जर तुम्ही MPSC Combine Exam ची तयारी करत असाल तर MPSC Combine Exam ची तयारी करतांना सुरुवातीला तुम्हाला हमखास प्रश्न पडला असेल, कि येणाऱ्या MPSC Combine Prelims Exam साठी S.S Gathal History Book कसे वाचावे? How to Study History for MPSC
तर याच प्रश्नाला न्याय देण्यासाठी आणि यावर Solution म्हणून हा Important मुद्दा येथे गृहीत धरून Gathal सरांच्या History च्या पुस्तकामधून कोणत्या Chapter मधून कोणते Points वाचायचे आणि कोणते Points Skip करायचे आहे. Gathal सरांचे History चे पुस्तक Randomly वाचण्यापेक्षा Smartly वाचले तर तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचेल.
चला तर मग बघुयात कि S.S Gathal History Book मधून कोणत्या Chapter मधून कोण-कोणती माहिती वाचायची आणि कोणती माहिती Skip करायची.
- १९ व्या शतकातील महाराष्ट्र फक्त Bullet/Highlighted Points वाचा. बाकी Chapter Skip करा.
Gathal History प्रकरण २ British राजवटीतील व्यवस्था
या प्रकरणातील दिलेली माहिती महत्वाची आहे त्यामुळे यातील Factual माहिती व्यवस्थित लक्षात ठेवा. सर्वाधिक दुर्लक्षित प्रकरण त्यामुळे लगेच वाचून घ्या.
- यामध्ये जमीन महसूल, शिक्षण, वृत्तपत्रे या Topics वरती विशेष भर द्या.
- बाकी प्रशासन, ख्रिश्चन मिशनऱ्यांचे कार्य, रेल्वे, पोस्ट, तारायंत्रे MPSC Combine पेक्षा MPSC Rajyaseva साठी जास्त महत्वाचे आहे.
Gathal History प्रकरण ३ प्रारंभीचे समाजसुधारक
- महत्वाचा प्रकरण
- १३ समाजसुधारकांचा factual Information सहित अभ्यास करणे अपेक्षित आहे.
- परंतु In detail न करता Only IMP Facts करायच्या आहेत.
Gathal History प्रकरण ४ समाजसुधारक
या प्रकरणातील सर्व माहिती आवश्यक नाही पण परिक्षयेच्या दृष्टीने समाजसुधारक आणि त्यांच्या संदर्भातील इतर Factual माहिती खूप महत्वाची आहे.
या प्रकरणातील समाजसुधारक आणि त्यांच्या संबंधित कोणती माहिती अभयसायची आणि कोणती माहिती Skip करायची हे खाली सांगितलेले आहे.
- यामध्ये महात्मा फुले, पंडिता रमाबाई, यांचा In detail अभ्यास करायचा आहे.
- एक समाजसुधारक : महत्वाचे ७-८ Facts करायचे आहे.
- बस्स ! एवढे जरी केले तरी सोपे आणि मध्यम Level चे प्रश्न अजिबात चुकणार नाहीत.
- बाकी सावित्रीबाई फुले, कृष्णराव भालेराव, नारायण लोखंडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित या समाजसुधारकांसाठी एक Best Approach सांगत आहोत.
समाजसुधारकांसाठी Best Approach कसा ठेवाल
परीक्षेच्या दृष्टीने १५-२० समाजसुधारक महत्वाचे आहेत. बाकी राहिलेल्या प्रत्येक समाजसुधारकांच्या फक्त महत्वाच्या ६-७ facts लक्षात ठेवायच्या, प्रत्येक समाजसुधारकाने काय कार्य केलेले आहेत, याचा एकंदरीत अंदाज ठेवून.
याच प्रकरणात
- लक्ष्मीबाई टिळक
- जनाक्का शिंदे
- आनंदीबाई जोशी
- काशिनाथ कानिटकर
- रखमाबाई राऊत
- रमाबाई रानडे यांबद्दल महत्वाच्या ६-७ फॅक्टस व्यवस्थित करा.
Gathal History प्रकरण ५ उठाव आणि बंड
या प्रकरणातील झालेले सर्व उठाव व बंड यांचा अभ्यास करणे खूप आवश्यक आहे आणि त्या बद्दल परीक्षाभिमुख Factual information चे Micro Notes काढून ते सतत Revise करा.
