THE REVOLT OF 1857 In Marathi | अठराशे सत्तावनचा उठाव

THE REVOLT OF 1857 In Marathi | अठराशे सत्तावनचा उठाव : MPSC Exam असो अथवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा जर Specific MPSC Exam चा विचार केला तर 1857 चा उठाव आणि महाराष्ट्र हा आयोगाकडून विचारण्यात येणारा हमखास प्रश्न असतोच याच दृष्टिकोनातून येथे 1857 चा उठाव आणि महाराष्ट्र या Topic वर Extensive Information Cover करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

THE REVOLT OF 1857 In Marathi । अठराशे सत्तावनचा उठाव या लेखात महाराष्ट्रातील उठावाची ठिकाणे कोणती होती, भिल्ल व इंग्रज यांच्यात ११ एप्रिल १८५७ रोजी कोणती लढाई झाली, सेवाराम हा कोणत्या उठावाचा नेता होता, रामोर्शीचे उठाव, उमाजी नाईक.

त्याचबरोबर 1857 उठावाचे नेतृत्व कोणी केले, 1857 चा उठाव आणि महाराष्ट्र व 1857 चा उठाव यासंदर्भात सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती येथे Cover केलेली आहे.

Subtopics Covered In This Topic

pannel background 1
THE REVOLT OF 1857 In Marathi

THE REVOLT OF 1857 In Marathi | अठराशे सत्तावनचा उठाव

1857 पूर्वीचे महाराष्ट्रातील उठाव | Uprisings in Maharashtra before 1857

खानदेशातील भिल्लांचे उठाव (1818 to 1831)

 • पहिला टप्पा
 • इंग्रजी राजवटीच्या असंतोषातून हा उठाव
 • नेतृत्व – सुरुवातीला ३२ भिल्लांनी केले नंतर बाजीरावाचे सरदार त्रीबंकजी डेंगळे यांनी गोदाजी
 • डेंगळे व महिपा डेंगळे या आपल्या दोन पुताण्यांकडे सोपवले.
 • इंग्रज अधिकारी – बगलानाचे कलेक्टर -कॅप्टन ब्रिग्ज-नेतृत्व
 • नंतर एल्फिस्टनने शांततेचे धोरण स्वीकारले.

१८१९ ते १८२० पुन्हा उठाव :

 • धनाजी, हसरत, शेख दुल्ल यांनी सातपुडा परिसरात धुमाकूळ घातला.
 • इंग्रज अधिकारी – कॅप्टन ब्रिग्ज, मेजर मोरीन यांनी बिमोड केला.

१८२२ पुन्हा उठाव:

 • हरिया नावाच्या भिल्लांच्या प्रसिध्द पुन्हा एकदा उठाव केला.
 • कॅप्टन रॉबीनसनने भिल्लांच्या उठावाचा बिमोड केला.

१८२५ पुन्हा उठाव :

 • सेवाराम धीसाडी-नेतृत्व
 • इंग्रज अधिकारी -लेफ्टनंट आउटरॅम
 • १८२८ पर्यंत भिल्लांचे उठाव बिमोड करण्यास इंग्रजांना यश.

धर्माजी प्रतापराव – बीड

 • १८१८ साली धर्माजी प्रतापराव यांनी निजाम सरकार विरुध्द उठाव केला.
 • नेतुत्व – नवाब मुर्तझा ठरजंग आणि लेफ्टनंट जॉन सौदरलंड (निझाम + इंग्रजांनी एकत्रित मोहीम)
 • ११ ऑक्टोबर १८१८ – औरंगाबादमधील अंबड शहरात ब्रिटिशांविरुध्द संघर्ष.
 • ब्रिटिशांनी माघार-कॅप्टन वेल्स च्या सैनिकातील लोक फितूर

नांदेडचे हटकर

 • हंसाजी हटकरानाईक यांचे छोटेसे राज्य
 • नेतृत्व-मेजर पिटमन, कॅप्टन इव्हान्स, कॅप्टन टेलर
 • हन्साजीचा उमरखेड्यावरून लढत देताना त्यांचा पराभव झाला.

