MPSC परीक्षेतील CSAT ची रणनीती | How to Approach CSAT Paper 2 in Marathi

विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या लेखात आपण पहिले कि CSAT चा अभ्यास कसा असावा | how to prepare mpsc csat paper. त्यामध्ये आपण बरच मुद्दे पहिले जे तुम्हाला स्ट्रॅटेजि ठरवण्यासाठी उपयोगी पडू शकतील.

या लेखामध्ये आपण ऐन MPSC परीक्षेमध्ये CSAT चा अप्रोच कसा असावा? | How to Approach CSAT Paper 2 in Marathi पेपर वेळेत पूर्ण कसा करावा? अचूकता आणि वेळ याचे गणित जुळवण्यासाठी हा लेख तुम्हाला उपयोगी पडेल. चला तर मग आपण सुरुवात करूया.

विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन

MPSC च्या मुलांच्या पुढे खूप मोठा प्रश्न असतो कि एवढा मोठा CSAT चा पेपर दोन तासात पूर्ण कसा करायचा. अर्थात काही लोकांना असेही वाटते कि फक्त ८० प्रश्न दोन तासात सोडवणे काही अवघड नाही आपण सराव न करता सोडवू शकतो.

पण अशा लोकांचा खरा कस पेपर सोडवायच्या वेळेस लागतो. जेव्हा पेपर हातात पडतो तेव्हा खरी त्यांची घाबरगुंडी उडून जाते. साधरणतः पेपर ५०-६० पानांचा असतो.

खरे तर याची भीती बाळगण्याचे काहीच कारण नसते कारण पेपर हा दोन भाषेमध्ये म्हणजेच मराठी आणि इंग्लिश भाषेत असल्यामुळे तो एवढा मोठा वाटतो. थोडक्यात ५०% पेपर मराठी आणि ५०% इंग्लिश मधून असतो.

त्यामुळे उगाचच भीती घालून घेण्याची आवश्यकता नाही. कारण आपल्याला त्या पेपर मध्ये असलेले सगळेच्या सगळे प्रश्न सोडवायचे नाहीयेत. आपल्याला कट ऑफ पार करायच्या दृष्टीने जेवढी गरज आहे तेवढाच पेपर सोडवायचा आहे.

पेपर सोडवताना तुमची लढाई हि वेळेशी आणि अचूकतेशी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे वेळेत पेपर आपला पूर्ण तर झालाच पाहिजे पण त्यातलीअचूकता देखील तुम्हाला मेंटेन करायची आहे.

हे देखील वाचा :

How to Approach CSAT Paper 2 in Marathi | पेपर सोडवण्याचा क्रम

How to Approach CSAT Paper 2 in Marathi :

हा प्रश्न खूपच गहन आहे. पेपर सोडवायला सुरुवात कुठून करावी हा ज्याच्या त्याच्या कंफर्ट झोन चा प्रश्न असतो आणि हा कंफर्ट झोन मागील वर्षीचे पेपर सोडवण्याने समजतो.

काही लोक गणितापासून सुरु करतात काही निर्णयक्षमतेचे प्रश्न आधी सोडवतात तर काही सरळ पहिल्या पानापासून सुरु करतात.

आम्ही तुम्हाला जी पद्धत सांगाणार आहोत तीच तुम्ही वापरावी असे काही नाही. तुम्ही सरावाने तुमची पद्धत वापरू शकता.

निर्णय क्षमता :

जेव्हा पेपर आपल्या हातात येतो म्हणजे साधारणतः २: ५५ मिनिटांनी पेपर आपल्या हातात येतो आणि सील फोडल्याशिवाय आपल्याला तो उघडता येत नाही त्यामुळे ३ वाजता आपण पेपर उघडला कि पहिले निर्णय क्षमतेचे प्रश्न सोडवायला घ्यावेत.

हे प्रश्न आधी घेण्याचे कारण असे की, या प्रश्नांसाठी तुम्हाला नकारात्मक गुण नसतात. तुम्हाला ० पासून २. ५ पर्यंत मार्क पडू शकतात. म्हणजे हे मार्क तुमच्या हातचे मार्क आहेत. ऐकून पाच प्रश्न सोडवून तुम्ही अगदी पैकीच्या पैकी म्हणजे १२.५ गुण यामध्ये मिळवू शकता.

आणि सुरुवातीला घेण्याचे कारण असे कि यावेळी तुम्ही एकदम फ्रेश माईंड मध्ये असता. विचार करण्याची क्षमता यावेळी जास्ती ऍक्टिव्ह असते आणि शांतपणे विचार करून तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता.

