# 1 Best MPSC C-SAT Strategy In Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो या Blog Post मध्ये MPSC C-SAT Strategy In Marathi मधून पाहणार आहोत, या Blog Post मध्ये Share केलेली MPSC C-SAT Strategy In Marathi हि आमच्या एका विद्यार्थ्याने आमच्या सोबत Share केलेली होती, त्यात त्यांना MPSC C-SAT बद्दल आलेला अनुभव Share केलेला आहे. (Credit: MPSC C-SAT Strategy In Marathi हि उमेश पोवार यांची आहे.)

या MPSC C-SAT Strategy In Marathi मुळेच आज त्यांची प्रत्येक MPSC Prelims आरामात Clear होत आहे. हि सांगितलेली MPSC C-SAT Strategy खूपच मार्गदशक वाटली आणि Deep मध्ये सांगितललेली आहे, या MPSC C-SAT Strategy चा तुम्हाला पण नक्कीच फायदा होईल यासाठीच आम्ही येथे MPSC C-SAT Strategy तुमच्या सोबत Share करत आहोत.

गेल्या 8 वर्षात C-SAT चा समावेश MPSC Rajyaseva Prelims ला करत असल्यापासून मी परीक्षा देत आहे. सुरुवातीला हा प्रकार नेमका काय आहे ते कळत नव्हते 2016 पासून मी थोडं गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. सहसा आपण गांभीर्याने घेणे म्हणजे Quantitative समजतो Qualitative बहुदा दुर्मिळच हीच चूक मी पण केली वारंवार उतारे सोडवणे शेकड्यांनी Maths आणि Reasoning उदाहरणे सोडवणे असले कष्ट घेऊन देखील पदरात अपयशच पडत होते.

एका वेळी तर असं वाटलं होतं की MPSC Rajyaseva आपल्या आयुष्यातच नाही या उदास वेळी मी शांत बसून विचार केला की असं नेमकं काय घडतंय की आपल्यापेक्षा कमी कष्ट घेणारे पास होतात आणि आपण होत नाही मग मला थोडा योग्य मार्ग दिसला मी पुन्हा दिलेले पेपर्स OMR शीट सहीत पुन्हा Check केले.

Tip: OMR शीट जपून ठेवा आपल्या Weak Point नंतर शोधावा लागतो.

त्यात मला काही गोष्टी समजून आल्या होत्या त्याच नेमक्या मी Follow करण्यास सुरुवात केली आणि नंतरच्या वर्षात मी पूर्वपरीक्षा आरामात पास होऊ शकलो मी अजून काही हे यश मिळवले नाही पण जे मला c-sat विषयी समजलं ते तुम्हाला प्रामाणिकपणे Share करतोय.

मला खात्री आहे की या MPSC C-SAT Strategy चा नक्कीच तुम्हाला सुद्धा फायदा होईल. खाली काही मुद्दे मांडले आहेत ते काळजीपूर्वक वाचा नक्की फायदा होईल.

MPSC C-SAT Strategy In Marathi

IMP 5 Points

1) No Common Strategy: या पेपरसाठी अशी कोणतीही एकमेव Strategy नाही प्रत्येक माणसागणिक स्वतःच्या Understanding नुसार पेपर सोडवला तर निश्चित फायदा होईल so don’t follow others; just copy Applicable points.

2) Wrong Propaganda: काही विद्यार्थी असा विचार करतात की भरपूर सारे Practice comprehension passages सोडवले तर आपण C-SAT आरामात पास होऊ शकतो, परंतु असं काही नाही. Practice Papers सोडवावेत पण ते quantity च्या दृष्टिकोनातून नाही, तर Quality च्या दृष्टिकोनातून सोडवलेले बरे असेल. (उत्तर का आले असा विचार करून.)

3) External Burden of Time Management: हा सगळ्यात मोठा शत्रू मी मानतो तुम्ही चिंता करून उलट तुमचं नुकसान करतात नॅचरल परफॉर्मन्स तुम्हाला कट ऑफ क्रॉस करायला मदत करत असतो पण तुम्ही वेळेचा अति विचार करून हातची संधी घालवता. so be natural

4) Wrong Perception of Cut-Off: हा विचार तुम्हाला संधी गमावण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. गेल्या वर्षी इतका कट ऑफ मग यावर्षी इतक्या जागा यावरून कट ऑफचा अंदाज बांधून तशी मानसिकता ठेवून पेपर ला जाणे अतिशय महाचूक.
फक्त विचार करा मी सराव केला आहे जसा पेपर असेल तसा कट ऑफ लागेल.

5) Follow Strategy of Others at the last moment: इतर शत्रू मधला हा एक शत्रू तुम्ही जे ठरवला आहे त्याप्रमाणे पेपर सोडवायचा आहे पहिला मुद्दा तेच सांगतो. No common strategy so don’t follow others तुम्हाला हे करायला भाग पाडतो पण ते अपयश देऊ शकतं.

