नोट्स कशा तयार कराव्यात? | How to Make Notes for MPSC or UPSC

नोट्स कशा तयार कराव्यात? | How to Make Notes for MPSC or UPSC

स्पर्धापरीक्षा असो वा आणखी कोणती परीक्षा, अभ्यासातील महत्वाचे मुद्दे, संकल्पना यांचा थोडक्यात संदर्भ चटकन मिळावा जेणेकरून लांबलचक पुस्तके वाचायची सारखी सारखी गरज पडणार नाही आणि भरपूर वेळा रिविजन सुद्धा अगदी कमी वेळात होईल यासाठी Notes या अतिशय महत्वाची भूमिका बजावतात.

नोट्समध्येच मग इतरत्रच्या वाचनातील, चर्चेतील नवे मुद्दे नोंदवून घेतले की, उजळणी करताना फक्त त्याच मटेरियल वर आपण अभ्यास करू शकतो. यूपीएससी असूदेत नाहीतर एमपीएससी या परीक्षांची काठिण्य पातळी आजकाल वाढतच चाललेली आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यंना मोजकाच पण महत्वाचा अभ्यास करावा लागतो त्यासाठी एक नाही तर दोनतीन संदर्भ ग्रंथांचा आधार लागतो परंतु इतके संदर्भ ग्रंथ सतत वाचणे अवघड होऊन बसते त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल नोट्स काढण्याकडे जास्ती असतो. चला तर मग आज पाहुयात नोट्स कशा तयार कराव्यात | How to Make Notes for MPSC or UPSC.

Notes म्हणजे काय? | What Is Notes ?

नोट्स काढणे हि एक कला आहे. उगाच पुस्तकेच्या पुस्तके नोट्स मध्ये लिहून चालत नाही. मुद्देसूद, थोडक्यात संकल्पना स्पष्ट होतील अशा नोट्स काढणे गरजेचे असते. एक क्विक रेफेरेंस म्हणून आपल्या बेसिक नोट्स आपल्या कमी येणार आहेत. वाचलेला घटक नीट समजून घेऊन स्वतःच्या शब्दात थोडक्यात मांडणे म्हणजे नोट्स काढणे.

संपूर्ण वाक्ये न लिहिता जेवढे महत्वाचे आहे तेवढे शब्द लिहिणे म्हणजे नोट्स काढणे झाले. महत्वाचे मुद्दे एकत्रित केलेला तुमचा स्वतःचा छोटासा रेडी रेकनर म्हणजे तुमच्या स्वतःच्या नोट्स ! नोट्सचा उद्देशच मुळात वेळेची बचत हा असतो. संत कबीर यांच्या भाषेत सांगायचे तर “गागर मे सागर” असे नोट्सचे स्वरूप.

Notes का काढल्या पाहिजेत? | Why you should make notes ?

Importance of notes making

हे बघा मित्रानो आपण अभ्यास करताना पुस्तकेच वाचतो परंतु जेव्हा आपल्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतात तेव्हा आपल्याकडे संपूर्ण पुस्तक वाचून काढण्याइतका वेळ देखील नसतो.

मग त्यावेळी जर तुमच्या तुमच्या शॉर्ट नोट्स असतील आणि त्या तुम्ही वाचल्या तर सगळं टॉपिक तुमच्या डोळ्यासमोर उभा राहू शकतो.

नोट्स मध्ये अनावश्यक माहिती वाचली जात नाही. संपूर्ण पुस्तके वाचण्याच्या वेळात तुमच्या नोट्स चार ते पाच वेळा वाचून होतील एवढा नोट्स चा फायदा तुम्हाला होऊ शकतो.

नोट्स कोणी आणि कशा काढाव्यात ?

प्रत्येकाची नोट्स काढण्याची पद्धत वेगळी असते. इथे जशा सांगत आहोत तशाच तुम्ही काढायला हव्यात असेही काही नाही.