रामोर्शीचे उठाव

 • १८१८ नंतर किल्ल्यांचे महत्व संपल्यामुळे रामोशिंच्या पारंपारिक अधिकारांवर गदा आल्यामुळे
 • इंग्रजांविरुध्द असंतोष उफाळला सातारा-चीतुरसिंग, सासवड-सतू नाईक, पुरंदरचे-उमाजी नाईक

उमाजी नाईक

 • नाव – उमाजी दादोजी खोमणे
 • साथीदार – विठोजी नाईक, कृष्णा नाईक, खुशब रामोशी
 • वतने रद्द झाल्यामुळे त्यांनी आपले स्वातंत्र्य व स्वराज्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द लढा सुरु केला

 • १८२३ – ब्रिटीश कोतवालाची हत्या करून ब्रिटिशांना आव्हान दिले.
 • १८२४ – भांबुर्डी (शिवाजीनगर) येथील खजिना लुटला.
 • १८२६- जेजुरीच्या पोलीस चौकीदार हल्ला करून हत्यारे ताब्यात घेतली.
 • १८२६-अटकेसाठी पहिला जाहीरनामा (१०० रु. बक्षीस) बक्षिसाच्या आमिषाने पकडून देणाऱ्या शिवणक महाराला ठार मारले.
 • १८२७ – उमजीनी पुण्याच्या कलेक्टर एच.डी.रॉबर्टसन कडे विनोबा व अमृता रामोशी यांना सोडावे, परंपरागत वतने परत करावीत आदि मागण्या केल्या.
 • १५ डिसेंबर १८२७ – एच.डी.रॉबर्टसनने त्याच्या उत्तरात अटकेसाठी जाहीर नाम काढला. तरीही उमाजी न मिळाल्याने त्यांच्या बायको व मुलांना कैदेत ठेवले.
 • १८२९ – समझोता करून उमजींना १२० बिघे जमीन इनाम म्हणून देण्यात आली. काही रामोशींना नोकऱ्या देण्यात आल्या. उमजींना नाईक ही पडावी देवून पुरंदर किल्याचे अंमलदार बनवले.
 • १६ डिसेंबर १८०० – ब्रिटीशांच्या नजरकैदेतून निसटून पळाले.
 • उमजींना पकडण्याची जबाबदारी कॅप्टन ल्युकनकडे आली. (कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॅकिनटॉश हे सुध्दा होते.
 • १६ फेब्रुवारी १८३१ – स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिध्द केला.
 • २०० बिघा जमीन ५०० रु. रोख लालसेपोटी त्यांचे साथीदार कळू व नाना यांनी फितुरी करून पकडून दिले.
 • १५ डिसेंबर १८३१ – कॅप्टन मॅकिनटॉश ने पकडले.
 • ३ फेब्रुवारी १८३४ – फाशी देण्यात आली.
 • उमाजी नाईकचा शिवाजी आदर्श होता त्याला जर फाशी दिली नसती तर तो महाराष्ट्रातील दुसरा शिवाजी झाला असता.’ – कॅप्टन मॅकिनटॉश

सावंतवाडी संस्थानातील ब्रिटिशाविरोधी उठाव

 • १७ फेब्रुवारी १८१९ – वाडीच्या सावंतानी तहद्वारे ब्रिटीशांचे मांडलीक्त्व मान्य केले.
 • १८२३ – खेमसावंत बापूसाहेब सत्तेवर आले.
 • सावंतवाडी संस्थानात एकूण तीन वेळेस उठाव झाले. (१८२८, १८३८, १८४४-४५)
 • पहिला उठाव १८२८ – महादेवागादाचा पूर्वीचा किल्लेदार फोंडसावंत तांबूळवाडीकर याने बंड करून किल्ला ताब्यात घेतला.
 • खेमसावंतांणी ब्रिटीशांची मदत घेऊन बंड शमवले.
 • १८३२ – राजेसावंत यांची पत्नी दादीबाईने राजाच्या विरोधात बंड केले.
 • अशांतता व अस्थैर्य याचे कारण देवून १८३३ साली संस्थानाचा कारभार ब्रिटिशांनी पोलिटिकल एजंट च्या हाती दिला. त्यामुळे संस्थानात असंतोष निर्माण झाला.

