Revision Techniques for MPSC Exam 2022 | अभ्यासाचे Revision कसे करावे ?

MPSC Study Revision : तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करत असाल मग ती स्पर्धा परीक्षा MPSC असो वा इतर कुठलीही असो तुम्ही केलेल्या अभ्यासाचे Revision कसे करावे । Revision करण्याची Best Method काय आहे ? ह्या प्रश्नाचे उत्तर Revision Techniques for MPSC Exam 2022 या लेखात आपण सविस्तर बघुयात त्याच सोबत Revision करण्याच्या काही पद्धतींवर सुद्धा चर्चा करूयात.

मित्रांनो, कसा चालू आहे तुमचा अभ्यास. आपले पूर्वीचे लेख वाचून त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली असेलच. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे कि जो अभ्यास झाला आहे त्याची उजळणी करायची आहे ती कशी करायची बरं! केलेला अभ्यास लक्षात राहावा यासाठी रिविजन तर करायलाच हवी पण ती करावी कशी हा यक्ष प्रश्न समोर आहेच. चला तर मग आज आपण रिविजन विषयी थोडे बोलूया.

रिविजन म्हणजे नक्की काय ?

रिविजन म्हणजे तुम्ही जी गोष्ट वाचली आहे ती पुन्हा पुन्हा डोळ्याखालून घालणे, सतत वाचणे आणि आठवायचा प्रयत्न करणे.

Why Is Revision So Important | Revision का ?

कोणत्याही परीक्षेची तयारी करा तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर केलेला अभ्यास सतत वाचत राहणे, त्याचे चिंतन करत राहणे, आठवून पाहणे हे गरजेचे आहे. कारण असे केले तरच तुम्हाला ते परीक्षेमध्ये आठवणार आहे ना. आणि परीक्षा हे काही बघून लिहायची नक्कीच नाही.

ती तर वाचलेले, समजून घेतलेले आठवून लिहायची आहे. नुसते वाचून काही लक्षात राहत नाही. त्यासाठी सतत ती गोष्ट डोळ्याखालून घालावी लागते. तुम्ही संपूर्ण पुस्तक वाचता पण त्यातील काही गोष्टीच तुमच्या लक्षात राहतात. आपला मेंदू एवढा सक्षम नाही कि एका वाचनात तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकता.

त्यामुळे सतत एखादी गोष्ट वाचली कि टप्प्याटप्प्याने साऱ्या गोष्टी विशिष्ठ पद्धतीने लक्षात राहतात. त्यासाठी रिविजन महत्वाची भूमिका बजावते. उगाचच टॉपर लोक म्हणत नाहीत कि एकच पुस्तक वाचा आणि त्याची १०० वेळा रिविजन करा.

हे सुद्धा वाचा :

Revision Techniques for MPSC Exam 2022

आता तुम्ही सगळं अभ्यासक्रम संपवला असेल आणि तुम्ही 2022 च्या MPSC Exam साठी तुमच्या MPSC Notes देखील तयार असतील असे गृहीत धरूया. तर आपण आता २४-७-३० हा फॉर्मुला वापरून रिविजन करणार आहोत. अर्थात प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते तुम्ही तुमच्या प्रमाणे करू शकता. तर २४-७-३० काय आहे हे Revision Techniques for MPSC Exam 2022 या लेखात पाहू.

आपण वाचलेली गोष्ट आपल्या २४ तास लक्षात राहते. २४ तासानंतर ती विस्मरणात जायला लागते. त्यामुळे कोणताही विषय जो तुम्ही आजच्या दिवशी वाचला आहे तो पुन्हा २४ तासाने वाचायचा. पुन्हा २४ तासाने वाचून झाले कि आपल्या डोक्यात अजून पक्के होते कि आपण काय वाचले आणि ते एका आठ्वड्यापर्यंत थोडे थोडे लक्षात राहते.

त्यानंतर मात्र थोडे विसरल्यासारखे होते मग पुन्हा ७ दिवसानंतर तो विषय पुन्हा वाचायचा अशाने आपण विसरलेल्या गोष्टी आपल्याला लगेच आठवतात आणि पुन्हा वाचल्यावर त्या डोक्यात पक्क्या होतात. त्यानंतर पुन्हा तो विषय आपल्याला ३० दिवसांनी पाहायचा आहे.

असे केल्याने तुम्ही थोडे विसरायला लागलात कि पुन्हा पाहिल्याने ते लक्षात राहते आणि आपल्याला समजते कि आपल्या काय लक्षात राहत नाही. जे लक्षात राहत नाही ते एका बाजूला लिहून ठेवायच्या किंवा स्टिकी नोट्स असतात त्या करून आपल्या बेडरूम च्या भिंतीवर लावून टाकायच्या आणि रोज येता जाता किंवा रात्री एक तास झोपायच्या आधी वाचले तर आपल्या डोक्यातुन ते कधीही जाणार नाही.

तुम्ही पाहूच शकता की, या पद्धतीने आपल्या किती रिविजन पडत आहेत आणि सोबतच आपल्या अजून छोट्या ज्याला आपण पॉकेट नोट्स म्हणू शकतो किंवा मायक्रो नोट्स म्हणू शकतो त्या तयार होतील.

आपल्या एका विषयाच्या अशा पद्धतीने तीन ते चार रिविजन पडत आहेत शिवाय मुद्देही एकदम पक्के होत आहेत. त्यामुळे परीक्षेत प्रश्न आला कि तुमच्या समोर तुमच्या नोट्स किंवा पुस्तकाचे पान नंबर पासून सगळे आठवू शकेल.

हे सुद्धा वाचा :

Revision करण्याच्या इतर पद्धती

  • प्रश्न सोडवणे :

रिविजन ची सगळ्यात महत्वाची पद्धत ती म्हणजे प्रश्नाचा सराव. कारण प्रश्न सोडवताना तुम्हाला तुम्ही वाचलेला डेटा किंवा माहिती हि प्रोसेस करायची असते आणि त्यावेळी तुम्हाला फक्त त्या प्रश्नाशी निगडित माहितीच नाही तर इतर माहितीदेखील आठवते त्यामुळे जिथे जास्ती प्रश्न सोडवाल तेवढी जास्ती रिविजन होणार आहे.

  • विडिओ लेक्चर :

काही लोक विडिओ लेक्चर पाहून देखील रिविजन करतात. चार पाच वेळा विडिओ लेक्चर पाहिल्याने शिक्षक कशापद्धतीने तुम्हाला शिकवतात, कशा पद्धतीने त्या आकृत्या काढून तुम्हाला शिकवतात, तुम्हाला वेगवेगळे किस्से सांगतात त्यामुळे त्या संकल्पना तुमच्या चांगल्या लक्षात राहतात.

  • मित्रांशी चर्चा :

काही मित्रांच्या गटामध्ये आपल्याला समजलेल्या संकल्पना आपण त्यांना समजावून सांगितल्या तरी आपली रिविजन चांगल्या प्रकारे होऊ शकते कारण जेव्हा आपण एखाद्याला शिकवतो तेव्हा ते आपल्या जास्ती लक्षात राहते.

मित्रांनो आपण Revision Techniques for MPSC Exam 2022 | रिविजन कशी करावी हे पहिले परंतु या गोष्टींमध्ये सातत्य राहिले तरच या गोष्टीचा फायदा होतो. त्यामुळे ठरवलेल्या दिवशी ठरवलेल्या गोष्टी करण्याची सवय आपल्याला लागली तर आयुष्यात अशक्य काहीच नाही.

Leave a Comment