Success Story: रस्त्यावर बांगड्या विकणाऱ्याला मिळाली IAS ची खुर्ची, वाचा संघर्षाची कहाणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IAS Ramesh Gholap Biography In Marathi: आजच्या Success Story मध्ये तुम्हाला एका IAS अधिकाऱ्याचा संघर्षपूर्ण जीवन प्रवास सांगणार आहोत जे लहानपणी बांगड्या विकायचे. आयुष्यात आलेल्या समस्यांना त्यांनी कधीही पाठ दाखवली नाही आणि त्यांचा खंबीरपणे सामना केला. भरपूर मेहनत आणि स्वतःला झोकून देऊन त्यांनी UPSC अंतर्गत IAS हे प्रतिष्टीत पद मिळवले. जाणून घेऊया त्यांचा हा संघर्षमय जीवन प्रवास.

IAS रमेश घोलप हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत. लहानपणी त्याच्या डाव्या पायाला पोलिओ झाला होता. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. एवढे सगळे असूनही त्याचे ध्येय स्पष्ट होते. त्यांना यशाच्या त्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचायचे होते. जिथून ते आपल्या कुटुंबातीलच नव्हे तर समाजातील गोर-गरीब लोकांच्या पण उपयोगी पडू शकतील. लहानपणी ते आईसोबत बांगड्या विकायचे. अशा वातावरणातून रमेश घोलप आयएएस अधिकारी कसे बनले ते जाणून घेऊयात.

IAS Ramesh Gholap Biography In Marathi

IAS रमेश घोलप हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील महागावचे रहिवासी आहेत. वडील गोरख घोलप हे वाहनांचे पंक्चर बनवायचे. लहानपणी रमेशला डाव्या पायात पोलिओ झाला होता, त्यामुळे त्यांना खूप त्रास व्हायचा. रमेशच्या वडिलांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले होते. रमेशची आई विमल देवी रस्त्यावर बांगड्या विकायची. कधी रमेश आईला कामात तर कधी वडिलांच्या कामात मदत करायचा.

रमेश घोलप शिक्षण

रमेश यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते आपल्या मामाच्या गावी ‘बारसी’ येथे गेले. रमेशला 12वी बोर्डाच्या परीक्षेत 88.50 टक्के गुण मिळाले होते. डिप्लोमा इन एज्युकेशन केल्यानंतर रमेशने गावातीलच शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. डिप्लोमासोबतच त्यांनी बीएची पदवीही घेतली. त्यांच्या आईला सामूहिक कर्ज योजनेंतर्गत गाय खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपये कर्ज मिळाले. या रकमेतून रमेशने आपले शिक्षण पूर्ण केले.

IAS रमेश घोलप संघर्ष

वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागायचे. बांगड्या विकून आई आणि रमेश जे पैसे मिळवायचे, त्या पैशातून वडील दारू विकत आणायचे. वडील गोरख यांच्या निधनानंतर रमेशकडे काकाच्या गावावरून स्वतःच्या गावाला जाण्याकरिता दोन रुपयेही नव्हते. त्यावेळी दोन गावांदरम्यान जाणाऱ्या बस चे भाडे पाच रुपये आकारले जायचे. मात्र रमेश पोलिओग्रस्त असल्याने त्यांना बस चे भाडे केवळ २ रु लागायचे.

रमेश घोलप IAS रँक

रमेश घोलप यूपीएससी परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले. 2011 च्या UPSC परीक्षेत त्यांनी 287 वी रँक मिळवली होती. त्याच वर्षी राज्यसेवा परीक्षेत देखील ते राज्यात टॉपर राहिले होते. आयएएस रमेश घोलप झारखंड केडरमध्ये (IAS Ramesh Gholap Current Posting) आहेत. सध्या ते झारखंडमधील गढवाचे जिल्हा दंडाधिकारी आहेत.

शेतकऱ्यांच्या पोरीची कमाल, घरीच अभ्यास करत पहिल्या झटक्यात  UPSC केली पास

IAS रमेश घोलप व्हायरल फोटो

गेल्या वर्षी आयएएस रमेश घोलप यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला. हा फोटो त्याच्या गावात काढला गेला होता. रस्त्याच्या कडेला एका वृद्ध व्यक्तीसोबत आयएएस अधिकाऱ्याला असे हसताना पाहणे सोशल मीडियावर लोकांना आवडले. महाराष्ट्रातील तरुण पिढीला त्यांच्या या संघर्षमय प्रवासाने खूप Inspire केले आहे आणि येणाऱ्या पुढील पिढीला सुद्धा अशीच प्रेरणा मिळत राहील.

भटक्या जमातीतील प्रदीपकुमार जेव्हा MPSC परीक्षेत राज्यांतून पहिला येतो..

Leave a Comment