दुसरा उठाव (१८३८)

 • नेता- आत्माराम चौककर
 • इंग्रज अधिकारी – स्पुनर (पोलिटिकल एजंट)
 • १२ लोकांना पकडून काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अहमदाबादला पाठवले.

तिसरा उठाव (१८४५)

 • संस्थानात सगळीकडे अराजक माजले.
 • कॅप्टन औटरमन याने मनोहरगड हे प्रमुख ठिकाण ताब्यात घेतले.
 • अण्णासाहेबांचा संस्थानावरील हक्क काढून घेऊन मुलुख खालसा केला.

कोल्हापुरातील गडकऱ्यांचे उठाव (१८४४)

 • १ ऑक्टोबर १८१२ रोजी झालेल्या तहानुसार कोल्हापूरच्या छत्रपतींनी ब्रिटीशांचे मांडलीकत्व स्वीकारले.
 • १८२१ – राजे शहाजी उर्फ बुवासाहेब गाडीवर आले.
 • १८३८ यांच्या निधनानंतर ब्रिटिशांनी हस्तक्षेप करून ‘दाजी कृष्ण पंडित’ यास दिवाण म्हणून नेमले.
 • गडकऱ्याजवळील जमिनी त्यांच्या-त्यांच्या जवळ ठेवून शेतसारा सरकारकडे जमा करावा व यासाठी मामलेदाराची नियुक्ती केली हि पध्दत गडकऱ्याना अमान्य होती.
 • इंग्रज अधिकारी-कॅप्टन औटरम
 • गडकऱ्यानी काही किल्ले ताब्यात घेतले होते.
 • १८४४ – किल्ले ताब्यात घेण्यावरून चोपडा, यावल, पाचोरा या भागात मन्साराम व दलजी सखाराम यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाले.
 • १८५२ – शेतासाऱ्याच्या वाढीमुळे चोपडा, सावदा, रावेर या ठिकाणी उठाव (प्रतीसारकारे स्थापन)

कोळ्यांचे उठाव

 • पारंपारिक हक्क संपल्याने उपासमारीची वेळ आली त्यामुळे हे उठाव १८३१ साली पहिला उठाव घडून आला.
 • १८३९ मध्ये सह्याद्रीच्या परिसरात उठाव घडून आला.
 • नेतृत्व – भाऊखरे, चिमाजी जाधव, नाना दरबारे, रामचंद्र गोरे
 • इंग्रज अधिकारी – पुण्याचा कलेक्टर रोज
 • रामचंद्र गोरे यांस फाशी देण्यात आली.
 • १८४४ – रघु भांगरे, भांगरे यांनी उठाव केला.
 • उमाजी नाईकांचा मुलगा तुक्याने मदत केली.
 • १८४८ – रघुजी भांगरे यांस फाशी देण्यात आली.

