MPSC आणि वेळेचे नियोजन | MPSC Exam दिवसभराचे नियोजन

“if you fail to plan, you plan to fail” हे वाक्य खूप काही सांगून जाते. जीवनात नियोजनाला इतके महत्व आहे. MPSC Exam असूदेत नाहीतर UPSC Exam किंवा कोणतीही स्पर्धापरीक्षा.

त्या परीक्षेचा Exam Pattern परीक्षेतील टप्पे, व्यापक अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची अनेक संदर्भ पुस्तके आणि किंमत वर्षभराचा सातत्यपूर्ण अभ्यास या वैशिष्ट्यांमुळे नियोजित तयारीशिवाय दुसरा मार्ग नाही.

परीक्षेचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेऊन अभ्यासाचे आणि वेळेचे नियोजन करणे अत्यावश्यक ठरते. पद्धतशीरपणे केलेले नियोजन आणि त्याची प्रभावी आणि काटेकोरपणे केलेली अंमलबजावणीच या परीक्षेचा मार्ग सुकर करू शकते. त्यामुळे वेळीच स्वतःला नियोजन पाळायची शिस्त लावणे देखील तितकेच गरजेचे आहे.

परीक्षेचे नियोजन करतांना हे मुद्दे लक्षात ठेवा

नियोजन करताना काही मुद्दे विचारात घ्यावे लागतात जसे कि, आपण कोणत्या परीक्षेची तयारी करणार आहोत. स्पर्धापरीक्षांमध्ये विविध पदांसाठी परीक्षा असते त्यातील तुम्ही नक्की यूपीएससी करणार आहेत कि एमपीएससी की दुसरे बँकिंग, सरळसेवा, सैन्यभरती इ. याबद्दल तुमच्या मनात आधी क्लॅरिटी हवी.

त्यानंतर आपण कोणत्या वर्षी परीक्षा देणार आहोत हे डोक्यात फिक्स हवे. त्या परीक्षेसाठी किमान एक वर्ष आधीपासून अभ्यासाला सुरुवात करावी. त्यापेक्षा जास्ती वेळ असेल तर दीर्घकालीन नियोजन करता येऊ शकते. एका वर्ष आधीपासून सुरुवात करताना हा अभ्यास शक्यतो पूर्णवेळ स्वरूपाचा असावा.

म्हणजेच या परीक्षेच्या तयारीच्या पहिल्या वर्षभरात पूर्णपणे परीक्षेच्या या अभ्यासावरच केंद्रित करावे. त्यानंतर महत्वचे म्हणजे प्राथमिक तयारी, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचे सखोल व सविस्तर वेळापत्रक तयार करावे लगेल त्या अंतर्गत मुख्य परीक्षेसाठी साधारणतः सात- आठ महिने तर पूर्वपरीक्षेसाठी चार महिन्यांचा कालावधी निर्धारित करावा.

या काळामध्ये विषयांचे अभ्यासक्रमानुसार सखोल नियोजन करणे. यात कोणता विषय आधी घ्यायचा, त्याला किती वेळ द्यायचा यानुसार वेळेची विभागणी करावी. दररोज एक कि दोन विषय करायचे हे ठरवावे. म्हणजे दिवस किंवा आठवडा विभागून विषयांचा अभ्यास करता येतो. तसेच नियोजन करताना रिविजन ला देखील तितकाच वेळ द्यावा.

पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्यांनी असे करा नियोजन

  • दिवसाचे नियोजन

अशा लोकांनी किमान १० तास रोजचा अभ्यास करणे महत्वाचे असते. त्यासाठी तुमचा दिवस कधी सुरु करायचा आणि कधी संपवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. साधारणतः तुम्ही तुमचा दिवस ६ ला सुरुवात करून ८ ला तुम्ही अभ्यासिकेत जाणे महत्वाचे आहे.

पहिले सामान्य अध्यायन यातील कोणताही एक विषय घेऊन सुरुवात करावी. भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र या विषयांना जास्ती महत्व द्यावे कारण हे विषय स्कोअरिंग आहेत. सोबतच जर तुम्ही दोन विषय एका दिवशी घेणार असाल तर भोगोल सोबत पर्यावरण, राज्यघटना सोबत इतिहास, अर्थशास्त्र सोबत विज्ञान हे विषय घ्यावे.

