) ७३ आणि ७४ घटनादुरुस्ती विषयी सांगितले आहे. सामान्य अध्ययनाच्या अभ्यासावर हा प्रश्न सुटत होता. पर्याय क्रमांक २) बरोबर आहे.

३७) कोणत्या मूल्याचे महत्व कमी झाले असे विचारले आहे. त्यामुळे याचे उत्तर पर्याय १) आहे.

३८) या प्रश्नचे उत्तर संदिग्ध आहे. आयोगाच्या उत्तर तालिकेत काय उत्तर येते ते पाहणे योग्य ठरेल.

३९) याचे उत्तर इंग्रजीमधून पहिले असते तर गोंधळ उडाला नसता . इंग्रजी उताऱ्यातील  पहिल्या पॅराग्राफ मधील बाराव्या ओळींमध्ये उत्तर  दिले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक

४०) इथे वेळ वाचवण्यासाठी आपण पर्याय तपासून घेऊन काही क्षणात उत्तर काढू शकतो. जसे कि यामध्ये पर्याय a चुकीचा आहे. त्यामुळे a हे उत्तर असलेले पर्याय सगळे रद्द होतील राहतो पर्याय क्रमांक ३)

नैतिकता

  • एकभाषिक उताऱ्याचे विश्लेषण पाहू.
  • नैतिकता – हा उतारा नैतिकतेवर आधारित होता. हा उतारा पूर्ण मराठीमध्ये होता आणि याची पातळी देखील सोपी होती. याची उत्तरे सरळ उताऱ्यामध्ये सापडू शकतात. 

४१) या प्रश्नाच्या उत्तरबाबत संधिग्धता असू शकते. कारण प्रत्येकाची अनसिकता वेगळा असते. तयामुळे वेगवेगळी उत्तरे येऊ शकतात.

४२) याचे उत्तर पर्याय क्रमांक )

४३) नैतिक प्रगती म्हणजे काय याचे उत्तर पर्याय क्रमांक ४)

४४) पर्याय क्रमांक

४५) पर्याय क्रमांक

Tiziano

  • Tiziano – हा उतारा व्यक्तिविशेष या सदरातून होता. उतारा पूर्ण इंग्रजीमध्ये होता. उतारा सोपा कॅटॅगरी मधील होता. उत्तरे थेट उताऱ्यात मिळत होती.

४६) पर्याय क्रमांक जास्तीत जास्त वाटते आहे.

४७) पर्याय क्रमांक

४८) पर्याय क्रमांक वाटत आहे.

४९) पर्याय क्रमांक

५०) पर्याय क्रमांक जास्ती वाटत आहे.

1 thought on “MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2 (CSAT) 2022 in Marathi”

Leave a Comment