हे प्रश्न सोडवताना नकारात्मक गुण नसल्यामुळे तणाव मुक्त राहून योग्य निर्णय घेऊ शकता. शेवटी जर हे प्रश्न ठेवले तर शेवटी शेवटी थकून जाऊ शकता किंवा पेपर कव्हर करण्याची घाईगडबड होऊन तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता त्यामुळे हे प्रश्न पहिल्या १० मिनिट मध्ये सोडवायचे.

उतारे :

३:१० नंतर तुम्ही उतार्यांकडे शिफ्ट झाले पाहिजे. उतारे सोडवायला लागण्याच्या आधी तुम्ही उतारे सिलेक्ट करणे खूप महत्वाचे आहे. काही उतारे सोपे असतात पण मोठे असतात काही उतारे लहान असतात पण अवघड असतात.

काही उतारे लहान असतात सोपे असतात पण त्याखाली असणारे प्रश्न हे बहुविधानात्मक असतात जे वाचायला वेळ लागू शकतो. त्यामुळे आधी पहिले ३-४ उतारे असे निवड ज्याच्या खालील प्रश्न हे एका ओळींमधील असतील जेणेकरून उत्तर लगेच मिळू शकेल.

त्यानंतर तुम्हाला सोपे जात असतील असे आणि थोडे मोठे असतील असे ३-४ उतारे निवडायचे. ते सोडवून झाले कि मग राहिलेले २-३ उतारे सोडवायचे. पहिल्या ६०- ६५ मिनिटामध्ये तुमचे ४०+ प्रश्न सोडवून झाले पाहिजेत अचूकतेसोबत.

आधी उतारे की आधी प्रश्न :

काही मुलांचा असाही प्रश्न असतो की, आधी प्रश्न सोडवायचे की आधी उतारा वाचून घ्यायचा. तर आधी प्रश्न वाचून घेणे कधीहि चांगले कारण प्रश्न वाचल्याने आपल्याला एक आयडिया येते कि उताऱ्यामधील कोणत्या गोष्टीवर वाचताना भर द्यायचा आहे.

कोणत्या शब्दाभोवती प्रश्न फिरतोय हे समजते. त्यामुळे आधी प्रश्न वाचावेत आणि मग उतारा वाचण्याकडे जावे. आता प्रश्न वाचताना तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यातील महत्त्वाचे शब्द घेऊन त्याची एखादी स्टोरी बनवू शकता.

जेणेकरून ते उतारा वाचताना तुमच्या लक्षात राहतील, तुम्ही त्याला मार्क करू शकता आणि जेव्हा पुन्हा प्रश्न वाचून सोडवाल तेव्हा अधोरेखित केलेल्या शब्दाकडे तुमचे लक्ष लगेच जाईल आणि वेळ वाचेल.

बुद्धिमत्ता आणि गणित :

यामध्ये तुम्हाला २५ प्रश्न असतात आणि ते तुम्ही उरलेल्या ४० मिनिटामध्ये सोडवणे अपेक्षित असते. अर्थात इथेही काही सगळे प्रश्न सोडवायचे नसतात. यातील प्रश्न सोडवणे हे तुमच्या वेळेवर आणि तुमच्या आधीच्या प्रश्नांच्या अचूकतेवर देखील अवलंबून असते.

यातील १५-२० प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. आता आपण हे प्रश्न सुरुवातीला का घेतले नाहीत तर त्याचे कारण असे आहे की, गणित आणि बुद्धिमतेचा सराव आपण सुरुवातीपासून केलेला असतो आणि त्याच पद्धतीने प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारलेले असतात.

त्यामुळे ते आपल्याला सुटणारच असतात कारण ते आपल्या ओळखीचेच असतात . पण उतारे चा सराव जरी आपण आधी केला असला तरी तेच उतारे आपल्याला आलेले नसतात त्यामुळे हे प्रश्न शेवटी घ्यावेत.

परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे, कोणताही प्रश्न तुम्हाला अडला किंवा जास्ती वेळ लागत आहे असे वाटत असेल तर तो प्रश्न तिथे सोडून पुढच्या प्रश्नाकडे जावे म्हणजे आपला वेळ वाचेल.

अशा प्रकारे योग्य आणि सतत सराव करून आपण आपला पेपर कसा सोडवायचा यावर आपण चांगली रणनीती बनवू शकतो. त्यामुळे पेपर चा खूप सराव करणे महत्वाचे आहे.

How to Approach CSAT Paper 2 in Marathi हा लेख वाचून जर तुमच्या Knowledge मध्ये काही Value Addition झाली असेल तर नक्की खाली Comment Box मध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा.

Leave a Comment