रोजच्या रोज चालू घडामोडी चा अभ्यास किमान १ तास करावा. तुमचे CSAT जर चांगले असेल तर तुम्ही रोज २ तास या विषयाला देऊ शकता. म्हणजे सकाळी ३ तास सामान्य अध्ययन चा एक विषय त्यानंतर एक तास चालू घडामोडी नंतर दोन तास CSAT आणि पुन्हा ३ तास सामान्य अध्ययन दुसरा विषय असे नियोजन असावे. रात्री झोपायच्या आधी एक तास आदल्या दिवशी जे वाचले असेल त्याची रिविजन करणे. हे झाले तुमच्या १० तासाचे नियोजन.

  • आठवड्याचे नियोजन

वरील प्रत्येक विषयाला १० दिवस द्यावे. तुमचा ८ दिवसांचा आठवडा असेल आणि शेवटच्या ९ व्या आणि १० व्या दिवशी पुन्हा आठवड्याभरात जे वाचले त्याची रिविजन आणि त्या विषयाचे पूर्वी परीक्षेला विचारलेले प्रश्न सोडवणे. अशाप्रकारे आठवड्याचे नियोजन असावे.

  • महिन्याचे नियोजन

महिन्याच्या शेवटी पाच दिवस राखून ठेवावे आणि जे काही आपण महिनाभर वाचले आहे त्याच्या नोट्स काढून तयार ठेवाव्या. ज्या गोष्टी आपण विसरतो आहे त्याच नोट्स मध्ये लिहून ठेवाव्या.

नोकरी करणाऱ्यांनी असे करा नियोजन

नोकरी करणाऱ्यांसाठी स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कमी वेळ असतो. त्यामुळे जेवढपण अभ्यास होईल तो व्यवस्थित आणि पक्का च झाला पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे. अशा लोकांनी रात्री २ तास आणि सकाळी २ तास अभ्यास करावा.

तुम्ही तुमच्याप्रमाणे विषयांचे विभाजन अभ्यासक्रमानुसार आणि पूर्वीच्या प्रश्नपत्रिकानुसार करू शकता. जेव्हा तुम्ही कामावरून घरी येत तेव्हा तुम्ही चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता अंकगणित प्रत्येकी एक एक तास करू शकता. आणि सकाळच्या वेळी २ तास सामान्य अध्ययन चा कोणताही एक विषय करू शकता.

गृहिणींनी असे करा नियोजन

बऱ्याच गृहिणी परीक्षेसाठी तयारी करत असतात. गृहिणींचा सर्वात म्हत्वाचा प्रश्न म्हणजे कामांमधून अभ्यासासाठी वेळ कसा काढायचा? तर अभ्यास करणे म्हणजे काय फक्त पुस्तके वाचणे असा अर्थ नसून तुम्ही कोणत्याही प्रकारे अभ्यास करू शकता जसे की, ऐकून, व्हिडिओ पाहून इ.

सकाळी तुमची सर्व कामे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही निवांत होता तेव्हा स्टेट बोर्ड ची पुस्तके वाचून त्याच्या नोट्स काढा आणि तुमच्या आवाजात त्या मोबाइल मध्ये रेकॉर्ड करून नंतर काम करता करता ऐकू शकता. प्रत्येक गृहिणीची दिनचर्या वेगळी असू शकते त्यामुळे इथे वेळापत्रक बनवून देणे संयुक्तिक ठरणार नाही.

तुमची तुमच्या दीनचर्येनुसार पाहू शकता. दुपारी झोपण्याची सवय असेल तर ती सोडून द्या आणि त्या वेळात गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी करू शकता.

अभ्यासास प्रत्यक्षपणे सुरुवात केल्यानंतर तुम्हाला बारकावे लक्षात येतील त्यात आपल्या गरजेनुसार आवश्यक ते बदल करता येतील. कारण प्रत्येक व्यक्ती सारखी असत नाही आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अमुक एक गोष्ट प्रारूप मानता येत नाही. म्हणून स्वतःचे निरीक्षण करत उपलब्ध वेळेचा कमाल आणि प्रभावी वापर ज्या पद्धतीने होईल तीच पद्धत प्रमाण मानून त्याप्रमाणे नियोजन करावे.

1 thought on “MPSC आणि वेळेचे नियोजन | MPSC Exam दिवसभराचे नियोजन”

Leave a Comment