THE REVOLT OF 1857 In Marathi

THE REVOLT OF 1857 In Marathi

What Was The Main Cause of The Revolt of 1857 / Causes of Revolt of 1857 (१८५७ च्या उठावाची कारणे)

1. राजकीय करणे:-

 • इंग्रजांचे विस्तारवादी धोरण
 • तैनाती फौजेची पदधत
 • संथानांचे विलीनीकरण
 • वेतन व इनामदारीचा ऱ्हास
 • राज्यकारभाराची इंग्रजी भाषा

2. आर्थिक कारणे

 • डोईजड कर आकारणी
 • व्यापार व उदयोगांचा ऱ्हास
 • आर्थिक शोषण

3. धार्मिक कारणे (सामाजिक)

 • ख्रिश्चन धर्मप्रसार
 • धार्मिक सुधारणांचा इंग्रजांचा प्रयत्न
 • हिंदू धर्म ,देवांची व ग्रंथांची होणारी हेटाळणी

4. लष्करी कारणे

 • हिंदी शिपायांना मिळणारी अन्याय वागणूक
 • शिपायांच्या आर्थिक समस्या
 • शिपायांचा धार्मिक असंतोष

5. तत्कालीन कारणे

 • काडतुसांवर गाय व डुकरांची चरबी तोंडाने काढावं लागायचे

Who Started The Revolt of 1857 ?

THE REVOLT OF 1857 In Marathi

उठावाचे ठिकाण – उठावाचे नेतृत्व – इंग्रजांचे नेतृत्व

उठावाचे ठिकाणउठावाचे नेतृत्त्वइंग्रजांचे नेतृत्व
दिल्लीबहादुरशाह जफर, बख्त खाँजनरल हडसन, जॉन निकलसन
कानपुरनानासाहेबकॉलिन कॅम्पबेलह्यू व्हीलर
लखनौबेगम हजरत महलनिल,हेनरी लरिन्स,कैंपबेल
बरेलीखान बहादूर खानहडसन,व्हिन्सेंट,कॉलिन कैंपबेल

उठावाचे ठिकाणउठावाचे नेतृत्वइंग्रजांचे नेतृत्व
जगदीशपुर/ बिहारकुवर सिंगविलियम टेलर, विंसेट आयर
ग्वालेरतात्या टोपेहयू रोज
झाशीराणी लक्ष्मीबाईहयू रोज
फैजाबाद/अवधमौलवी अहमद उल्लाकर्नल नील

Who Started the Uprising of 1857 in Maharashtra?

THE REVOLT OF 1857 In Marathi (महाराष्ट्रातील 1857 चा उठाव कोणी-कोणी सुरू केला?)

 • 1] रंगो बापूजी गुप्ते
 • Que. कोणती ठिकाणी निवडली?
 • Ans. कोल्हापूर,कराड,वाठार,फलटण आणि बेळगाव हि ठिकाणी निवडली. तसेच रामोशी, कोळी मांग लोकांना एकत्र केले. (इंग्रजांकडून साताऱ्याचे राज्य परत मिळवण्यासाठी प्रयत्न परंतु योजना असफल.

 • 2] कोल्हापूर मधील हिंदुस्थानी सैनिकांचा उठाव
 • कोल्हापूर मधील २७ व्या रेजिमेंट मधील सैनिकांनी उठाव केला.
 • या योजनेची माहिती इंग्रजांना मिळाली
 • जेकब नावाच्या इंग्रजाने नेतृत्व केले. आणि हि योजना दडपून टाकली

 • 3] औरंगाबाद चा उठाव
 • हिंदी शिपाई आणि घोडदळात मुस्लिम सैनिक यांच्या हालचाली संशयास्पद होत्या.
 • उठाव होण्यापूर्वीच इंग्रजांनी अनेकांनी पकडले आणि फाशी दिली.

 • 4] पेठ मधील उठाव (जिल्हा : नाशिक)
 • पेठचा राजा- भगवंतराव निळकंठराव उठावाचे नेतृत्व.
 • कोळी लोकांनी हर्सल चे बाजार लुटले
 • भिल्ल लोकांनी सहभाग घेतला.
 • बंडखोरांनी सरकारी खजिना लुटला.

