MPSC CSAT Strategy in Marathi | How to Prepare MPSC CSAT Paper

नमस्कार मित्रांनो, अभ्यास करताय ना ? करायलाच पाहिजे. तुम्हाला आपले मागील लेख आवडले असतील अशी मी आशा करतो. सर्वात गोंधळात टाकणारा पण तेवढाच महत्वाचा असणारा विषय ज्याची भीती सर्व परीक्षार्थींना असते तो आहे CSAT.

या लेखात आपण CSAT म्हणजे नेमके काय? CSAT बद्दल असलेले गैसमज, अभ्यासक्रम, CSAT चा अभ्यास कसा करावा ? | How to Prepare MPSC CSAT Paper, MPSC CSAT Strategy in Marathi इ. बद्दल माहिती घेऊया.

CSAT म्हणजे काय?

CSAT म्हणजे Civil Services Aptitude Test. मराठीमध्ये त्याला नागरी सेवा कलचाचणी असे म्हणतात. हा पेपर २०० गुणांचा असतो. MPSC परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा आणि निकाल फिरवण्याची क्षमता असणारा एकमेव आणि महत्वाचा विषय म्हणजे CSAT.

कारण तुम्ही जेवढे मार्क्स सामान्य अध्ययन म्हणजेच GS मध्ये येण्याची शक्यता कमी असते किंवा क्वचितच असते ते CSAT मध्ये येऊ शकतात. MPSC Rajyaseva Prelims Exam चा Cut Off आतापर्यंत २५० च्या पुढे गेला नाही त्यामध्ये १२५+ मार्क्स मिळवून देण्याचे क्षमता एकट्या CSAT मध्ये मिळू शकतात.

नेमका अभ्यास आणि सातत्याने केलेला सराव हा तुम्हाला यशाचा शिखरावर नेऊ शकतो.

हे देखील वाचा :

MPSC CSAT बद्दल असलेले गैरसमज

विदयार्थ्यांच्या मनात एक मोठा गैरसमज असतो की, हा पेपर फक्त इंजिनीरिंग बॅकग्राऊंड असलेली लोक चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात किंवा ज्यांचे गणित चांगले आहे तेच सोडवू शकतात.

तर मित्रांनो असे काही नाही. तुम्ही जर योग्य प्रकारे नियोजन केले आणि सराव केला तर नक्कीच तुम्ही सुद्धा या विषयात एज मिळवू शकता. किती विद्यार्थी आहेत ज्यांनी या विषयाचा बाऊ न करता त्यावर Strategy बनवून यश मिळवले आहे.

काही लोकांना वाटते कि CSAT म्हणजे नुसते गणित आहे आणि त्याला खूप स्पीड लागतो आणि आपला हे काम नाही. तर आपण जर पेपर ची मांडणी पहिली तर आपला हा गैरसमज नक्की दूर होऊन जाईल.

MPSC CSAT Syllabus

MPSC CSAT Syllabus | MPSC CSAT Topics

  • रिडींग कॉम्प्रेहेन्शन
  • लॉजिकल रिसनिंग
  • ऍनालीटीकल ऍबिलिटी / विश्लेषणात्मक क्षमता
  • निर्णय क्षमता

हे देखील वाचा : MPSC CSAT Books in Marathi and English

आपण पाहिले तर MPSC CSAT Syllabus चार टप्प्यात विभागलेला आहे. एक रिडींग कॉम्प्रेहेन्शन म्हणजेच आकलन क्षमता, दोन लॉजिकल रिसनिंग म्हणजेच तार्किक क्षमता, तीन ऍनालीटीकल ऍबिलिटी म्हणजे विश्लेषणात्मक क्षमता, चार निर्णय क्षमता.

साधारणतः ५० प्रश्न हे आकलन क्षमतेवर येतात. यामध्ये तुम्हाला १० उतारे दिलेले असतात आणि प्रत्येक उताऱ्याखाली साधारण ५ प्रश्न असे असतात. शेवटचे ५ प्रश्न हे निर्णय क्षमतेवर असतात ज्याला तुम्हाला नकारात्मक गुण नसतात. तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता यामध्ये २५ प्रश्न विचारले जातात.

MPSC CSAT Strategy in Marathi | How to Prepare MPSC CSAT Paper

How to Prepare MPSC CSAT Paper

CSAT चा अभ्यासक्रम हा लिमिटेड आहे आणि त्याचीच जास्त प्रॅक्टिस करावी लागते. या पेपर साठी आयोगाचे MPSC Rajyaseva Previous Year Question Papers सर्वप्रथम Download करून घ्याव्यात.

साधारण 2013 पासून MPSC ने CSAT चा समावेश केलेला दिसून येतो त्यामुळे 2013 पासून पुढचे सारे पेपर आपल्याकडे असावेत. त्यानंतर हे सर्व पेपर आपण वेळ न लावता सोडवून घ्यायचे.

कितीही वेळ लागला तरी चालेल. एक पेपर दोन दिवस सोडवला तरी चालेल पण सर्व प्रश्न सुटत आहेत का ते पाहायचे. त्यानंतर जे प्रश्न तुम्हाला सुटलेले नाहीत किंवा जे चुकलेले आहेत ते एक विश्लेषणात्मक पुस्तक घ्यायचे ज्यामध्ये हे पेपर सोडवून दिलेले असतील त्यातून पाहायचे.

मग आपले नेमके काय चुकले ते एका वहीत लिहून ठेवायचे. उताऱ्यात आपण बरोबर अप्रोच लावला का ? उतारा आपण नीट वाचला का? प्रश्न वाचण्यात चूक झाली का? एखादे सूत्र आपल्याला आठवले नाही, एखादा चॅप्टर आपल्याला येत नाही हे तुम्ही त्या वहीमध्ये लिहू शकता.

असे रोज २-३ तास करायचे. गणितासाठी सराव करणे महत्वाचे आहे. कन्सेप्ट क्लिअर करून घेणे व वेगवेगळ्या प्रकारचे गणिते सोडवून ते टॉपिक पक्का झाला कि लगेच वाहीत टिक करून घेणे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या चुका समजतील आणि त्या आपण सुधारू.

हे करून झाले कि हेच पेपर पुन्हा आयोगाच्या पेपर च्या वेळेनुसार सोडवायचे. म्हणजे दुपारी ३-५ हि CSAT च्या पेपर ची वेळ आहे तर त्याच वेळेत हे पेपर सोडवायचे म्हणजे आपल्याला आहे त्या वेळेत पेपर सोडवायची सवय लागते.

आणि कोणते उतारे आपल्याला सोपे जातात आणि कोणते अवघड हेही आपल्याला समजेल म्हणजे परीक्षेत उतारे निवडताना आपल्याला मदत होते. आणि अवघड वाटणाऱ्या उताऱ्यावर वेळ जात नाही. जेवढा जास्त आयोगाच्या पेपर चा सराव आपण करू तेवढे आपण आयोगाच्या भाषेशी आणि प्रश्नांसोबत फॅमिलीअर होऊन जाऊ.

अशाप्रकारे आपण आज MPSC CSAT How to Prepare MPSC CSAT Paper विषयी पुरेशी माहिती घेतली. पुढच्या लेखात आपण CSAT चा पेपर सोडवताना कोणती काळजी घ्यावी, वेळेत पेपर पूर्ण कसा करावा आणि पेपरमध्ये अचूकता कशी आणावी याबद्दल सविस्तर माहिती पाहू.

Leave a Comment