स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तकाचे वाचन कसे करावे | How to Read a Book for a Competitive Exam

नमस्कार मित्रांनो, या आधीच्या लेखात आपण पाहिलं कि, Mpsc चा अभ्यास करताना कुठून सुरुवात करावी | How to Start MPSC Study in Marathi. आजच्या या लेखात आपण स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तकाचे वाचन कसे करावे याविषयी माहिती घेऊ. आता तुम्ही म्हणाल कि याची काय गरज आहे बरे? साधारणपणे पुस्तके कशी वाचावीत हे सर्वांना माहिती असते परंतु तसे नाहीए मित्रांनो.

स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तकाचे वाचन कसे करावे नेमकं ह्याच प्रश्नाच उत्तर देण्याकरिता आम्ही तुमच्या साठी Well Researched Technique घेऊन आलेलो आहोत. येथे दिलेली माहिती तुमच्या Knowledge मध्ये नक्कीच Value Addition करेल.

यानुसार जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तकाचे वाचन केले तर तुम्हाला याचा १००% फायदा होईल. खाली सांगितलेली Technique बरेच असे Toppers असलेल्या Post Holders विद्यार्थ्यांनी सुद्धा वेळोवेळी Recommend केलेलं आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तकाचे वाचन कसे करावे

पुस्तके वाचण्याची पण एक पद्धत असते. पद्धतशीरपणे केलेली कोणतीही गोष्ट यशापर्यंत घेऊन जाते त्यामुळे पुस्तकांची निवड जेवढी महत्वाची असते तेवढीच ती कशी वाचली जातात हे ही महत्वाचे असते. विद्यार्थी भरमसाठ पुस्तके विकत घेत असतात आणि वाचायला वेळही मिळत नाही आणि व्यवस्थित सरावही होत नाहीत.

स्पर्धापरीक्षेमध्ये तुम्ही जे काही वाचता जे शिकता ते आत्मसात तर करावेच लागतात पण त्यासोबत ते लक्षात राहणे देखील महत्वाचे असते आणि कोणतीही कोणतीही गोष्ट जर लक्षात ठेवायची असेल तर ती नीट वाचली गेली पाहिजेत आणि वारंवार वाचली गेली पाहिजेत.

पहिले वाचन

पुस्तके वाचताना त्यांचे किमान तीन वाचने व्यवस्थितरित्या झाली पाहिजेत. पहिले वाचन करताना ते सरळ करत जावे. कोणतेही वाक्य सोडू नये. हळूहळू वाचन करावे.

वाचन करताना सुरुवातीला सगळे समजलेच पाहिजे, सगळे अर्थ नीट लागलेच पाहिजेत किंवा वाचले ते सगळे लक्षातच राहिले पाहिजे, मला आठवलेच पाहिजे हा अट्टहास नसावा.

आपला मेंदू एकदा वाचलेली गोष्ट काही काळासाठी लक्षात ठेवू शकतो परंतु अनंत काळासाठी काहीच गोष्टी लक्षात राहतात त्यामुळे सतत वाचनाने गोष्टी लक्षात राहतात.

पुस्तक वाचताना समजून घेऊन वाचणे गरजेचे आहे नाहीतर उरकायचे म्हणून जर वाचले तर आपण गुणवत्तेपेक्षा प्रमाणाला महत्व देतो असे होऊ शकते मग याला फक्त ओझे वाहणे म्हणतात.

दुसरे वाचन

पुस्तकांचे दुसरे वाचन करायच्या आधी तुम्हाला तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षी आलेले प्रश्न याचा अभ्यास करावा लागणार आहे.

त्यामुळे तुम्ही आधी जे वाचले आहे त्यावरून तुम्हाला नेमके काय वाचायचे आहे परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचे आहे हे तुम्हाला समजून जाते आणि तुम्ही फक्त तेवढ्यावरच लक्ष केंद्रित करू शकता. यावेळी वाचताना तुम्हाला हातामध्ये पेन्सिल घ्यायची आहे.

तुम्ही म्हणाल कि आम्ही स्पर्धापरीक्षेची तयारी करतो मग पेन्सिल कशाला तर तुम्ही जे वाचणार आहात ते मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहून वाचणार आहात त्यामुळे महत्वाचे जे आहे ते नुसते माहिती होऊन चालणार नाही तर त्यावर आपले सारखे लक्ष राहिले पाहिजे आणि परत वाचन आपण त्याच गोष्टी जास्त लक्ष देऊन वाचणार आहोत ज्या आपण अधोरेखित केल्या आहेत त्यामुळे अधोरेखन महत्वाचे आहे त्यासाठी पेन्सिल.

तिसरे वाचन

आता आपल्याला करायचे आहे ते तिसरे वाचन. तिसरे वाचन करायच्या आधी पुन्हा एकदा आपण जो धडा वाचणार आहोत त्याच्यावर आलेल्या प्रश्नांचा मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहून आढावा घ्यायचा आणि पुन्हा वाचन करायचे पण यावेळी वाचन करताना पेन्सिल ऐवजी पेन घ्यायचा आणि मग करायचे आणि आपल्या जे लक्षात राहत नाही तेवढ्याच गोष्टींखाली पेनाने अधोरेखित करायचे.

काही गोष्टी असतात ज्या पटकन समजतात आणि लक्षात देखील राहतात पण काही गोष्टी जसे कि आकडे, साल, दिनांक, नावे इ. या लक्षात राहत नाहीत मग त्याखाली पेनाने अधोरेखित केली कि आपल्या लक्षात राहते कि हे आपल्याला मागच्या वेळी आठवले नव्हते किंवा वाचून देखील आपल्याला विसरल्यासारखे वाटते आहे म्हणून आपण पेनाने अधोरेखित केले आहे.

आता शेवटचे वाचन. हे वाचन आपण आपल्या नेहमीच्या तीन वचनांमध्ये पकडले नाहीए कारण आपण जर नोट्स काढणार नसू तरच हे वाचन योग्य होऊ शकते. वाचताना ज्या गोष्टी अजूनही आपल्या डोक्यात राहत नाहीत त्यासाठी आपण हायलाईट पेनाचा वापर करणार आहोत.

हि पायरी तुम्ही टाळू देखील शकता. पण हे शेवटचे वाचन नोट्स काढल्याप्रमाणे हवे. उगाच हायलाईट करायचे म्हणून अख्खे पान नि पान रंगवून टाकायचे नाही. जे परीक्षेला आले आहे आणि जे आपल्या लक्षात राहायला त्रास होतो तेच हायलाईट करायचे आहेत.

● उदाहरण : कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण

भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस” कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे सामान संरक्षण नाकारणार नाही असे कलम १४ मध्ये म्हटले आहे. वरील उदाहरणाप्रमाणे आपण करू शकतो.

ही सारी वाचणे तुम्हाला अगदी मन लावून करायची आहेत. पहिले वाचन टप्प्याटप्प्याने करायला लागा, दुसऱ्या वाचनात दोन तीन टप्प्यात पुस्तक संपवा. त्यानंतर वाचन एकाच टप्प्यात संपवा. अशाने तुमचं वाचन वेगही वाढेल आणि तुमच्या संकल्पना स्पष्ट होतील. याशिवाय तुमच्या अभ्यासालाही योग्य दिशा मिळेल आणि तुमचं नीट रिविजन देखील होईल.

हे देखील वाचा :

Leave a Comment