महाभरती जीआर – ZP आरोग्य विभाग परीक्षा पुन्हा लांबणीवर…हि आहेत दोन कारणे

ZP Arogya Vibhag Exam Update : आज 19 September 2022 ला महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट – क मधील आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती (ZP Arogya Vibhag Exam) संदर्भात ग्राम विकास विभागाकडून जीआर आलेला आहे. त्यानुषन्गाने या Blog Post मध्ये या जीआर मधील सांगितलेले महत्वाचे मुद्दे एकदम सोप्प्या भाषेत येथे तुमच्यासमोर ठेवत आहे.

महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ४ मे, २०२२ च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार मार्च, २०१९ व ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट – क मधील आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती करण्याकरीता परिक्षा घेण्याबाबत वेळापत्रक दि. २६ ऑगस्ट, २०२२ च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आला होता.

त्यानुसार आगामी महाभरती दि. १५ व १६ ऑक्टोबर, २०२२ या दिवशी घेण्याचे जवळपास निश्चितच होते, परंतु खालील दोन कारणांमुळे हि मेगा भरती आणखीन काही दिवस किंवा महिन्यांनी पुढे ढकलण्यात आलेली आहे. ज्या दोन कारणांमुळे या मेगा भरतीला उशीर होणार आहे ते पुढील प्रमाणे आहेत.

१) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडे झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार येणाऱ्या मेगाभरतीत मिळालेल्या काही सूचनांचा समावेश करून नव्याने सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना पुढच्या जीआर द्वारे जाहीर केले जाईल.

२) दि. १५ व १६ ऑक्टोबर, २०२२ या दिवशी मेगा भरती होणार होती परंतु याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेचा दिवस आलेला आहे, त्यामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून, या महाभरतीस स्थगिती देण्यात येत आहे. ZP Arogya Vibhag Exam Date बाबत सुधारित मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर याबाबत यथावकाश कळविण्यात येईल.

Zp आरोग्य विभाग परीक्षा 15,16 ऑक्टोंबर रोजी पूर्वनियोजित तारीख रद्द करण्यात आली आहे. एक लक्षात ठेवा जे पूर्ण भरती प्रक्रिया रद्द झाली असल्या ज्या बातम्या 2-3 दिवसापूर्वी येत होत्या, की नव्याने जाहिरात प्रसिद्ध होणार हे पूर्णपणे चुकीचे आहे.

कारण या Gr मध्ये तसा कोणताही उल्लेख केलेला नाही. त्याच दिवशी MPSC ची परीक्षा येत असल्याने ही date postponed करत आहे, असे कारण दिले आहे. तरी काही लोकांनी निवेदन देऊन ही भरती मुद्दाम पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थी जे exam देणार आहेत त्यांना विश्वासात न घेता 4 वर्षापासून किती वेळा परीक्षा तारखा पुढे ढकलनार.

विद्यार्थ्यांमध्ये एकीचा अभाव आहे हे या निर्णयाने स्पष्ट झाले. जिल्हा परिषद भरती शासन निर्णय सरळसेवा भरती बाबत या सरकारचे नवीन धोरण/निर्देश येण्याच्या शक्यतेमुळे जिल्हा परिषद पदभरतीचे संभावित वेळापत्रक स्थगित. ZP भरतीचे नवीन वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल.

Gr Download Link : Download Pdf

Leave a Comment