 • 5] मुधोळ मधील उठाव
 • नागपूर,लखनऊ, कानपुर चे साहाय्य मिळाले
 • इंग्रजांनी नागपूर Residency ताब्यात (सीताबर्डी,कामठी)
 • १८५७ मध्ये शस्त्रबंदी कायदा लागू झाला.
 • आदिवासी (बेरड) जमातीच्या लोकाना हा कायदा मान्य
 • इंग्रज आणि (आदिवासी, बेरड) लोकांमध्ये छोटे-मोठे युद्धे

 • 6] नाशिक आणि नगर मधील उठाव
 • इतिहासात अजरामर प्रख्यात असा भिल्ल लोकांचा उठाव.
 • नांदगाव येथे भिल्ल आणि इंग्रज यांच्या मध्ये जोरदार चकमक झाली.
 • भिल्लाना पकडून फाशी देण्यात आली.

Causes of Failure of Revolt of 1857 | १८५७ चा उठाव अपयशी होण्यामागची कारणे

 • बंडाचा फैलाव संपूर्ण भारतभर व्यवस्थित होऊ शकला नाही.
 • भारतातल्या Princely States चा चांगल्या प्रकारे Support मिळू शकला नाही.
 • बंड करणाऱ्या लोकांना चांगलं Leadership मिळू शकलं नाही.
 • बंड करणाऱ्या प्रत्येक लोकांचे वेगवेगळे उद्देश्य होते.
 • बंड वाले लष्करी डावपेचात कमी पडले
 • सर्वसामान्य जनतेचा पाहिजे तसा बंड वाल्यांना Support मिळू शकला नाही त्यामुळे काही भाग शांतच राहिला.
 • इंग्रजांकडे Strong leadership, आधुनिक शस्त्रास्त्रे होती.

Historians’ Opinion About The 1857 Revolt

THE REVOLT OF 1857 In Marathi, 1857 च्या उठाव बद्दल इतिहासकारांचे मत

इतिहासकारमत
वि. दा. सावरकरभारताचा प्रथम स्वतंत्रता संग्राम
डिजरायलीराष्ट्रीय विद्रोह
सर जॉन लरिन्स, सीलेसैनिकांचा विद्रोह
जेम्स आउट्रम, डब्ल्यू. टेलरइंग्रजांविरुद्ध हिंदू मुस्लिमांचा कट (षड्यंत्र)
टी. आर होम्सरानटी आणि सभ्यता यांच्यातील युद्ध
एल. ई. आर. रीज़ख्रिस्ती विरुद्ध धर्मान्ध

What Was The Outcome of The Revolt of 1857

१८५७ च्या उठावाचे परिणाम

1 राणीचा जाहीरनामा

 • भारतीय लोकांना जात, धर्म, वंश, वर्ण, यांचा भेदभाव न करता नौकऱ्या दिल्या जाईल
 • भारतीयांना आर्थिक स्वतंत्र आणि समानता या गोष्टी सामान पद्धतीने देण्याचे मान्य करण्यात आले.
 • विस्तारवादी धोरणाचा अंत करण्यात आला.
 • आता Company ची राजवट संपली

भारतीय लष्कराची पुनर्रचना

 • इंग्रज आणि भारतीय सैनिकांचे प्रमाण (१:२) या प्रमाणात करण्यात आले.
 • तोफखाना आणि शस्त्रागार इंग्रजांच्या हातात राहील याची काळजी घेण्यात आली.
 • भारतीयांमध्ये ऐक्य निर्माण होऊ नये म्हणून लष्करी तुकड्या जातीवर उभारण्यात
  आल्या.
 • सामाजिक सुधारणा बाबतचे धोरण बदलले.

FAQ

Que. 1. महाराष्ट्रातील उठावाची ठिकाणे कोणती होती

Ans. कोल्हापूर, औरंगाबाद, नगर, कराड, वाठार, फलटण, मुधोळ, बेळगाव नांदगाव भिल्ल लोकांचा उठाव आणि पेठ मधील उठाव (जिल्हा : नाशिक) महाराष्ट्रातील इत्यादी उठावाची ठिकाणे होती.

Leave a Comment