वरील पाच मुद्दे हे आपले शत्रू आहेत तुमचे योग्य वेळी विचार करून तुम्हाला पुढे जायचं आहे आता मी काही परीक्षाभिमुख मुद्दे सांगतो जे तुम्हाला निश्चित करून देतील एकेक मुद्दा वारंवार वात्साप तुम्हाला आता सात होईपर्यंत.

MPSC C-SAT Strategy In Marathi

परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला Tools खालील प्रमाणे लागतील.

1) 2013-2020 यावर्षीचे पेपर
2) Comprehension Book
3) खाजगी क्लासेस चे पेपर्स सरावासाठी
4) Math & Reasoning Book

महत्वाचे मुद्दे: Do’s & Don’t

1) परीक्षेचा पॅटर्न समजून घेणे उदाहरणार्थ C-SAT 80 प्रश्न 2 hrs. वेळ 1/3 Negative Marking (आता 1/4 नवीन नोटिफिकेशन नुसार)

2) पूर्वी 1/3 ला थोडा हात आखडता घ्यावा लागत होता यावर्षी 1/4 मुळे तुम्ही तुमचं Attempt थोडा वाढवू शकता.

3) माझी वैयक्तिक स्ट्रॅटेजी दिलेला वेळ चार भागांत विभागणी करणे. पहिलं Comprehension की Math Reasoning हे ज्याच्या त्याच्या स्ट्रॉंग पॉईंट नुसार.

4) भाग

30 min. – Comprehension
30 min. – Maths-Reasoning
30 min. – Comprehension
30 min. – Maths-Reasoning

ही गोष्ट तुम्हाला पेपर परिपूर्ण सोडवण्यासाठी मदत करेल.

5) आता step-by-step strategy पाहूया.

पेपर हातात आल्यावर ओवर पहिला तू नीट प्रेम झाला आहे का बघा असा दुर्मिळ असेल पण तो अपवाद असू शकतो ना एक मानसिक त्रास नंतर होऊ शकतो.

6) राहिलेला मुद्दा म्हणजे तीस मिनिटांचा आदी डिस्कस केलेला आहे ज्याचा त्याचा स्ट्रॉंग पॉईंट नुसार.. follow करा, त्यामुळे पुन्हा घेत नाही.

7) 8 Star Points

पहिले पाच मिनिट एकूण किती पॅसेज आहेत मराठी प्लस इंग्रजी बघा त्याबरोबरच किती प्रश्नांचे आहेत ते बघा

उदा. एकूण 9 पॅसेज – मराठी
1 पॅसेज – इंग्रजी

दोन 5 प्रश्न वाले
5 तीन प्रश्न वाले
एक 4 प्रश्न वाला
एक-2 प्रश्न वाला

पण हे फिक्स नसतात दरवर्षी बदल असू शकतो.

हे सर्व पहिल्या पाच मिनिटांत झालं पाहिजे.

त्या प्रश्नांचा क्रमांक पॅसेज वर पेन्सिलने लिहा.

आता पुढे-
एका पॅसेज ला किती वेळ द्यायचा हे आधी अजिबात करू नका नाहक बर्डन घेऊ नका.

खरी बॅटल –
पॅसेज ची निवड याच्या अगोदर पॅसेज चे प्रकार समजून घेतले पाहिजेत.

Types Of Passages

माझ्या मते पॅसेजेस खालील प्रकारे असतात.

१) फॅक्च्युअल वस्तुनिष्ठ २) अनलिटिकल लॉजिकल तर्कसंगत ३) सायंटिफिक शास्त्रीय ४) फिलोसोफिकल तात्त्विक

मुख्यतः एकूण Passages पैकी फॅक्च्युअल वस्तुनिष्ठ प्रकारचे उत्तरे सुरुवातीला घ्यायचे.

त्यात पण जादा प्रश्न असणारे सुरुवातीला आता प्रश्न पडतो फॅक्च्युअल वस्तुनिष्ठ म्हणजे नेमके कोणते?

तर जे सोडवण्यासाठी उत्तर अगोदर वाचण्याची गरज लागत नाही तुम्ही प्रश्नावरून भेटू उतरत नजर टाकून उत्तर शोधू शकतात.

असे उतारे बघताक्षणी कळायला हवेत त्यासाठी थोडं प्रॅक्टिस ची गरज आहे.

त्यानंतर इतर Passages त्यात पण शक्यतो सायंटिफिक (वैज्ञानिक शास्त्रीय) तसेच फिलोसोफिकल (तात्विक) उतारे शक्यतो शेवटी द्यावे कारण ते समजून घ्यायला अवघड असतात पण एखादे वेळी आपण ते स्किप करू शकतो.

सर्वच्या सर्व उत्तरे सोडवण्याची किंवा एखाद्या उत्तरातील सर्व प्रश्न सोडवण्याची आवश्यकता नाही एखादा कंट्रीज इन उतारा किंवा प्रश्न skip करू शकतात.

