success story in marathi : MPSC करणाऱ्या मुलांची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नांत यश मिळेल असे नाही, अनेक मुलं घरची आर्थिक स्थिती बेताची असून देखील मुलं जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर अगदी घवघवीत यश संपादन करतात.
असेच घवघवीत यश संपादन केले आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी येथील प्रदीपकुमार आणि त्यांचे कुटुंब राहते. प्रदीपचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत.
प्रदीपने पहिल्या प्रयत्नांत भटक्या जमाती वर्ग ड एनटी-डी मधून राज्यांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. प्रदीप डोईफोडे हे एमपीएससी परीक्षांमधून राजपत्रित अधिकारी या पदावर रुजू होणार आहेत. राहेरी गावची एकूण लोकसंख्या 800 इतकी आहे.
जनार्धन डोईफोडे म्हणजे प्रदीपचे वडील म्हणतात आमच्या संपूर्ण कुटुंबातून कोणीच शासकीय नोकरीत नाही. परंतु प्रदीप याने कष्ट आणि मेहनत यांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. प्रदीप डोईफोडे यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण देऊळगाव राजा येथे झाले.
त्या नंतर औरंगाबाद येथे पुढील शिक्षण झाले. प्रदीप यास सिव्हिल इंजिनीअरिंगची आवड होती. त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंग जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना प्रदीप यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती.
2018 मध्ये सिव्हिलची डीग्री पूर्ण केल्यानंतर आणखी जोरदार अभ्यास सुरुवात केली. कोणत्याही प्रकारचे क्लासेस लावता स्वतच्या जिद्द आणि चिकाटीवर प्रवीण यांनी जोरदार अभ्यास केला. स्वताच्या प्रयत्नाच्या भरवशावर पहिल्याच प्रयत्नांमध्ये त्यांनी भरघोस यश मिळविले.
राज्यांमध्ये भटक्या जमाती मधून प्रथम येण्याचा मान मिळवला. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर प्रदीप यांना अनेक नमांकित कंपनीमध्ये नोकरीच्या संधी आल्या होत्या पण प्रशासकीय सेवेत जाण्याची त्यांची जिद्द आणि मनाची तयारी यामुळे खाजगी नोकरीत न अडकता त्यांनी त्यांच्या अभ्यास सुरू ठेवला.
2019 मध्ये MPSC सिव्हिल इंजिनीअरिंगच्या परीक्षेची जाहिरात निघाली त्यानंतर प्रदीप आणखी घट्ट गाठ बांधत जोमाने अभ्यास सुरू केला. आई- वडील यांनी देखील प्रदीप यांना खूप सपोर्ट केला. अभ्यास करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. तासन तास फक्त आणि फक्त अभ्यास याकडे लक्ष दिले.
24 नोव्हेंबर 2019 मुख्य परीक्षा दिल्यानंतर सन 2021 मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जानेवारी 2022 ला विभागीय स्तरावर मुलाखत दिली. त्यांचा निकाल 12 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. प्रदीपकुमार जनार्धन डोईफोडे यांनी भटक्या जमातीत प्रवर्ग ड एनटीडी मधून राज्यांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला.
ग्रामीण भागातील विद्यार्थी जिद्द आणि चिकाटी व कष्ट घेण्याची तयारी या जोरावर आज ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अनेक मोठ्या पदांवर काम करत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी यांनी जर मनावर घेतले तर ते कोणताही क्लास ल लावता असे चमकदार यश मिळवू शकतात.
याबाबत प्रदीप म्हणतात प्रशासकीय सेवेतील कोणत्याही पदा पर्यत पोहचण्यासाठी त्यामध्ये सातत्य ठेवणे जरूरी आहे. अभ्यास सातत्य ठेवल्यामुळे हे शक्य झाले आहे.