शेतकऱ्यांच्या पोरीची कमाल, घरीच अभ्यास करत पहिल्या झटक्यात  UPSC केली पास

success story in marathi : UPSC म्हटलं की लायब्ररी, मोठे आणि महागडे क्लास, काहीजण तर थेट दिल्ली गाठून अभ्यास करतात पण बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांच्या पोरीने असं काही न करता घरीच अभ्यास करून पहिल्या झटक्यात  UPSC मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. श्रद्धा शिंदे असे या शेतकरी कन्येचे  नाव आहे.

भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षा आईएस परीक्षेत श्रद्धा आपल्या राज्यातून प्रथम तर देशांतून 36 वी आलेली आहे. श्रद्धाचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. तीची आई निरक्षक आहे. आई शेतीत मदत करते.

बीड जिल्ह्याची मुख्य ओळख तर ही आहे की हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे. मात्र आता येथील मुलांनी शिक्षण, खेळ या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून जिल्ह्याचे नाव एका वेगळ्या उंचीवर पोहचविले आहे.

बीड जिल्ह्यातील लोणी शहाजानपुर येथील नवनाथ शिंदे यांची मुलगी हिने अभियांत्रिकी क्षेत्रात घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे संपूर्ण पंचकृषीत श्रद्धाची चर्चा सूरु आहे. शेतकऱ्यांच्या पोरीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

श्रद्धांचे शालेय शिक्षण देखील लोणी येथे झाले आहे. माध्यमिक शिक्षण बीड येथे तर अभियांत्रिकी शिक्षण हे औरंगाबाद येथे झाले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.

पदवी मिळताच अवघे सहा महीने तिने यूपीएससीचे क्लासेस केले आणि त्या नंतर तिने स्वता अभ्यास केला. जानेवारी 2020 मध्ये यूपीएसीमध्ये पहिल्या प्रयत्नांमध्ये हे यश मिळवले. श्रद्धा तीच्या यशाचे सर्व श्रेय तीच्या आई- वडिलांना देते. 

श्रद्धाचे वडील अगदी अभिमानाने म्हणतात श्रद्धाच्या या यशामुळे मला माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण  लाभला. मी स्वता शेती करतो पण श्रद्धाला शिक्षणाची आवड होती, त्यामुळे तिला मी कधीच काही कमी पडू दिले नाही.

तीचे लग्नाचे वय झाल्यानंतर समाजातील अनेकांनी तीचे लग्न करून टाका असा सल्ला दिला , पण मी मात्र कोणाचा सल्ला मानला नाही तिला उच्च शिक्षण दिले. तिने आज मला हा आनंद दिलाच पण आमचे नाव देखील खूप मोठे केले आहे. असे तीचे वडील नवनाथ शिंदे म्हणतात.

Leave a Comment