उदा. स्पर्धापरीक्षेच्या जगात नुकतेच प्रवेश करणारे म्हणजेच फ्रेशर आणि चार ते पाच वर्षे अभ्यास करणारे सिनिअर्स. या दोघांच्याही गरज वेगळ्या असू शकतात. आपण दोन्ही प्रकारच्या व्यक्तींबद्दल बोलू कि त्यांनी नोट्स कशा काढाव्यात

 • फ्रेशर्स :

या विदयार्थ्यांनी पहिल्या वाचनातच नोट्स अजिबात काढू नका. विषय आधी समजून घ्या. दुसऱ्या वाचनात पुस्तकात अंडरलाईन करा. काही दिवसांनी तुमच्या लक्षात येते कि कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी तुमच्या पाठ झाल्या आहेत किंवा सहज लक्षात राहिल्या आहेत.

ज्या गोष्टी लक्षात राहत नाही त्या लिहून ठेवायच्या. काही कीवर्ड तुम्ही यामध्ये वापरू शकता. थोडक्यात एक्सप्लेनेशन देऊ शकता. पण एक लक्षात ठेवा आपल्याला दुसरे पुस्तक तयार करायचे नाहीए. आपण वेळ वाचवण्यासाठी हे आहोत.

 • सिनिअर्स :

या लोकांनी सुरुवातीला नोट्स काढलेल्या असतात पण त्या खूप मोठ्या असतात. त्यांचे खरे तर ते निम्मे पुस्तकच झालेले असते. नोट्स ची साईझ किती असावी? तर दोन ते चार तासात एका विषयाची रिविजन व्हायला हवी इतकी !

उदा. आज तुमचे मेन्स चे दोन पेपर झाले आणि उद्या दोन आहेत तर उद्यापर्यंत तुमच्या त्या दोन्ही पेपर ची एक एक रिविजन झाली पाहिजे अशा तुमच्या नोट्स हव्यात.

हे सुद्धा बघा :

How to Make Notes for MPSC or UPSC | नोट्स काढण्याच्या पद्धती

नोट्स कशा तयार कराव्यात :

 • कीवर्ड :

नोट्स काढताना काही कीवर्ड म्हणजे तुमच्या लक्षात राहतील असे शब्द तुम्ही वापरा शकता. जसे कि शॉर्ट ट्रिक्स असतात, प्राण्यांची नावे, तुमच्या मित्राच्या वाढदिवसाची तारीख, असे अनेक मजेशीर प्रकार आपण नोट्स काढताना वापरू शकतो. जो भाग पाठ करावा लागतो त्याच्या ट्रिक बनवाव्यात.

 • तक्ते/ टेबल :

या प्रकारातील नोट्स जास्ती उपयोगी पडतात. तुलनात्मक गोष्टींचा अभ्यास करताना तक्त्यांचा स्वरूपात केल्यास गोष्टी सहज आठवतात. उदा. कलम ३५२,३५६,३६० या आणीबाणी कलमांचा तक्ता.

 • फ्लोचार्ट/ नकाशे:

काही गोष्टी जेव्हा चित्रात्मक पद्धतीने पाहतो तेव्हा जास्ती लक्षात राहतात. जसे कि भूगोलातील घाट, खिंड या गोष्टी नकाशामध्ये उतरवल्या कि आपल्याला त्याचा पूर्व- पश्चिम, उत्तर-दक्षिण, चढता-उतरता क्रम लक्षात राहतो आणि परीक्षेत बरोबर आठवतो.

 • उदाहरण :

➔ संसद, राज्यसभा, लोकसभा यांची कलमे

               ट्रिक : सरला 

स – संसद – ७९
र – राज्यसभा -८०
ला – लोकसभा -८१

हे सुद्धा बघा :

तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण नोट्स बनवू शकतो. How to Make Notes for MPSC or UPSC या विषयावरती वरील माहिती वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच नवीन दिशा मिळाली असेल. वरील माहिती कशी वाटली याबद्दल खाली Comment Box मध्ये नक्की कळवा त्यासोबतच तुम्हाला MPSC Exam विषयी काही प्रश्न असतील तर ते देखील विचारा.

Leave a Comment