वरती माहिती सांगितलेली सोडल्यास या प्रकरणातील इतर सर्व माहिती Skip करायची आहे, पण फक्त तुमच्या माहिती साठी एकदा वाचू शकता कारण त्यामुळे एक Clearity येणार, प्रत्येकदा नाही वाचायचे.
- रामोशी, भिल्ल व कोळ्यांचे बंड
- उठावाची ठिकाणे
- रामोशी, भिल्ल, कोळ्यांचे मूळ वस्तीस्थाने
- महत्वाचे २-३ नेते
- आणि फक्त कालावधीचा एक Tentative अंदाज म्हणजेच उमाजी नाईकांचा उठाव फडकेंच्या अगोदर झालेला होता.
उठाव दडपणारे इंग्रज अधिकारी आणि व्यक्तिविशेष
- १) उमाजी नाईक
- २) राघोजी भांगडिया + बापूजी
- ३) रामजी भांगडिया
- ४) सेवाराम घिसाडी
Gathal History प्रकरण ६ महत्वाच्या संघटना (IMP)
या प्रकरणातील संघटना खूप महत्वाच्या आहेत – बॉम्बे असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा, काँग्रेस आणि इतर सर्व संघटना व्यवस्थि करा आणि यांवर आधी आयोगाने विचारलेले Questions आणि Practice Questions सोडविण्याचा सर्व करा.
विचारसरणीचा (मवाळ व जहाल) जास्त अभ्यास न करता महाराष्ट्रातील महत्वाच्या स्वातंत्र्य घडामोडी व त्यामधील सहभागी व्यक्तींचा अभ्यास करा.
काँग्रेस – (परीक्षेत हमखास प्रश्न दिसणारच)
- महत्वाची अधिवेशने
- अध्यक्ष
- महाराष्ट्रातील अधिवेशने
- महाराष्ट्रातील मवाळ व जहाल नेते
Gathal History प्रकरण ७ MH स्वातंत्र्य चळवळ 1905-1920
क्रांतिकारी चळवळ विषयी माहिती वाचा आणि त्यासंबंधित नेते अभ्यास आणि हा Topic अभ्यासतांना महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करा.
- लोकमान्य टिळक
- महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ
- महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ आणि नेते व्यवस्थित अभ्यास करणे अपेक्षित आहे
Gathal History प्रकरण 8 MH स्वातंत्र्य चळवळ 1920-1947
महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ 1920-1947 ह्या कालावधीतील झालेल्या चळवळी आणि त्या चळवळीतील महत्वाचे नेते आणि त्यांनी केलेले कार्य आणि या संदर्भातील Factual Data सहित व्यवस्थित ह्या पद्धतीने अभ्यास केल्यास नक्कीच फायदा होईल.
- चळवळ व त्यातील महत्वाच्या व्यक्तींची भूमिका काय?
- असहकार, सविनय कायदेभंग, चले जाव चळवळ इ. बद्दल महाराष्ट्रातील ठिकाणे, महत्वाच्या घडामोडी व महत्वाचे नेते.
- इतर समकालीन घडामोडीचा अभ्यास करा.
Gathal History प्रकरण 9 महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी
- सर्वाधिक महत्वाचा व आयोगाचा २०१८-२०१९ मधला Favourite Topic
- एखादा प्रश्न नक्की येतो
- त्यामुळे या Chapter चा Factual Information व MPSC Previous Year Question बघून चांगला अभ्यास करा.
Gathal History प्रकरण १० व ११ हैद्राबादचा मुक्तिलढा व महाराष्ट्राची निर्मिती
खूप जास्त Detail न करता फक्त ३०-३५ Facts केल्या (दोन्ही Chapter च्या) तरी सोपा प्रश्न Solve होतो.
Background समजून घेऊन महत्वाच्या व्यक्ती जसं
- स्वामी रामानंद तीर्थ
- शंकरराव देव इ. इतकं केलं तरी Sufficient आहे.
Gathal History प्रकरण 12 महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ व कामगार चळवळ
- महत्वाच्या व्यक्ती व चळवळी
- जास्त प्रश्न येत नाहीत.
येथे सांगितलेली How to Study History for MPSC बद्दल Detail विश्लेषणात्मक Strategy आवडलेली असल्यास तुमच्या मित्रांपाईयंत नक्कीच Share करा.