काही उतारे अगोदर वाचावे लागतात तर काही उतारे अगोदर प्रश्न वाचायला लागतात हे समजायला आपल्याला आयोगाचे प्रीवियस पेपर तसेच इतर सराव पेपर practice साठी मदत करतील.

मला वैयक्तिक असं वाटतं की passage (उतारा) पूर्ण झाल्यानंतरच तो OMR शीट मध्ये गोल भरावा.

एखादेवेळी नजर चुकीने चुकलेला पर्याय त्यावेळी दुरुस्त करू शकतो ज्या त्या वेळी भरला तर ती चूक राहू शकते.

MPSC C-SAT Comprehension – Practice

MPSC C-SAT Strategy

Main Tool – 2013-2020 आयोगाचे पेपर्स मूड स्वरुपात प्रिंट मारून पेन्सिल ने तीन वेळा सोडवले तर कॉम्प्रेशन आत्मसात झालं!

इतर कोणत्याही गोष्टीची गरज लागणार नाही. आयोगाची मानसिकता यातूनच समजणार.

Sub-Ordinate tool – खाजगी क्लासेस चे सराव पेपर हे फक्त प्रॅक्टिस साठी ठीक आहेत पण एका लिमिट पर्यंत ठेवूनच नाहीतर परीक्षेच्या दिवशी आपण saturate होतो व त्याचा उबग येतो तारक ठरलं पाहिजे मारक नको.

सराव पेपर्स चे मार्क बघून अति उत्साहित किंवा नाराज होऊ नका फक्त स्ट्रॅटेजी follow करा मार्क्स काही कामाचे नाही.

वरील मुद्दे सोडून कुणाला काही निदर्शनात आले तर, [email protected] या ईमेल आयडीवर mail करा सर्वांच्या suggestions चे स्वागत आहे.

MPSC C-SAT Maths and Reasoning Strategy

MPSC C-SAT Strategy

Maths and Reasoning बद्दल मला निदर्शनात आलेल्या काही गोष्टी येथे तुमच्या सोबत शेअर करत आहे.

Art Faculty ची मुले नाहक या गोष्टींचं burden घेतात की, math चं कसं करावं.. मला तर math जमतच नाही.

मुळात खाली दिलेले सूत्र बघा मगच तुमचे गैरसमज आपोआपच दूर होईल.

Total questions – 80

Comprehension – 50
Math and reasoning- 25
Decision making – 05

आता

  • Comprehension – 50×2.5=125 मार्क
  • Decision making – 5×2.5=12.5
  • Reasoning मधील काही प्रश्न हे मुख्यता Comprehension (आकलन शक्ती) वर असतात. 5×2.5= 12.5

म्हणजेच एकूण = 150 marks

आता सांगा maths चा किती भाग राहतो out of 200 only 25% …so, दोष देण्यापेक्षा MPSC Exam Pattern Check करा.

Maths (अंकगणित) साठी आयोगाचे सर्व परीक्षांचे पेपर मधील अंकगणित सोडवून किती प्रकारचे प्रश्न विचारतात हे अभ्यासले तर याचा फायदा नक्की होणार आणि नाहक वेळ एक्स्ट्रा एक्झरसाइज सोडविण्यात जाणार नाही.

मुळात आयोगाचे पेपर्स चे नीट अभ्यास केला तर तुम्हाला समजून येईल की एलिमिनेशन मेथडने बघताक्षणी आपण दोन पर्यायांची निवड करण्यापर्यंत येऊ शकतो म्हणून आयोगाचे पेपर स्टडी करणे अत्यावश्यक आहे.

या वेळच्या नवीन Notification नुसार 1/4 Negative Marking असल्याने सर्वांनी Attempt समर्पक करावा एखाद्या प्रश्नावर न अडता निदान पर्यायांमधून 50% ते 50% Questions पण Attempt करावे हे सांगण्याची गरज नाही.

तरी पण सांगतो जर तुम्ही 10 क्वेश्चन फिफ्टी पर्सेंट अटेंम्पट केले आणि जरी 2 correct असले तरी…. नो profit नो loss.

10 Attempted
8 wrong = -2 marks
2 Right = +2 marks

नो profit नो loss.

So.. तुम्हाला जास्तीत जास्ती स्कोर करायचा असेल आणि cut-off क्रॉस करायचा असेल तर attempt वाढवणे हेच यावर पर्याय आहे.

तुमच्या प्रतिक्रियांचा तसेच सजेशन्स आमच्या ई-मेल ऍड्रेस वर [email protected] नेहमीच स्वागत असेल.

जर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच इतरांसोबत शेअर करा जेणेकरून याचा फायदा सर्वांनाच होईल.

1 thought on “# 1 Best MPSC C-SAT Strategy In Marathi”

Leave a Comment