Departmental PSI Syllabus in Marathi PDF and Exam Pattern: जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या खाली असलेल्या पदांवर कार्यरत असाल आणि तुमचं स्वप्न PSI होण्याचं असेल तर, तुम्हाला Departmental PSI हि परीक्षा द्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला MPSC Departmental PSI बद्दल सर्व माहिती असणे अनिवार्य आहे.
Update Date 23/Sept./2022 : Departmental PSI Result 2021 Declared | पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 निकाल जाहीर
जसे कि Departmental PSI Syllabus in Marathi PDF and Exam Pattern काय आहे. MPSC Departmental PSI age limit काय आहे. Departmental PSI qualification, Departmental PSI Physical Details काय आहे.
आणि त्यासोबतच MPSC departmental PSI exam syllabus in Marathi मध्ये तुम्हाला याच Article मध्ये Provide करून दिलेला आहे. या व्यतिरिक्त आणखीन सर्व महत्वाची माहिती Departmental PSI Syllabus in Marathi PDF and Exam Pattern या लेखात Detail मध्ये दिलेली आहे.
Note:
2024 नंतर ही परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे हाच तुमचा शेवटचा Attempt समजून पूर्ण Dedication ने अभ्यास करून Clear करण्याचा प्रयत्न करा. 2024 नंतर हि Exam पुन्हा होईल याची खात्री नाही. त्यामुळे स्वतःचे 100% द्या.
Departmental PSI Syllabus 2022 in Marathi PDF and Exam Pattern
MPSC departmental PSI exam म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा हि पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI), पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी PSI या पदावर Selection करण्यासाठी MPSC आयोगाकडून आयोजित केली जाणारी परीक्षा आहे.
departmental PSI exam उत्तीर्ण करण्यासाठी तुम्हाला तीन टप्पे Clear करावे लागतात
पहिला टप्पा
- Prelims Exam 100 गुण
दुसरा टप्पा
- Mains Exam 300 गुण
तिसरा टप्पा
- शारीरिक चाचणी 100 गुण
Note:
- MPSC departmental PSI exam मध्ये Interview Round नसतो.
Departmental PSI Prelims Exam Pattern
MPSC Departmental PSI Prelims Exam मध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि सामान्य ज्ञान हे घटक मिळून एकच पेपर घेतला जातो. MPSC Departmental PSI Prelims Exam 100 गुणांसाठी असते. पेपर साठी कालावधी १ तास असतो. प्रश्नांचा प्रकार बहुपर्यायी (MCQ Type) प्रकारचे असतात.
- मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 गुणांसाठी
- इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 25 गुणांसाठी
- सामान्य ज्ञान 50 प्रश्न 50 गुणांसाठी
Departmental PSI Mains Exam Pattern
MPSC Departmental PSI Mains Exam मध्ये दोन Papers असतात Paper – 1 आणि Paper – 2 यांपैकी पेपर – 1 विधी (प्रमुख कायदे) आणि पेपर – 2 विधी (इतर कायदे) हे घटक मिळून अनुक्रमे पेपर – 1 आणि पेपर – 2 घेतला जातो.
- MPSC Departmental PSI Mains Exam 300 गुणांसाठी असते.
- पेपर – 1 विधी (प्रमुख कायदे) 75 प्रश्नांना 150 गुण असतात
- पेपर – 2 विधी (इतर कायदे) 75 प्रश्नांना 150 गुण असतात
- दोन्ही पेपर साठी कालावधी 2 तास असतो. प्रत्येकी 1 तास.
- प्रश्नांचा प्रकार बहुपर्यायी (MCQ Type) प्रकारचे असतात.
MPSC departmental PSI exam syllabus 2022 in Marathi
Department PSI Syllabus 2022 in Marathi PDF
Departmental PSI Exam Qualification
महाराष्ट्र पोलीस विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई इ. पदांवर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता धारण करणे अनिवार्य आहे.
Departmental PSI Educational Qualification:
- कोणत्याही शाखेचा पदवीधर (Graduation) असणाऱ्यांसाठी – ४ वर्षे पोलीस खात्यात नियमित सेवा गरजेची.
- १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण अशा उमेदवारांच्या बाबतीत – ५ वर्षे पोलीस खात्यात नियमित सेवा गरजेची.
- १० वी ची परीक्षा उत्तीर्ण अशा उमेदवारांच्या बाबतीत – ६ वर्षे पोलीस खात्यात नियमित सेवा गरजेची.
Departmental PSI Age Limit in Marathi
- अराखीव उमेदवार – जास्तीतजास्त वयोमर्यादा-३५ वर्षे.
- मागासवर्गीय उमेदवार – जास्तीतजास्त वयोमर्यादा-४० वर्षे.
- शासन परिपत्रकात नमूद केलेल्या दिनांकास वयाची गणना केली जाईल.
- पोलीस उप निरीक्षक, (सेवाप्रवेश) (तिसरी सुधारणा) नियम, २००८ नुसार एखाद्या वर्षी परीक्षा न झाल्यामुळे कमाल (जास्तीतजास्त) वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेच्या सलग तीन संधी हुकल्या असतील तर अशा उमेदवारांना कमाल वयोमर्यादेनंतर सलग होणा-या परीक्षेस बसण्याच्या उर्वरित संधी देण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत या सलग संधी तीन पेक्षा जास्त असणार नाहीत.
- सेवाप्रवेश नियमातील कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षेच्या कमाल संधी बाबत कोणतीही मर्यादा लागू नाही.
- इतर कोणत्याही बाबतीत वयोमर्यादा शिथिल केली जाणार नाही.
Departmental PSI Exam Fees
Departmental PSI Exam Center
Departmental PSI Prelims Exam Center
धन्यवाद सर
thank you sir …….